मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२०१४ इलेक्शन स्पेशल - चार ओळी

अमोल केळकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
लोकसभेच्या निवडणूकीच्या जाहीर झाल्या तारखा काही दिवस तरी कमी होईल नेत्यांची खा.खा..... :) ---------------------------------------- आधी बोलवत होतो तेंव्हा केलीत तुम्ही ना ना तिकडे तिकीट न मिळता इकडे लगेच आलात ना.... :) ---------------------------------------- विकासाची मोजदाद करायला सोळा प्रश्णांची प्रश्णावली. येणारी निवडणूकच सांगेल कुणी कुणाची वाट लावली. दिल्लीहून खास गुरुजी पेपर तपासायला आले गुजरातच्या विद्यार्थांना वाटले नाहीत ते 'आप'ले :) --------------------------------------- अमोल केळकर ७/३/१४ www.poertymazi.blogspot.in

वाचने 1655 वाचनखूण प्रतिक्रिया 2

खटपट्या 09/03/2014 - 22:26
मनसे म्हणाली युतीला तुमच्या बरोबर येवू कशी आणि आता म्हणतेय अग अग म्हशी मला कुठे नेशी ___________________________________________ (केविलवाणा प्रयत्न केलाय (केल्या गेला आहे))