च्यायला, च्यामारी ( घाटी शब्द )
लहानपणी तुम्ही मित्राला कधी टाळी दिली नाहीत का?
आम्ही तर टाळीवरुन एक खेळ ही खेळायचो
' दे टाळी ' म्हणले की ' घे टाळी ' मग पुढे
घे पोळी मग दुसरा म्हणायचा ' घे , गोळी'
दे विडा आणि शेवटी खा . ' किडा '
असे म्हणायचे आणि खो खो हसायचे, गंमतीचे दिवस होते ( आमच्यात किडेगिरी करायची बी ही अशी लहानपणीच रुजली होती , असो )
मुंबईतली मुले असा खेळ खेळायची नाहीत का? बहुतेक नाहीच
नाही तर एका समवयस्क भावाने ' घे टाळी ' म्हणले असताना दुसरा भाऊ , फोन नाही आला म्हणून रागावून बसला नसता.