कलगीतुरा-भाग ३
या आधीच्या भागांची लिन्क खाली देत आहे.
कलगीतुरा- भाग १
कलगीतुरा- भाग २
बघता बघता तो दिवस उजाडला. जसजशी वेळ जवळ येत चालली तसतशी उत्कंठा शिगेला पोहचली. संध्याकाळी साडे सात वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. पण सकाळपासूनच टी. व्ही. वर सतत कार्यक्रमाच्या जाहीरातींचा मारा चालला होता. मला कार्यक्रमापेक्षा प्रचंड उत्सुकता होती कांतीशेठच्या या व्हेंचर (की अॅडव्हेंच्रर?) चा आत्तापर्यंतचा ताळेबंद काय झाला असेल! मला रहावेना म्हणून मी कांतीशेठला फोन लावला.
मिसळपाव