नाते अग्निशी
शरीरावर माझ्या ज्वालांचे नर्तन चालले
ईथेच मी अग्निशी नाते प्रस्थापिले
माझ्याच देवाकडून मी देव्हाह्र्यात जाळले गेले
देवरूपातील दानव मी कैकवार पाहिले
शरीराचे अस्तित्व केवळ राखेतुन उरले
राखेतील धगधगते अंगारे प्रतिशोधास आतुरले
जनलोकांच्या आत्म्यामध्ये बंडाच्या अग्निरुपात प्रगट्ले
अखेरीस तुमच्यामधुन मी त्यास फासावर लट्कवले
शेवटक्षणी मात्र मी 'देवासाठी' गहिवरले
मज प्रियकरास मी चितेवर मिठित घेतले
मिसळपाव