मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्विन...

पिलीयन रायडर · · जनातलं, मनातलं
परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. क्विन! आवडला.. जाम आवडला.. क्विन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय.. भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी.. तिचं लग्न मोडतं.. भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. एक तर ते झालंच पाहिजे.. दुसरं ते जातीमध्येच झालं पाहिजे, मग गाढवाशी का होईना.. पण परजातीतील कर्तुत्ववान पुरुष सुद्धा त्या गाढवापुढे किस झाड की पत्ती..शिवाय लग्न योग्य वयातच झालंच पाहिजे नाही तर मग आख्या जगाला तुमची काळजी करावी लागते.. कारण लग्ना शिवाय आयुष्य म्हणजे.. छे.. उपमा देण्यालायक सुद्धा उरत नाही.. असं लग्न मोडलं म्हणजे तुम्ही खरं तर जीव द्यायला हवा.. कारण काहिही असो.. चुक मुलीची असते.. "आता आपलं कस्सं होणार" हा प्रश्न पण त्यांनाच पडायला हवा.. मुलांना ह्या चिंता नसतात..* पण रानी "अब मेरा क्या होगा.." च्या गम मध्ये न डुबता चक्क स्वतःच्या हनिमुनच्या तिकीटावर पॅरिसला जाते..! मला हेच्च लई लई आवडलं.. तिची कारणमीमांसा काही का असेना.. आयडिया भारी आहे.. तिथे गेल्यावर तिला खुप वेगळं आयुष्य पहायला मिळतं.. वेगळेच लोक.. त्यांच्या विचित्रच पद्धती.. मुल्य वेगळी.. विचार वेगळे.. त्यांनाही त्यांची दु:ख.. पण त्याची ओझी वाहताना कुणी दिसत नाही.. "दु:खाच्या अलंकरणाची दिप्ती.." बाजुला सारुन चक्क आनंदी रहाण्याची उलटीच रीत.. रानीला कुणी फालतु (भोचक) प्रश्न विचारत नाही.. रानी दारुच्या नशेत जी काही बकवास करते ते ही शांतपणे ऐकुन घेतल्या जातं.. स्वतःच्या (इन मिन छटाक) आयुष्यातुन आलेल्या अनुभवांमधुन सल्ले कुणी देत नाही.. सल्ले नाहीत?! गेलाबाजार "क्या पता..कल हो ना हो" टाईप कॅचलाईन्स पण नाहीत? मग लोकांची आयुष्य बदलणार कशी? अरे "बस उसकी एक बातने मेरी तो दुनियाही बदलदी" बॉलीवुडची बदाम सत्ती आहे.. इथेच तर गेम सुरु होतो ना जिंदगी बदलण्याचा... कशी बदलणार मग दुनिया आता? मीच हैराण..परेशान झाले... किमान रानी स्वगता मधुन स्वतःला उलगडुन दाखवत आहे असं तरी दाखवायचं.. मग तरी प्रेक्षकांना समजेल पिक्चर आणि त्यातला अर्थ.. कारण प्रेक्षक चित्रपटातलं सगळ्यात मुर्ख पात्र असतं.. त्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स ची कोडी घालण्यावर बॉलीवुडचा विश्वास नाही.. त्यामुळे ह्या न त्या प्रकारे शब्दबंबाळ डायलॉग मधुन त्याला "जिंदगी".."मोहोब्बत"..विषयी तत्वज्ञान नाही दिलं तर मग घरी जाऊन त्याची जिंदगी कशी बदलणार? पण इथे एकंदरीत कुणी कुणाला काहीच उलगडुन दाखवत नाही.. सगळेच समजुन घेतात.. रानी सगळा राग फक्त दात ओठ खाउन.. केस मोकळे सोडून नाचुन व्यक्त करते.. पुर्वी एकदा नातेवाईकां समोर नाचल्याबद्दल होणार्‍या नवर्‍याच्या शिव्या खाल्याचा प्रसंग आठवुन फक्त एक छ्द्मी हास्य.. बास.. आणि पुन्हा हंगामा हो गया..सुरु.. रानीला ३ मुलांसोबत रहावं लागतं.. आधी त्यांना घाबरलेली रानी नंतर चक्क त्यांची मैत्रीण होते.. एका स्ट्रिप क्लब मध्ये जाऊन नाचते.. गाडी चालवते..एका स्पर्धेत जाउन तिथल्या लोकांना पाणीपुरी खाऊ घालते.. एक लिप किस पण करते.. रानीला ह्या सगळ्या दरम्यान काही नवीन सापडत नाही.. फकत तिच्यात जो आत्मविश्वास आहे ह्याची तिला कल्पनाच नसते तो तेवढा सापडतो.. आता एवढी मोठी गोष्ट गवसल्यावर हिरोईन कशी आमुलाग्र बदलली पाहिजे.. बॉलीवुडमध्ये हिरोईन आमुलाग्र बदलते म्हणजे ती खरं तर ड्रेसची लांबी, केसांची हेअर स्टाईल आणि तोंडावरती अत्यंत सहनशीलच्या ऐवजी माजोरडे भाव एवढंच बदलत असते.. आणि हो मग तिनी १-२ तरी मोठे डायलॉग मारले पाहिजेत.. मग हिरो स्तब्ध व्हायला पाहिजे..मग ती ताडताड तिथुन निघुन जाणार..मग हिरोला उपरती व्हायला पाहिजे.. (हे उलटं ही होऊ शकतं.. हिरोईन कपड्यांची लांबी कमी करते.. मग हिरो तिला भारतीय संस्कृतीबद्दल ऐकवतो.. मग हिरोइन स्तब्ध.. मग हिरो ताडताड जाणार..हिरोईनला उपरती..) इथेही हिरोईन बदलते आणि हिरोला उपरती होते.. फक्त मधल्या स्टेप्स घडत नाहीत.. म्हणजे कंगना अजुनही तिला कंफरटेबल वाटेल अशाच नॉर्मल कपड्यात असते.. सतत घट्ट उराशी बाळगलेला स्वेटर तेवढा काढते.. पण ते कदाचित तिची भीती ओसरत जाते तसं ती जात मोकळी होते हे दाखवण्या इतपतच.. ती कूणालाही स्तब्ध करत नाही.. अवाक करत नाही.. कुण्णा कुण्णाला तिच्या शब्दबंबाळ डायलॉगमुळे उपरती होते नाही.. कुणाचही आयुष्य एक पल मध्ये बदलत नाही.. बरं इथवर तरी ठिक आहे.. पण जेव्हा हिरोला उपरती होऊन तो रानी कडे येतो.. तेव्हा तरी "जिंदगी" आणि "मोहोब्बत" च्या फुलबाज्या उडणार असं मला वाटत होतं.. पण छे.. चांगली रडुन पडून "तुम ऐसा कैसे कर सकते हो मेरे साथ विजय????" असे आर्त प्रश्न विचारायचे सोडुन ही बया रॉक शो ला निघुन जाते.. कमाल आहे.. अरे प्यार सामने रो रहा है.. माफी की भीक मांग रहा है.. डायलॉग मारने की सुवर्णसंधी डायरेक्टर दे रहा है.. तर ह्या पोरीला पुन्हा कधी न भेटु शकणारे मित्र महत्वाचे वाटतात? "ये बाते हम दिल्ली मे भी कर सकते है.." असा लॉजिकल डायलॉग मारुन हिरोईन मित्रांना भेटायला जाते?? छे.. असं कुठे घडतं का? म्हणलं ठिके.. पण शेवटी "प्यार की च जीत" होत असते.. त्यामुळे तिथे तरी हरदासाची कथा मूळपदावर येईलच.. पण हे भगवान! आता जरी प्यार भीक मागत असला तरी उद्या ह्याच प्यार सोबत "लग्न" नामक गोष्ट झाल्यावर प्यार नवरा बनुन परत डोक्यावर मिर्‍या वाटणार, सासु घरात किटी पार्टी आणि पार्लर मध्ये अडकवणार हे संभाव्य धोके लक्षात घेऊन हिरोईन चक्क साखरपुड्याची अंगठी परत देऊन निघुन जाते.. काहीही म्हणजे अगदी काहीही झालं तरी बये लग्न आणि नवरा महत्वाचा ही "भारतीय संस्कृतीची" आणि प्यारे के आगे सब गुनाह माफ असतात ही बॉलीवुडची आम्हाला शिकवण आहे..त्यामुळे अगदी ऐन्वेळेस नवरा मुलगा मागे हटला तरी कुणी ना कुणी बोहल्यावर उभं राहुन "प्रसंग निभवायचा".. म्हणजे त्या अभागी मुली सोबत लग्न करायचं.. मग ती मुलगी आयुष्यभर त्याला परमेश्वर मानुन "मै धरा की धुल हूं" म्हणणार.. एक तर ही रानी घरात तोंड लपवुन बसायचं सोडुन पॅरिसला जाते.. तिथे चक्क आनंदात रहाते (दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी.. त्यातही तु कितीही मॉडर्न असलीस (कितीही लहान कपड्यात वावरणारी बोल्ड अभिनेत्री = मॉडर्न, खुल्या विचारांची, स्वतंत्र स्त्री) तरी जेव्हा सवाल इश्क, मोहोब्बत का असतो तेव्हा तू डोकं गहाणच ठेवायचं असतं.. अगं स्वतःला आमुलाग्र बदलायला तयार होतात हिरवणी (म्हण्जे रिव्हर्स केस.. तोकड्या कपड्यातुन बॅक टु साडी फॉर हिरोज सेक..).. आणि तू चक्क माफी नाकारतेस हिरोला? अंगठी परत करतेस??? मी कानात प्राण आणुन आता एका मोठ्या डायलॉगची वाट पहात होते.. पण नाही.. "थँक्यु" व्यतिरिक्त चकार शब्द नाही.. काही मोठी मोठी स्पष्टीकरणं नाहीत.. शाब्दिक थोबाडित मारणं नाही.. आयुष्यभर गप्प बसुन पिक्चरच्या शेवटाला दुनियाभरची बडबड करुन समोरच्याला (आपल्याला बोलता येतं आणि १० ओळी सलग बोलु शकु एवढी अक्कल आपल्याला आहे हे दाखवुन) अवाक करण्याचा प्लान नाही.. "हमारा रास्ता जरुर एक है लेकीन मंजिल नही.." टाईप छळ नाही.. फक्त एक "थँक्यु".. विथ स्माइल..! ?? व्हाय??? हम्म.... आय गेस बिकॉज शी इज जस्ट "क्विन".. ए क्विन विदाऊट ड्रामा..! *- हे सगळं माझं बॉलिवुड ग्यान आहे.. माझी मतं नाहीत.. त्यामुळे कुठल्याच मुक्ती मोर्चांनी माझ्यावर धावुन येऊ नये.. मी उत्तरं देत बसण्याचा टाईमपास करणार नाहीये..

वाचने 36385 वाचनखूण प्रतिक्रिया 164

मितान 01/04/2014 - 17:11
मस्त चुरचुरीत लिहिलंयस पिरा ! आता बघावाच काय क्वीन ?

पैसा 01/04/2014 - 17:16
सिनेमा आणि त्या निमित्ताने आणखी जे लिहिलंस ते सगळंच आवडलंय. सीडी आणलीय. कधी मुहूर्त मिळतो बघू!

सूड 01/04/2014 - 17:24
>>मी कानात प्राण आणुन आता एका मोठ्या डायलॉगची वाट पहात होते.. पण नाही.. "थँक्यु" व्यतिरिक्त चकार शब्द नाही.. अगदी हेच आलं होतं शेवट्चा सीन बघताना डोक्यात. एका थँक्युवर कसं काय संपू शकतं सगळं!! पण त्याचं उत्तरही इथेच मिळालं आणि त्या उत्तराबरोबर बरेच प्रश्न सुटले...माझेही !! :)

(दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? >>>>> ,थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी.. >>>> +++१११११११११११११ मस्त लिहिलयं, आवडलं..

In reply to by स्मिता चौगुले

>>>(दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? >>>>थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी..

प्यारे१ 01/04/2014 - 17:47
आधी चेपुवर बघितला. खरंच सांगतो, कुणाचा शेअर वगैरे केलाय का ते पाहिलं. :) (लेख जमल्याचं लक्षण आहे हे. उगाच दंगा करु नये.) पुन्हा लेख वाचला. आवडलाच्च. कंगना आवडत नसल्यानं क्वीन बघेन की नाही ठाऊक नाही. महिन्या भरात येईल कुठंतरी. चाळेन तेव्हा.

In reply to by बॅटमॅन

किसन शिंदे 01/04/2014 - 18:13
अर्धा सिनेमा बघेतो लईच्च बोर व्हायला लागलं, मग बंद केला आणि तुकड्या-तुकड्यात पाह्यला. सलग तीन तास बसून बघावं असा नाय वाटला. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by किसन शिंदे

आत्मशून्य 02/04/2014 - 00:35
अर्धा सिनेमा बघेतो लईच्च बोर व्हायला लागलं, मग बंद केला आणि तुकड्या-तुकड्यात पाह्यला. सलग तीन तास बसून बघावं असा नाय वाटला. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
की एप्रिल फुल वगैरे करतोयस ? काहीही असो. प्रतिसाद पटला.... म्हणजेच आवडलाही. बरं वाटत लोकांना अभिव्यक्त होताना जेंव्हा मनातलंच बोलतात आणी स्वतःसाठी बोलतात तेंव्हा.

चिगो 01/04/2014 - 18:23
सुंदर परीक्षण.. 'क्विन' मलापण अत्यंत आवडला तो त्याच्या सटल टचेस (मराठी प्रतिशब्द?) मुळेच.. रानी स्वतंत्र, मुक्त होत जाते, पण सैरभैर होत नाही. "हंगामा हो गया" गाण्यावर नाचतांना अंगातला स्वेटर काढते, मात्र गरागरा फिरवून झाल्यावर फेकत नाही तर हँडबॅगेत कोंबते, ते लैच भावलं.. कसलेही लंबेचौडे डायलॉग,अभिनिवेष आणि "ओव्हर द बोर्ड" असे स्वभावपरीवर्तन न दाखवता, अत्यंत संयमित रित्या "स्व"ची रानीला झालेली जाणिव दाखवली आहे..
इथेही हिरोईन बदलते आणि हिरोला उपरती होते.. फक्त मधल्या स्टेप्स घडत नाहीत.. म्हणजे कंगना अजुनही तिला कंफरटेबल वाटेल अशाच नॉर्मल कपड्यात असते.. सतत घट्ट उराशी बाळगलेला स्वेटर तेवढा काढते.. पण ते कदाचित तिची भीती ओसरत जाते तसं ती जात मोकळी होते हे दाखवण्या इतपतच.. ती कूणालाही स्तब्ध करत नाही.. अवाक करत नाही.. कुण्णा कुण्णाला तिच्या शब्दबंबाळ डायलॉगमुळे उपरती होते नाही.. कुणाचही आयुष्य एक पल मध्ये बदलत नाही..
हे आणि हेच मला क्विन जाम आवडण्याचे कारण आहे.. कंगणाचा अभिनय तर सुंदर आहेच, पण दिग्दर्शनाचे प्रचंड कौतूक वाटले.. आणि हो, बरेच दिवसांनी प्रसंग आठवून आठवून हसण्यासारखा आणि गप्पा मारण्याजोगा पिक्चर दिल्याबद्दल्ही "क्विन"चे आभार.. पिराताई, लेख आणि त्यातले पंचेस जाम आवडलेत, हेवेसांनल.. :-)

रेवती 01/04/2014 - 18:27
वाहव्वा! ष्टोरी तरी आवडलीये हे वाचून! छान लिहिलयस. मेरेकूभी ये शिनेमा देखना हय. कब टैम मिलता अल्ला को मालूम! भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. हे वाक्य व यासंदर्भातील सगळी वाक्यं आवडली. भयंकर सहमत. ;)

पिरा..मस्स्स्त लिहिलयस! आधी फॅन्ड्री पाहिला आणि पाठोपाठ क्विन. दोन्हिकडे तीच घुसमट...मुक्त मोकळा श्वास घ्यायची तीच चिरंतन धडपड. पण फॅन्ड्री चा शेवट 'पुढे काय झाल असेल..?' ची फार भीषण उत्तरं देतो... तर क्विन चा शेवट म्हणजे पुढे काहितरी नक्की सुखद घडले असणार याची खात्री देतो.

In reply to by स्वप्नांची राणी

खरं तर विजय नाही तर अजय शी लग्न केलं हे उत्तर नसावं म्हणजे मिळवलं..! पण मुळात अशा बॅकग्राउंडच्या मुलीनं लग्न खानदान की इज्जत च्या नावाखाली मान्य केलं नाही हिच मोठी गोष्ट आहे..!

नगरीनिरंजन 01/04/2014 - 18:52
वा वा, पर्फेक्ट लिहिलं आहे. पिच्चर पाहताना असंच काहीसं वाटलं. शिवाय भारतीय ते भारी समजायच्या आणि सगळ्याचं भारतीयीकरण करायच्या प्रवृत्तीवर मारलेले शालजोडीतले तर अप्रतिमच आहेत. पण एक बात खटकली, क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं. वास्तवात भारतात राहूनच जगण्याची लढाई लढणार्‍या कित्येक अनग्लॅमरस क्वीन्स असतात. ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.

In reply to by नगरीनिरंजन

बॅटमॅन 01/04/2014 - 19:00
ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.
लोकं शाणी नैत हो आपल्याकडची. मूर्खांसाठी पिच्चर काढायचे तर ते टोन डौन केलेले असावेत तरच झेपतात, नैतर घंटा कै होत नै. किमान यात बेशिक गोष्ट तरी बरोबर दाखवलीय हेच लै आहे म्हंटो मी तर. तुमचा आक्षेप मान्यच आहे, पण लोकं मूर्खागमनी आहेत त्याला इलाज नै.

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन 01/04/2014 - 20:40
बरोबर आहे; पण मूर्खागमनी लोकांना तसेही अशा विषयांवरचे चित्रपट फारसे आवडत नाहीत आणि त्यांच्यामुळे ना कलाकाराला समाधान ना प्रेक्षकांना अत्युत्तम पाहिल्याचे समाधान. अर्थात चित्रपट चांगलाच आहे; पण अजून चांगला नक्कीच होऊ शकला असता एवढेच.

In reply to by नगरीनिरंजन

धन्या 04/04/2014 - 14:17
पण एक बात खटकली, क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं. वास्तवात भारतात राहूनच जगण्याची लढाई लढणार्‍या कित्येक अनग्लॅमरस क्वीन्स असतात. ही क्वीन मात्र (उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते. थोडक्यात बॉलिवूडच्या अनेक बावळट प्रथा मोडणारा चित्रपट महत्त्वाची गोष्टमात्र व्यावसायिक सोयीने जपून चालतो.
अगदी नेमकं मांडलंत.

In reply to by नगरीनिरंजन

क्वीन साहेबांना "भारी" व्हायला युरोपात जावं लागतं.
रानीसारखी स्वतःचा शोध घेणारी व्यक्ती उच्चमध्यमवर्गातली असेल याबद्दल मला फार शंका वाटत नाही. हे असे प्रश्न बूर्ज्वा वर्गालाच पडतात, परवडतात. या वर्गातले लोक जेव्हा रोमँटिक विचार करतात तेव्हा 'सरसों का खेत'चा किंवा मामाच्या गावाचा विचार करत नाहीत, ट्युलिप गार्डन किंवा फॅशन, सौंदर्यदृष्टी असणाऱ्या फ्रांस, पारी (पॅरीस)चा विचार करतात यातही मला काही विचित्र वाटत नाही. 'डोर'मधली, बऱ्या राजस्थानी घरातली तरुण विधवा स्वातंत्र्याचा विचार नवऱ्याशिवाय करू शकत नाही हे जितपत खटकत नाही तितपत मला हे ही खटकत नाही. आता चित्रपट सेट करतानाच गरीब-बिचाऱ्या, दुःखी-कष्टी बाईचा केला नाही, याला 'व्यावसायिक सोय' म्हणायचं असेल तर त्याबद्दल काही चर्चा संभवत नाही.
(उच्च)मध्यमवर्गीयांना भावेल इतपतच गोडगोडुलं वास्तव अनुभवते आणि भेटलेल्या मदतशील लोकांच्या कृपेने कोणतेही मोठे संकट न येता "सुखरुप" परत येते.
यातल्या छद्मामागचं कारणही समजलं नाही. एकटी परदेशात जाऊन भटकण्याचा अनुभव फक्त रानीला नाही, मलाही आहे. आणि अशा अनेक मुली माझ्या ओळखीच्या आहेत ज्या कामानिमित्त किंवा उगाच भटकायला परदेशात जातात. त्यांना काही वाईट अनुभव येत नाहीत, चांगले लोक भेटतात त्यांच्या ओळखीमुळे प्रवासात आणखी रंगत येते. पुढे हे संबंध टिकतात किंवा टिकत नाहीत. 'क्वीन' हा चित्रपट आहे, बातमीपत्रक नाही. काहीतरी वेगळं झालं, कोणावर अन्याय झाला तर बातमी येते. दारू प्यायलेल्या मुलीवर बलात्कार झाला (मुलावर दरोडा पडला) तर बातमी येते. दारू पिऊन, गांजा ओढून झिंगलेल्या मुलीची मित्रांनी काळजी घेतली, तिला कॉफी पाजली तर बातमी होत नाही. पण त्या प्रसंगामुळे त्या मुलीचं आयुष्य किंचित अधिक समृद्ध होऊ शकतं. या अशा तऱ्हतऱ्हेच्या अनुभवांमुळे मला उलट 'क्वीन' वास्तववादी असेलसा वाटतो. माझ्या दृष्टीने, उच्चमध्यमवर्गीय मुलींसाठी वास्तव जग हे असंच असतं. पण स्वतःचा शोध वगैरे चैन हवी कशाला, असं काही म्हणायचं असेल तर मग 'व्यावसायिक सोय' म्हणणं (पटलं नाही तरी) समजू शकतं. --- 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' रंगमंचावर आणणाऱ्या वंदना खरे म्हणतात - एकूणातच ‘दु:खाचा’ अनुभव पोचवणं ही अडचण नव्हतीच. स्त्रियांवर अत्याचार होतात आणि ते होऊ नयेत इतपत समजूत समाजात तयार झालेली आहे. खरी अडचण दिसली ती स्त्रियांनी स्वत:ला "सुख होत आहे" हे जाहीरपणे म्हटलेले पचवण्याची. अगदी जेन्डरविषयी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेदेखील येऊन सांगत असत की "बलात्काराबद्दल सांगणारे गंभीर भाग छान आहेत पण बाकी विनोदी भाग जरा कमी करा ना!"

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य 05/04/2014 - 04:11
दारू प्यायलेल्या मुलीवर बलात्कार झाला (मुलावर दरोडा पडला) तर बातमी येते. दारू पिऊन, गांजा ओढून झिंगलेल्या मुलीची मित्रांनी काळजी घेतली, तिला कॉफी पाजली तर बातमी होत नाही. पण त्या प्रसंगामुळे त्या मुलीचं आयुष्य किंचित अधिक समृद्ध होऊ शकतं.
फ्रेम करावा असा प्रतिसाद. अतिशय आवडला.
स्त्रियांवर अत्याचार होतात आणि ते होऊ नयेत इतपत समजूत समाजात तयार झालेली आहे
नक्किच.खरी
अडचण दिसली ती स्त्रियांनी स्वत:ला "सुख होत आहे" हे जाहीरपणे म्हटलेले पचवण्याची.
व्यवस्थीत कळला नाही पण कोणीही व्यक्ती तो सुखी आहे म्हणु लागला की जग जळु लागते हे वास्तव आहे. त्यात स्त्रि पुरुष भेद कितपत धरावा ?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नगरीनिरंजन 08/04/2014 - 05:37
मुळात जगात चांगले लोक आहेत यात दुमत नाहीच. रानी युरोपमध्ये फिरायला जाते वगैरेही ठीक. पण मुळात रस्ता चुकणे किंवा बॅग चोरीला जाण्याचा प्रसंग उद्भवणे किंवा झिंगलेल्या मुलीला कॉफी पाजणे हे फक्त युरोपातभारतात? इथे भारतात यासगळ्याबरोबर शारीरिक अंगलटीला वगैरे तोंड देत गावातून तालुक्याला कॉलेजसाठी जाणार्‍या मुलींची कमतरता नाही. अतिसुरक्षित वातावरणात वाढलेल्या आपल्याला बॅग चोरीचा प्रयत्न व झिंगल्यावर कोणीतरी कॉफी पाजली हेच प्रसंग लै भारी वाटतात म्हणून आपल्या मुक्तीच्या आणि वास्तवाच्या कल्पना फारच बाळबोध आहेत असे वाटते. घरून पैशाचं मजबूत पाठबळ असेल तर प्यारिसला एकट्याने जाणे म्हणजे स्वत्वाचा शोध असं असेल तर स्वतःभोवतीचा सुरक्षित कोश मोडायचा फार मोठा पल्ला गाठायचा आहे असेच मी म्हणेन. स्त्रियांना सुख होत आहे ही गोष्ट बोचणारे लोक असतीलच, म्हणूनच दुसर्‍याच्या जीवावर सुख मिळवू नये. विजयालक्ष्मीचं व त्या पाकिस्तानी मुलीचं पात्र मला आवडलं. त्यांच्या तुलनेत रानीचे स्वातंत्र्याकडे फक्त एक पाऊल आहे आणि त्याचंच इतकं कौतुक असेल तर अवघड आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे उत्तरेपेक्षा बरी स्थिती आहे तरीही इथल्या स्त्रियांना ती एकटी पॅरिसला जाते आणि तिला असे "अग्गंबाई" अनुभव येतात याचंच अप्रूप वाटावं हे अनाकलनीय आहे.

In reply to by नगरीनिरंजन

मला तिच्या पेरिसला जाण्याच कौतुक नाहिये.. कौतुक वाटतं ते जनरली अशा वेळेस महाराष्ट्र काय किंवा उत्तर भारत काय.. मुली दु:खाला कवटाळुन, स्वतःच्या नशिबाला बोल लावत..घरातच दडुन बसतात.. त्यात ती पॅरिसला जाण्याचा निर्णय घेते.. आता इथे ती आई वडीलांना "मला फार फार दु:ख झालय, जरा २-३ लाख काढा बरं..पॅरिसला जाऊन दु:ख हलकं करुन येते जरा.." असं म्हणत नाही.. तिचं स्वप्न असतं पॅरिसला हनिमुन ला जाणं. त्यासाठी तिने पैसे गोळा केलेले असतात.. इथेही "ज्या हनिमुनची स्वप्न आपल्या प्रियकरासोबत पाहिली, तिथे एक्ट्यानी जायचं म्हणजे कित्ती सॅड..." असं ही जनरली घडलं असतं.. पण तिचं स्वप्न तिला तिच्या दु:खा पेक्षा महत्वाचं वाटतं.. हे मला जास्त भावलं.. इथे मुद्दा "पॅरिस" चा नाहीचे.. स्वतःच्या स्वप्नाला पुर्ण करण्यासाठी दु:खाला मागे सारण्याचा आहे..ज्यानी आयुष्यात काहिही फरक पडणार नाहीये अशा रडारडी पेक्षा हातात असलेलं पॅरिसचं तिकिट वापरणे हा प्रॅक्टिकल विचार ती करते हे जास्त कौतुकास्पद आहे.. आता नेमकी तिचं स्वप्न हे "पॅरिसला हनिमुनला जाणे" हे असल्याने लोकांना आता पॅरिसच का? हनिमुनच का? असे प्रश्न पडत आहेत.. तिला तिथे सगळेच अनुभव चांगले येतात.. चांगलीच माणसे भेटतात.. आता हा कथेचा भाग झाला.. दरवेळी खुप अन्याय होऊन मग त्यातुन उभी राहिलेलीच स्त्री स्वतंत्र होते का? आणि आधीच भेदरलेल्या रानीसाठी लोकांनी चांगलं वागणं सुद्धा वेगळा अनुभव असु शकतो ना.. पारंपारिक घरातल्या रानीसाठी बाइनी तिर्‍हाईतासोबत झोपणे, लग्नाशिवाय झालेले मुल आनंदाने न अभिमानाने सांभाळणे, घरातल्यांचे पोट भरण्यासाठी स्ट्रिप क्लब मध्ये काम करणे हे अनुभवच धक्कादायी आहेत.. तिच्या साठी पब मध्ये दारु पिऊन, केस मो़कळे सोडुन नाचणं सुद्धा मोठी गोष्ट आहे.. कारण तिला घरात नातेवाईकांसमोर नाचणं सुद्धा "अलाऊड" नाही.. तिच्या दृष्टीने हे सगळच खुप लिबरेटींग आहे.. इथे तिची तुलना विजयालक्ष्मी किंवा इतर कुणाशी करुन कसं चालेल.. तिची परिस्थिती वेगळी होती.. म्हणुन तिच्यासाठी "स्वतंत्र" होण्याचा मार्गही वेगळा होता.. मोडलेलं लग्न परत जोडण्याची संधी मिळणं ही भारतीय मुलीसाठी निश्चित मोठी गोष्ट आहे.. स्वत: रानी सुद्धा विजयला म्हणतेच ना "आप जो कहेंगे मै वैसेही करुंगी.. ये शादी मत तोडीये..".. आयुष्यभर तुझ्या तालावर नाचायला मी तयार आहे इतकी ती अगतिक होते.. फक्त एक लग्न व्हावं म्हणुन.. अशावेळी जेव्हा विजय परत येतो तेव्हा त्याला नाकारणं ही मला मोठी गोष्ट वाटते.. मी जर रानीच्या जागी असते तर तसही विजयला समोर उभा केला नसता.. आणि तरीही ती स्वाभाविकच गोष्ट असती.. नो बिग डील.. रादर अपेक्षितच असतं अशा मुलाला नाकारणं.. पण भारतात (जिथे लग्न हा खानदानाच्या इज्जतचा सवाल असतो..)अशा अनेक रानी आहेत ज्यांच्यासाठी विजयला नाकारणं ही मुक्त होण्याची पहिली पायरी आहे..

In reply to by पिलीयन रायडर

चिगो 08/04/2014 - 16:39
प्रतिसाद आवडला, पिराताई.. "क्विन" हा चित्रपट रानीने स्वत:ला जाणण्याचा, एन्जॉय करण्याचा प्रवास आहे. त्याला ह्या किंवा त्या स्त्रीमुक्तीच्या कल्पना लावत "कंपॅरेटीव स्टेटमेंट" सारखं बघण्यात काय हशील?

In reply to by नगरीनिरंजन

आत्मशून्य 08/04/2014 - 17:33
त्यांच्या तुलनेत रानीचे स्वातंत्र्याकडे फक्त एक पाऊल आहे आणि त्याचंच इतकं कौतुक असेल तर अवघड आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे उत्तरेपेक्षा बरी स्थिती आहे तरीही इथल्या स्त्रियांना ती एकटी पॅरिसला जाते आणि तिला असे "अग्गंबाई" अनुभव येतात याचंच अप्रूप वाटावं हे अनाकलनीय आहे.
क्या. बात. मला हेच म्हणायचय. क्विन बघुन त्याणूभवात असलेल्या व्यक्तीचा अभिनीवेश, आणी अशा व्यक्तींसाठीच्या सहानुभुतीच्या कृत्रीम अभिनीवेशात लेखीकेने लिखाण करताना मोठी गल्लत करुन क्विन चित्रपटावर या धाग्यात अन्याय केला आहेच, पण त्यामुळे तिला नक्कि काय म्हणायचे आहे, बॉलीवुडला काय सांगायचे आहे, प्रत्यक्ष अशा स्थितीत गेलेल्या व्यक्तीरेखेची काय भावना असते आणी स्त्रिमुक्ती म्हणजे काय या डिमेनशनचा अचुक माग घेण्याचा बट्याबोळ या धाग्यात व्हायला वेळ लागलेला नाही. क्विन पात्र मस्त आहे. चकदे मधे नाही काय हॉकी-चंडीका क्रिकेटरला जिंकुन परत आल्यावर लग्नास नकार देते हे विसरुन की ती हारुन जरी परत आली असती तरी त्याने प्रपोज केलेच असते.

In reply to by आत्मशून्य

क्विन बघुन त्याणूभवात असलेल्या व्यक्तीचा अभिनीवेश, आणी अशा व्यक्तींसाठीच्या सहानुभुतीच्या कृत्रीम अभिनीवेशात
लेखीकेने लिखाण करताना मोठी गल्लत करुन क्विन चित्रपटावर या धाग्यात अन्याय केला आहेच, पण त्यामुळे तिला नक्कि काय म्हणायचे आहे, बॉलीवुडला काय सांगायचे आहे, प्रत्यक्ष अशा स्थितीत गेलेल्या व्यक्तीरेखेची काय भावना असते आणी स्त्रिमुक्ती म्हणजे काय या डिमेनशनचा अचुक माग घेण्याचा बट्याबोळ या धाग्यात व्हायला वेळ लागलेला नाही
मी काय म्हणते, तुम्हाला एवढं कळलय ना मग तुम्हीच का लिहीत नाही? कसं असतं ना शुन्य भाउ.. दुसर्‍याच्या लेखाची पीसं काढायला खरच काही अक्कल लागत नाही.. पण स्वतः विचार करुन १० ओळी लिहायला बरंच काही असावं लागतं माणसात.. हे जे काही तुमचं ओथंबुन वहात आहे ना, ते जरा नीट व्यक्त होऊ द्या की.. उगाच "बट्ट्याबोळ केलाय.. समजलच नाहीये.. अभिनिवेश आहे.." वगैरे पेक्षा मला तुम्ही स्वतःच एक परीक्षण लिहुन दाखवाच..

Dhananjay Borgaonkar 01/04/2014 - 19:09
झकास परी़क्षण. एकच नंबर आहे क्वीन. सगळ्यांनी भारी काम केलय. डायरेक्टरला १०० गुण. ताका,इटालियन शेफ,चित्रकार,कंगनाचा धाकटा भाऊ, आणि ऑफकोर्स विजे..भारी कॅरेक्टर्स आहेत. लेख वाचुन परत एकदा बघावासा वाट्टोय.

In reply to by Dhananjay Borgaonkar

सोत्रि 06/04/2014 - 22:31
लेख वाचुन परत एकदा बघावासा वाट्टोय.
चित्रपटाबरोबरच हे ह्या लेखाचीही यश! - (चित्रपट आणी लेख दोन्ही अतिशय आवडलेला) सोकाजी

सव्यसाची 01/04/2014 - 19:10
पिरा ताई, अगदी योग्य शब्दात मांडले आहे तुम्ही.. क्वीन पाहून आल्यावर खरेतर कितीतरी दिवस 'हंगामा हो गया' आणि 'रांझा' हि दोन गाणी मनात गुणगुणत होतो.. 'हंगामा हो गया' हे गाणे तर अगदीच आवडले.. राणी जेव्हा म्हणते कि 'हिंदी गाना लगा है' तेव्हा मी विचार केला कि अश्या प्रसंगात कोणते गाणे वापरले असेल दिग्दर्शकाने ?(कारण गाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता), पण जेव्हा हे गाणे ऐकले तेव्हा त्यातील शब्दनिशब्द अगदी समर्पक वाटला. इथे दिग्दर्शकाचे कौतुक करावे लागेल. चिगो सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप सटल (मराठी?) गोष्टी चित्रपटात आहेत.. उदा: ती फ्रांस मध्ये तिच्या नातेवाइकांना भेटायला जाते तो प्रसंग तर समाजात दांभिकपणा किती कुटून कुटून भरला आहे हे समजण्यास पुरेसा आहे, ती जेव्हा लीप कीस करते तेव्हा फक्त इम्रान हाश्मी किस करतो म्हणून सगळे भारतीय चांगले लीप किस करू शकतात हे तिचे गृहीतक, आयफेल टावर* पासून दूर पळतानाचा सीन, ती अ‍ॅमस्टरडॅममध्ये असताना जो टीशर्ट घालते तो पण तितकाच सूचक आहे (Alice In Wonderland with white rabbit), जेव्हा ताका आपल्या आईवडिलांचा फोटो होस्टेल मध्ये सोडतो तेव्हाच राणी पण आपली लग्नपत्रिका तिथे सोडते असो.. असे कितीतरी सुंदर, सूचक आणि समर्पक प्रसंग आहेत.. तिचे थँक्यु म्हणणे तर खूपच भावते.. सगळ्यात शेवटी टायटल येतात तिथे तरी ती Married असेल कि काय असे वाटत राहते पण टायटल संपले तरी ती सिंगलच राहते (Queen Foerver). हे अतिशय सुखद होते.. *- हे Tower मराठीत कसे लिहायचे ते कुणी सांगेल का?

जेपी 01/04/2014 - 20:40
मी पयला मनणार होतो पण पाच अनाहिताचा प्रतिसाद येऊ द्या मनल आणी गप राहिलो . परीक्षण आवडल पण पैसे मोजुन म . इं . हिं चित्रपट बगत नाय त्यामुळे टिवीवर आल्यावर बगेन

Prajakta२१ 01/04/2014 - 23:11
परीक्षण छान लिहले आहे मी हा picture youtube वर पहिला त्यामुळे असेल कदाचित पण जास्त भावला नाही इंग्लिश विन्ग्लीश चीच सुधारित आवृत्ती उत्तर भारतीय पंजाबी संस्कृती/समाज जीवनाचे चित्रण हाच फरक आणि शेवट चांगला घेतला आहे पूर्वी दूरदर्शन वर telefilms यायच्या १-२ तासांच्या तसा वाटला

चित्रपट खूपच चांगला आहे पण या निमित्ताने आपणच इतरांपेक्षा पुढारलेल्या विचारांचे कसे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे. परिस्थिती खूप अंशी बदललेली आहे. लग्न मोडणे, घटस्फोट, स्त्रियांनी तोकडे कपडे वापरणे, अविवाहीत राहणे या गोष्टींना शहरांमधे सर्रास आणि गावांमधे थोडीफार मान्यता मिळत आहे. उठल्या सुटल्या हौ एक्सायटिंग, यम्मी, सेक्सी असे करत किंचाळत राहण्यालासुद्धा दांभिक्पणाच म्हणतात. त्यापेक्षा समोरच्याची चौकशी, विचारपूस करणारा भारतीय भोचकपणा कितीतरी चांगला.

In reply to by अप्पा जोगळेकर

आपणच इतरांपेक्षा पुढारलेल्या विचारांचे कसे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे कोण "आपण" नक्की? समजले नाही..
उठल्या सुटल्या हौ एक्सायटिंग, यम्मी, सेक्सी असे करत किंचाळत राहण्यालासुद्धा दांभिक्पणाच म्हणतात
हो.. बरं मग? प्ययोजन काय ह्या वाक्याचे नक्की? मी कुठे म्हणलयं का असं?
त्यापेक्षा समोरच्याची चौकशी, विचारपूस करणारा भारतीय भोचकपणा कितीतरी चांगला.
अगत्य आणि भोचकपणा मधला फरक मी तुम्हाला सांगायला हवा का आता?!!

चित्रपट बरा आहे. या धाग्याबद्दल तसं म्हणता येणार नाही. चित्रपटात जे जाणीवपूर्वक टाळलं आहे (डायलॉगबाजी,सरसकटीकरण) ते धागाकर्तीला मात्र टाळता आलं नाही. माझ्या मते आता समाज देखिल बदलतो आहे आणि बॉलिवुडदेखिल. अवांतर- 'क्विन'ला सुद्धा गल्लाभरूपणा करण्याचा मोह पुरेपूर टाळता आला नाही. एरवी रानीला अ‍ॅमस्टरडॅमलाच न्यायचं कारण काय? रस्त्याच्या कडेला शोकेसमध्ये स्ट्रिप-टिझ करणार्‍या बायका दाखवता याव्यात, हे एक कारण असेल का?

In reply to by चिन्मय खंडागळे

समीरसूर 04/04/2014 - 17:31
गल्लाभरू असणं वाईट कसं? चांगलंच आहे गल्लाभरू असणं. त्याशिवाय इकॉनॉमी कशी चालणार? व्यवसाय आहे तो; सत्यनारायणाची पूजा नाही! आणि आपण किती खोटं बोलणार आहोत स्वतःशी? स्ट्रीप करणार्‍या बायकांची दृष्ये चवीने बघितली गेली नसतील? 'दोस्ताना'मधला चड्डी सरकवणारा जॉन अब्राहम चवीने बघितला गेला नव्हता? अहो, नैसर्गिक आहे ते. त्यात कसला आलाय गल्लाभरूपणा? आपण आपला ढोंगीपणा सोडू तो खरा सुदिन बाकी दसरे, दिवाळ्या, आणि गुढी पाडवे काय, येतच राहतील आणि ठराविक 'चैतन्याची गुढी', 'प्रकाशमान दीपावली' सारख्या छापील शब्दात गुडूप सुद्धा होतील. लेख खूपच छान आहे. विशेष म्हणजे धागाकर्तीचे स्वतःचे मत असल्याने बाकी सगळे पृथ्थकरणाचे मुद्दे आपोआपच गैरलागू होतात. पढने में मजा आया...और क्या चाहिये, भई? :-)

In reply to by समीरसूर

@अहो, नैसर्गिक आहे ते. त्यात कसला आलाय गल्लाभरूपणा? आपण आपला ढोंगीपणा सोडू तो खरा सुदिन>>> +++१११ आणि जोरद्दार टाळ्या!!! जे नैसर्गिक आहे,ते दिसलं आणि असलं तरी अमान्य करायचं आणि जे अनैसर्गिक आहे,त्याचं वैयक्तिक नितिमत्तेच्या(?) अंगानी समर्थन करत राहायच! हा या लोकांचा लाडका खेळ असतो.

In reply to by चित्रगुप्त

@सत्यनारायणाची पूजा हा सुद्धा भोळसट लोकांना गंडवण्याचा धूर्त व्यवसायच.>>> नुस्ता सत्य नारायण नाही हो..आमची सगळी धर्मव्यवस्थाच तशी आहे. आणि ती तशीच लोकांना हवी आहे. जर मी नारायणातलं सत्य सांगितलं,किंवा धर्माधिष्ठित सत्यातला "खरा" नारायण सांगितला तर माझा समाज "मला" स्विकारेल काय??? हाच खरा प्रश्न आहे. :)

In reply to by चिन्मय खंडागळे

एरवी रानीला अ‍ॅमस्टरडॅमलाच न्यायचं कारण काय?
अ‍ॅमस्टरडॅमच का? अंबेजोगाई का नाही.. ह्याला उत्तर नाही.. पण अगदी विचार केलाच की का अ‍ॅमस्टरडॅम.. तर मला असं वाटतं की आपण जितके स्वतःच्या कंफर्ट झोन मधुन बाहेर निघु तेवढे आपण स्वतःच्या जास्त जवळ जातो.. तेवढे आपण स्वतंत्र होतो.. कम्फर्ट झोन सुटल्याने आधी आपण धडपडतो.. सावरायला पाहातो.... पण आजुबाजुला हात देणारं कुणीच नाही हे जाणवलं की स्वतः तोल सावरायला शिकतो.. एकदा का आपल्याला ही जाणीव झाली की आपण स्वतःला सांभाळु शकतो, की माणुस मुक्त... एका दिल्ली कडच्या पारंपारिक वातावरणात वाढलेल्या मुलीसाठी अ‍ॅमस्टरडॅम हा फार मोठा कल्चरल शॉक आहे.. जो तिच्या साठी आवश्यक होता..

In reply to by पिलीयन रायडर

सव्यसाची 04/04/2014 - 22:35
चित्रपटामध्येच सांगितल्याप्रमाणे क्वीन चे आवडते शहर पॅरिस आणि त्याचे अ‍ॅमस्टरडॅम.. त्यामुळे हनिमूनसाठी दोघेजण हि शहरे निवडतात. चित्रपटात सांगितल्याप्रमाणे ते अंतर १०० किमी (किंवा मैल ) असावे. कित्येक लोकांची इच्छा असते परदेशात फिरायला जाण्याची.. तसेच चित्रपटात दाखवले तर त्यात गैर काय आहे ते कळले नाही..

In reply to by सव्यसाची

आत्मशून्य 06/04/2014 - 17:23
कित्येक लोकांची इच्छा असते परदेशात फिरायला जाण्याची.. तसेच चित्रपटात दाखवले तर त्यात गैर काय आहे ते कळले नाही..
प्वाइंटायम ट्राइंग टु मेक इज... हनिमुनला प्रवास करणे वेगळे आणी परेदेशात फिरायला आवडते म्हणून ते फिरताना दाखवणे वेगळी. जरुर फिरावे. पण त्यामागे हनिमुन चुकला म्हणुन हे कारण का बरे असावे ? लग्न मोडल्यावरच हे का दाखवावे ? म्हणजे लग्न संस्थेपेक्षा स्त्रि स्वातंत्र्य मोठ्ठी गोष्ट आहे हे अप्रत्यक्ष बिंब्वले जात नाहीये का ? जसे केजोच्या दोस्ताना नामक चुत्या चित्रपटात समलिंगी पध्दत मॉक करणारे लोक अतिशय स्मार्ट (अभ्या अन अब्र्या) अन स्ट्रेट आकर्षण राखणारे लोक अनकुल पर्सनॅलिटी (बॉबी देओल) दाखवुन गेइसम इज कुल हे अप्रत्यक्षपणे बिंबवायचा प्रयत्न केला न्हवता काय ? तिथे बॉबी देओलच्या ऐवजी सलमान नाही भेटला गेस्ट कलाकार म्हणून त्या रद्दड बॉबी देओलला का घेतले? असो, लग्न संस्थेपेक्षा (स्त्री)स्वैराचार ही मोठ्ठी गोष्ट आहे हे अप्रत्यक्ष बिंब्वले जात नाहीये का.. मला इतकेच म्हणायचे आहे भारतीय स्त्रीची मानसिकता प्रश्न वेगळे आहेत तिच्या आनंदाला भारताची पार्श्वभुमी हवी परदेशाची नको.. असेल आवड-गरज परदेश फिरायची, रहायची, नोकरी करायची पण अमेरीकी स्त्रियांचा हॅपिनेस इंडेक्स कमी होतोय...हे मी नाही, शास्त्रज्ञ बोलतात. गुगल करा, नाहीच मिळाला विदा तर मी अधिकृत लिंक देइन. म्हणजे पुर्वी स्त्रियांवर जेंव्हा बंधने होती तेव्हांचा इंडेक्स आणी आता अत्यल्प बंधने असतानाच्या हॅपिनेस इंडेक्स दोन्ही पडताळुन बघितल्यावर हे चकितजन्य सत्य सामोरे आले आहे. म्हणून क्विन हा निरागस स्त्रियांची भ्रामक दिशाभुल करणारा व चित्रपट ज्का गणू नये असा विचार येतो.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 06/04/2014 - 18:30
लग्नसंस्थेपेक्षा स्वैराचार महत्त्वाचा असे त्या पिच्चरमधून बिंबवले जात आहे असे मला वाटत नै. लग्नव्यवस्थेतही कैक गोष्टींचे अवडंबर फुका माजवलेय ते झुगारले तर आभाळ कोसळत नै असा ओव्हरऑल टोन आहे पिच्चरचा. आणि तो मला पटतो. बाकी हॅपिनेस इंडेक्सबद्दल म्हणाल तर..स्वातंत्र्य म्ह. स्वैराचार असे समीकरण करणार्‍यांनी दु:ख ओढवून घेतलेले आहे. काही झाले तरी शेवटी पुरुष काही प्रसूत होणार नाहीत. एका मर्यादेपलीकडे स्त्रीपुरुषांत भेद हे राहणारच. पण त्यामुळे संसारात एकावरच जास्त बंधने असावीत हे पटत नाही. शेवटी स्वातंत्र्य म्ह. देखील दुधारी तलवार आहे, तिचा वापर करायला अक्कल लागते. पण ते न देणे म्ह. बेसिक हक्क नाकारणे असल्याने ते दिलेच पाहिजे. बाकी मग ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे जो तो आनंदी वा निराश होईल.

In reply to by बॅटमॅन

आत्मशून्य 06/04/2014 - 18:35
लग्नसंस्थेपेक्षा स्वैराचार महत्त्वाचा असे त्या पिच्चरमधून बिंबवले जात आहे असे मला वाटत नै. लग्नव्यवस्थेतही कैक गोष्टींचे अवडंबर फुका माजवलेय ते झुगारले तर आभाळ कोसळत नै असा ओव्हरऑल टोन आहे पिच्चरचा. आणि तो मला पटतो.
मग स्वैराचाराचे (स्वछ्चंदीपणा म्हणा पण तो हळु हळु स्वैराचारच बनतो) अनुभवच नायिकेचे जिवनानुभुवविश्व समृध्द करताना का दाखवले आहे ? ते सुधा नेमके लग्न तुटल्यावर ? फिरायला तर कोणीही केंव्हाही परदेशात जाउ शकते, पण तुटलेल्या लग्नाच्या हनीमुनच्या तिकीटाचे कारण काय मानसिकता दर्शवते ?

In reply to by आत्मशून्य

=)) Before Sunrise मधे स्त्रीमुक्ती घुसडलेली नाही, असं म्हणणं हेच मुळात स्त्रीमुक्ती आणि Before Sunrise दोन्ही गोष्टी न समजल्याचं लक्षण आहे. Before Sunrise च्या विनोदाची जातकुळीसुद्धा फार नर्मविनोदी आहे. "(Before Sunrise मध्ये) स्त्रिमुक्ती वगैरे मसाला न घुसडता" हे वाक्य एपिक आहे, फेसबुकावर वापरण्याची परवानगी द्या प्लीज. इतरांनाही थोडं हसायला येईल. Before Sunrise मधली सेलिन मुक्त स्त्री आहे, ती काल भेटलेल्या माणसाबरोबर झोपते ते चालतं, पण भारतीय रानीने मात्र लग्न मोडल्यावर आनंद शोधावा, स्वतःचा शोध घ्यावा, मुक्तता पहिल्यांदा अनुभवावी तर ते नाही चालणार. आमच्या देशातल्या स्त्रिया बुरख्यात आणि स्वयंपाकघरातच पाहिजेत. का तर आम्ही कालच शोध लावला ना, 'सिंहासना'वर असताना, "भारतीय स्त्रीची मानसिकता प्रश्न वेगळे आहेत..."

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्मशून्य 07/04/2014 - 19:45
मला या चित्रपटातिल आपल्या आवडीचा एक प्रसंग सांगावा. तुम्हाला तुमच्या घोड्चुका समजायला सुरुवात करता येइल.

In reply to by आत्मशून्य

बॅटमॅन 06/04/2014 - 19:13
तो एक प्रसंग दाखवला म्हणून तेवढ्यावरून मानसिकतेचा आरोप करणे मला पटत नाही. असे तर कुठलाही प्रसंग दाखवला तरी त्याबद्दल विचारता येईल, नै का?

In reply to by आत्मशून्य

सव्यसाची 06/04/2014 - 19:09
आत्मशुन्यजी, हनिमूनला जायला तिने फ्रांस निवडले आहे. आता लग्न तर नाही झाले. मग त्या तिकिटाचे काय करायचे हा एक व्यावहारिक विचार. शिवाय आपल्या आवडत्या शहरात जाण्याची अशी दुसरी संधी परत कधी मिळणार हा दुसरा विचार. आता ते तसेच का? किंवा कथा अशीच का लिहिली याला काही कारण नाही देता येणार. लग्न संस्था महत्वाची नाही असा जर कथेचा संदेश असेल तर कथा अशी झाली असती: लग्न राणीने मोडले असते. तिकीट तयार आहेच असे म्हणून ती हुंदडून आली असती. आता परत कधी आली असतीं, कशी आली असती याची कल्पना मी तरी काही करत नाही. पण जी कथा आपल्याला समोर दिसते ती अशी नक्कीच नाहीये. माझ्या मते कुठलाही स्वैराचार बिंबवला गेला नाहीये. निरागस स्त्रियांची दिशाभूल वगैरे असे शब्द मी वापरणार नाही कारण प्रत्येक लेख, पुस्तक, चित्रपट त्या अर्थाने 'दिशाभूल करणारे साहित्य' या सदरात मोडेल.

स्पंदना 02/04/2014 - 02:48
पिरा सिनेमा परिक्षणाच्या क्षितिजावर नवा तार उगवला असे म्हणेन. पिक्चरच धावतं फ्रेम बाय फ्रेम समालोचन आवडल. लिहायची स्टाइल सुद्धा आवडली.

पिशी अबोली 02/04/2014 - 15:28
पिराताई, खूपच सुंदर गं... बाकी टिंगलटवाळी करता येण्यासारखं या चित्रपटात काही सापडलं नसल्याने एरवी स्त्रीस्वातंत्र्य या विषयावर अखंड जळणारे आत्मे यातून खुस्पटं काढायला तळमळतील, तेव्हा मजा येईल. असो... पुन्हा बघणार आहे, नक्की... :)

दिव्यश्री 02/04/2014 - 15:55
भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. , एक तर ते झालंच पाहिजे.. >>>++++++++++++++++++++ ११११ ११११ ११११ ११११ १११ १११ अजुण पहिला णाही . पाहिल्यावर परत पर्तिक्रिया देण्याचा प्रयत्न असेल . :)