Skip to main content

आलिया निवडणूक असावे सादर !!

लेखक चिनार यांनी मंगळवार, 13/05/2014 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक दिवस ज्याची वाट बघत होतो तो मतदानाचा दिवस आता चोवीस तासांवर आला होता. " उद्या मतदान करायचं " एवढा एकच विचार मनात घोळत होता . याआधी दोन -तीन वेळा मतदान केलं असलं तरी यावेळचा मतदानाचा उत्साह काही संपता संपत नव्हता. जणू काही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही माझ्या एका मतानेच हादरणार होती. मला आज सकाळपासूनच माझ्या लहानपणीचं निवडणुकीच्या वेळेस चं वातावरण आठवत होत. कोणत्यातरी एका निवडणुकीच्या वेळी गल्लीतल्या आम्हा सगळ्या मुलांमध्ये प्रचारपत्रकं गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. म्हणजे अक्षरश: भोंगा लावून प्रचार करत फिरणाऱ्या ऑटो किंवा टांग्याच्या मागे धावत जाऊन आम्ही पत्रकं गोळा करायचो.

अशीच एक फँटसी..(४)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 12/05/2014 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एक फँटसी..(१) अशीच एक फँटसी..(२) अशीच एक फँटसी..(३) रविवारी सकाळी तो अन उर्मी श्री श्री गुरुदेवांच्या प्रशस्त हॉलमध्ये बसून भक्तजनांची गर्दी कमी होण्याची वाट पहात होते. श्रीश्रींची एकांत भेट मिळण्यासाठी त्यांना दीड तास थांबावे लागले. अखेर एकदाची भेट मिळाली अन अर्णवने आपली नवीन समस्या सविस्तरपणे गुरुदेवांच्या कानावर घातली. त्याचे बोलणे संपेपर्यंत गुरुदेव शांतपणे डोळे मिटून ऐकत होते. त्यानंतरही पाचेक मिनिटे त्यांनी डोळे उघडले नाहीत.

तुम बीन जाऊं कहां...

लेखक Atul Thakur यांनी सोमवार, 12/05/2014 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम बीन जाऊं कहां" या गाण्याचा विषय निघाला कि रफी आणि किशोरचे चाहते तलवारी पाजळुन बसतात आणि मग खणखणाट सुरु होतो. राजेशखन्नाच्या जमान्यात चित्रपट पाहायला सुरुवात केलेली पिढी निर्विवादपणे या गाण्यात किशोरच वरचढ आहे असा निवाडा देते. मला या वादात पडायचं नाहीय. माझं रफीप्रेम मला रफीच वरचढ आहे असं म्हणायला लावणार. मात्र चित्रपटापुरतं बोलायचं झालं तर किशोरवर अन्याय झाला आहे असं नक्कीच वाटतं. चित्रपट पाहताना गाणं बेमालुमपणे सिच्युएशन मध्ये मिसळलं असेल तर त्याची लज्जत काही औरच असते.

लोकसभा २०१४ बीजेपी सरकार

लेखक वेताळ यांनी सोमवार, 12/05/2014 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
आजच आपली लोकसभा २०१४च्या निवडणुकीचे मतदान संपले. खुपच प्रदिर्घ चाललेले जवळजवळ ९ टप्प्या पर्यत चाललेले मतदान असलेली ही पहिलीच निवडणुक होती.

सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/05/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे.

कुssssफ्लिssssये

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 12/05/2014 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
काय मंडळी, शीषर्कावरुन आरोळि/हाक ओळखीची वाटतेय का? मग दाहक उन्हाळा आणि थंडगार कुल्फि ह्यांच नातं आहेच तस घट्ट. आंब्याचा ऋतु असल्यामुळे आंबा घालुन कुल्फि तर केलीच पण ती सेट सुद्धा जssssरा वेगळ्या पद्धतीने सेट केली. कसं??? चला सांगतो बरं... Kulfi 1 साहित्यः १. तयार घट्ट आंबे - २ २. मिल्क पावडर - २ कप ३. काजु पावडर - १ कप ४. पिस्ता पावडर - १/२ कप ५. साखर - चवीप्रमाणे कमी/जास्त ६. आंब्याचा पल्प/रस - २ कप ७. कार्निशन ईव्हॅपोरेटेड मिल्क - १ टिन ८.

९० डिग्री साऊथ - १०

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 12/05/2014 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
९० डिग्री साऊथ - ९ स्कॉटची तुकडी काही वेळातच आपल्या पुढील कँपवर पोहोचली. इथेच त्यांनी घोड्यांची हत्या केली होती. घोड्याचं मांस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांनी भरपेट जेवण करुन विश्रांती घेतली. इथून पुढे मध्ये असलेल्या डेपोतील सामग्रीच्या सहाय्याने एक टन डेपो गाठणं त्यांना शक्य होणार होतं. रॉस आईस शेल्फवर अर्धवट शुध्दीत असलेल्या टेडी इव्हान्ससह लॅशी आणि क्रेनची वाटचाल सुरु होती. मात्रं खराब हवामानामुळे त्यांची प्रगती खूपच हळू होती. त्यांच्याजवळ अन्नपदार्थांचा साठाही मर्यादीत प्रमाणात होता.

कलगीतुरा- भाग ४

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 12/05/2014 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग खालील लिंकमध्ये वाचणे. कलगीतुरा- भाग १ कलगीतुरा- भाग २ कलगीतुरा-भाग ३ "तर मित्रांनो, उद्धवजी आणि राजजी त्यांचे विचार मांडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आपणा सर्वांची उत्सुकता आता ताणलेली आहे. जास्त "ताणण्याआधी" आपण एक अगदी छोटीशी विश्रांती घेऊ या. कुठेही जाऊ नका." वाशाने "ताणण्याआधी" या शब्दावर जोर दिला. पुन्हा जाहीराती सुरू झाल्या.

मनमोहनसिंह यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य.

लेखक कलंत्री यांनी सोमवार, 12/05/2014 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. मनमोहनसिंह यांचे प्रंतप्रधान म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य दिल्लीमध्ये प्रशस्त अश्या ठिकाणी व्यतित होणार आहे. वर्तमानपत्रातील बातम्यानूसार एका २ १/२ एकरातील भू़खंडावर ४ शयन घर, हिरवळ, उद्यान इत्यादींची सोय असेल. उच्च पदस्थ लोकांचे जीवन कधी कधी आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात झाकले जाते. त्यांनी देशाला दिलेले योगदान विसरले जाते. कधी कधी नकळतच ते वादामध्ये गुरफटले जातात उदा. प्रतिभा ताई पाटिलांचे निवृत्तीनंतरचे वास्तव्य, त्यांना मिळालेल्या भेटी गाठी इत्यादी. मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात.