भुरका / तिखटी
ठेचा खर्डा यांच्या नातेवाईकांमधला अजून एक पदार्थ ....
आमच्या मराठवाड्यात विशेषतः परभणी-बीड या भागात भुरका फार आवडीचा. शिळी भाकरी असो की रसाचे जेवण, भुरक्याचे एक बोट चाटले की जिभेवरचे सगळे शेवाळ गेलेच पाहिजे.नव्या घासाच्या नव्या चवीसाठी जीभपण नवी! या प्रकाराला काही ठिकाणी 'तळलेले तिखट ' असेही म्हणतात.
हा चटणीचा एक प्रकार आहे. करायला सोपा. तिकडे नुसते तिखट वापरून करतात.
मिसळपाव
साहित्य
- बाळकांदे
- २ लिंबांचा रस
- लोणचे मसाला
- फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि मेथीदाणे
कृती
बाळकांदे सोलून घ्या. हे त्रासदायक प्रकरण आहे. वर दाखवलेला आख्खा गुच्छ सोलायला जवळजवळ दोन तास लागले.
लिंबाच्या रसात सोललेले कांदे, मीठ आणि लोणचे मसाला घाला. एखादी वाटी किंवा masher घेऊन या मिश्रणात कांदे ठेचून घ्या, म्हणजे कांद्याचा रस, लोणचे मसाला आणि लिंबाचा रस एकजीव होईल.