मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जिर्‍या-मिर्‍याचा खाकरा

सानिकास्वप्निल ·
. साहित्यः १ वाटी कणीक १ टीस्पून भाजून, भरडसर वाटलेले / कूटलेले जीरे १ टीस्पून कूटलेली काळीमिरी मीठ चवीप्रमाणे १ टीस्पून तेल . पाकृ: कणकेत जीरे, मिरी, मीठ व थोडे तेल घालून घट्ट कणीक भिजवून घ्यावी. झाकून १५

आणखी एक मध्यवर्ती डोंबिवली कट्टा.....

भाते ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार लोक्स, कट्टा नियोजन अधिकारी मा. श्री. मुक्तविहारि यांच्या मार्गदर्शनानुसार ऊत्त्सवमुर्ती 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' यांच्यासोबत मध्यवर्ती डोंबिवलीमध्ये कट्टा करायचे ठरले आहे. काय करणार, सर्वात जास्त मिपाकर मध्यवर्ती डोंबिवलीतले असल्याने, इथे वारंवार कट्टे होणे सहाजिकच आहे! बाकीच्या नेहमीच्या इतर गोष्टी खालीलप्रमाणे… तारीख / वार : ४ एप्रिल २०१४ / शुक्रवार ठिकाण : हॉटेल नंदी पॅलेस, डोंबिवली वेळ : संध्याकाळी ७:३० वाजता

कार्पोरेट

चिनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कॉलेज चे सोनेरी दिवस सरत असतानाच आम्हाला भविष्याचे वेध लागले होते. आता आपण कार्पोरेट विश्वात पदार्पण करणार ही जाणीव आम्हाला सुखावून जायची . बघता बघता कॉलेज संपल .पण कॉलेज मधून बाहेर पडताच मनात आलेला पहिला विचार म्हणजे , " आता डोक्यावर कॉलेजच छप्पर नाही " असा होता .त्या छपराखाली आम्ही किती सुरक्षित होतो हे कार्पोरेट विश्वाचे चटके बसल्यावर कळलं . मग तो सोनियाचा दिन आला आणि आम्ही कंपनीत रुजू झालो . ‘Induction programme, Traning session’ असे करत करत भरभर दिवस पुढे जात होते . त्याकाळात कंपनीच्या भव्य इमारतीपासून ते मशीनमधल्या बेचव कॉफी पर्यन्त सगळ्या गोष्टींच कौतुक वाटत.

माझा पहिला स्मार्टफोन्

चिनार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर "पूरब से सुर्य उगा" असं एक गाणं लागायचं. भारत सरकारच्या साक्षरता अभियानाची ती जाहिरात होती. त्या अभियानाच पुढे काय झालं ते माहिती नाही. पण त्यातून साक्षर झालेल्या जनतेसमोर लवकरच एक नवीन आव्हान निर्माण झालं. अक्षरओळख तर झाली, लिहिता - वाचता पण यायला लागलं पण , "कॉम्पुटर येतो का तुम्हाला ?" या प्रश्नाच "नाही" असंच उत्तर द्यावा लागायचं. नंतर त्या गरीब जनतेनी महत्प्रयासाने कॉम्पुटर सुद्धा शिकून घेतला. पण आता परत त्याच जनतेसमोर आणखी एक आव्हान निर्माण झालं आहे. त्याच जनसमुदायाचा मी एक प्रतिनिधी आहे. " मला सुद्धा स्मार्टफोन्स वापरता येत नाहीत".

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ५

स्पार्टाकस ·
२००८ २००८ च्या मोसमात के २ च्या बेस कँपवर अनेक वेगवेगळ्या मोहींमातील गिर्यारोहकांनी मुक्काम ठोकला होता. त्यांच्यापैकी काहीजणांनी यापूर्वीही के २ वर चढाईचा प्रयत्न केला होता. काही जणांची मात्र ही के २ वरील पहिलीच मोहीम होती. किम जे सू च्या दक्षिण कोरीयन अ‍ॅब्रझी स्पर फ्लाईंग जंप मोहीमेत सर्वात जास्त - १५ गिर्यारोहक होते. सुप्रसिध्द महिला गिर्यारोहक गो मी यंग हिचा त्यात समावेश होता. अनुभवी गिर्यारोहक असलेल्या गो ने पूर्वी मकालू, कांचनगंगा आणि धौलागीरीवर यशस्वी चढाई केली होती.

नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द

कौशिक लेले ·
ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या यशस्वी आणि लोकप्रिय उपक्रमानंतर काल गुढीपाडव्याच्या - मराठी नवीन वर्षाच्या - शुभमुहूर्तावर मराठी भाषा विषयक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जो आहे - "नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द". चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!. हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही.

क्विन...

पिलीयन रायडर ·
लेखनविषय:
परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. क्विन! आवडला.. जाम आवडला.. क्विन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय.. भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी.. तिचं लग्न मोडतं.. भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे..

< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी ? >

प्यारे१ ·
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे....... मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. मराठी संस्थळं हे आंतरजालावरचं लोकप्रिय साधन.

मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी

drsunilahirrao ·
लेखनविषय:
भर्जरी दुःखात होतो नेहमी मी तुझ्या कर्जात होतो नेहमी शोधिसी आता मला दुनियेत या मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी तू जरी केले न दिसल्यासारखे मी तुझ्या लक्षात होतो नेहमी आसवे उबदार तू मजला दिली मी असा श्रीमंत होतो नेहमी ! तू जरी रस्ताच माझा सोडला मी तुझ्या रस्त्यात होतो नेहमी ! मी जरी पापी न होतो फारसा पण तिथे स्वर्गात होतो नेहमी मी तुझ्या हास्यामधे होतो कुठे पण तुझ्या अश्रूंत होतो नेहमी मी तुझ्या भाग्यामधे नसलो तरी हातच्या रेषांत होतो नेहमी ! डॉ.सुनील अहिरराव

' दे टाळी ' - ' घे टाळी '

अमोल केळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
च्यायला, च्यामारी ( घाटी शब्द ) लहानपणी तुम्ही मित्राला कधी टाळी दिली नाहीत का? आम्ही तर टाळीवरुन एक खेळ ही खेळायचो ' दे टाळी ' म्हणले की ' घे टाळी ' मग पुढे घे पोळी मग दुसरा म्हणायचा ' घे , गोळी' दे विडा आणि शेवटी खा . ' किडा ' असे म्हणायचे आणि खो खो हसायचे, गंमतीचे दिवस होते ( आमच्यात किडेगिरी करायची बी ही अशी लहानपणीच रुजली होती , असो ) मुंबईतली मुले असा खेळ खेळायची नाहीत का? बहुतेक नाहीच नाही तर एका समवयस्क भावाने ' घे टाळी ' म्हणले असताना दुसरा भाऊ , फोन नाही आला म्हणून रागावून बसला नसता.