आदित्यवर्मन आपल्या घोड्यावरुन पायऊतार झाला. कित्येक योजने तुडवलेल्या आपल्या टाचां झाडत वातायन, आदित्यवर्मनाचा अश्व, ऊभा ठाकत विश्रांती घेउ लागला. संध्यासमयी पसरलेल्या लालिमेने पश्चीमेकडचे आसमंत जणू काहि पेटून ऊठले होते.. आदित्यवर्मनची अवस्थाही काहि वेगळी नव्हती.
त्या लालिमेला अडवत, आसमंताला जणू आव्हान करत बेदरकारपणे एक पाषाण ऊभा ठाकला होता.आदित्यवर्मनने त्या पाषाणाकडे एक नजर टाकली अन कसल्याशा आवेगाने धाव घेत तो त्यावर जाउन ऊभा राहिला.. तिथुन खाली पसरलेल्या अथांग, हिरव्यागार अरण्याकडे नजर टाकत त्याची नजर कसलातरी शोध घेत, भिरभिरत राहिली.