इमानदार माणूस आणि त्याचा झाडू
काल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला.
खरंच, गेल्या वर्षी एका इमानदार माणसाने हातात झाडू घेतला होता. तो सर्वांना म्हणाला त्याच्या हातातला झाडू चमत्कारी आहे, या झाडूने तो सर्व भ्रष्टाचार स्वच्छ करणार.
मिसळपाव