मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

. . हत्या आणि राजकारण !

आशु जोग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आमच्याकडे पहा. हत्येचेही कसे राजकारण केले जाते. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. त्यानंतर ६ महिने झाले तरी त्यांच्या हत्येचा तपास लागू शकला नाही. त्यावेळी काही लोकांनी फेसबुकवर तपास न लागण्याचा निषेध केला. फेबुवर आपला प्रोफाईल काळा ठेवला. आता हे लोक कोण होते ? यातले अनेक जण असे होते ज्यांनी दाभोळकर, त्यांची अनिस, त्यांची विचारधारा याला कायम विरोध केला. मग अचानक या लोकांचे दाभोळकर प्रेम कसे उफाळून आले ? ज्या काळात हत्या झाली आणि तपास सुरु होता त्या काळात राज्यात आणि देशात काँग्रेस आणि रा काँ यांचे सरकार होते. त्यामुळे निषेधामागे दाभोळकर प्रेम नसून कॉ आणि रा कॉ यांना झोडपण्याची मिळालेली एक निवडणूकपूर्व संधी होती. काही लोक असेही आहेत, जे पूर्वीपासून दाभोळकरांबरोबर होते. हे लोक ठराविक दिवसांनी एकत्र येतात. निषेधाच्या सभा घेतात. पेपरला निवेदने देतात. "व्यक्तीचा खून करता येतो. विचारांचा नाही" हे ऐकवत असतात. म्हणजे यानिमित्ताने हे लोकही कुणाला तरी झोडपत असतात. तपास लागलेलाच नसेल तर कोणत्या काल्पनिक गोष्टीला ते झोडपत असतात... बरं यानिमित्ताने त्यांनी अनेकांना झोडपलेलं आहे. म्हणजे जोवर खुन्याचे नाव जाहीर होत नाही तोवर हा खेळ रंगणार आहे... गांधीजींनाही त्यांच्या हयातीत अनेकांनी विरोध केला. पुढे गांधीजींची हत्या झाली. कल्पना करा... हत्या करणारा कुणी पाकिस्तानवादी असता तर... काय झालं असतं ? तर हे गांधीविरोधक पाकिस्तानवाद्यांना झोडपण्याची संधी मिळत्ये म्हणून तात्पुरते का होइना गांधीभक्त झाले असते...आणि त्यांनी रान पेटवलं असतं. (पाकिस्तानवादी याचा अर्थ विचारु नये) पण तसे झाले नाही. जे नाव पुढे आले ते विरोधकांसाठी अत्यंत गैरसोयीचे होते ! या नावामुळे गांधीविरोधक ऐतिहासिक रित्या बॅकफूटवर गेले, ऐतिहासिक रित्या कोंडीत सापडले. पुढची अनेक दशके सफाई देत बसले... खरंच या देशातले हत्येनंतरचे राजकारण पाहून उबग येतो...

ashu jog


वाचन 7287 प्रतिक्रिया 25