सामान्य काक (कार्यकर्ता, कावळा नाही) : केंद्रात नरेंद्र .. महाराष्ट्रात देवेंद्र , आठवले का काही .
राम (अयोध्याचा नाही, आठवलेंचा) : आणि दूरुन स्मित हसतोय शरदचंद्र .. जमलेना मस्त ?
काक : जमले आहे, पण उठा बाबा आता ?
राम : का हो उठू ?
काक : अहो उ. ठा. आणि बाबा यांचे काय ? असे बोललो.
राम : थांबा मोदी नी त्या बद्दल काय बोलायचे सांगितले आहे ते पाहतो आणि मग बोलतो ..
दादा : विसरू नका , आम्ही सर्व घड्याळामध्ये पाहून आणि तारखेनुसार काम करतो .
काक : .ऑ ?
दादा : आज तारीख १२. त्यात ११/१२/२०१४ बेरीज बघा बरोबर १२.