मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.....रिप रिप रिप ! !

फिझा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
रिप रिप रिप........ मोड़कळिला आलेले घर त्या गल्लीतले शेवटचेच, अजुनही चातक बनुन चिवटपणे उभे असलेले , कालच्या पावसाने पुन्हा एकदा झोड़पले पाऊस नेहमी सारखाच.... ..........रिप रिप रिप खिड़कीची धूसर झालेली काच आधीच तडकलेली.. आता नि:शब्द! पावसाच्या एक एक थेंबाला रस्ता दाखवत ती चिर .....कृतार्थ ! जुनाट चौकट भिजलेली... सगळंच ... ..........रिप रिप रिप पाउस आणि अंधार सोबतीला एकटी.... दाराची गंजलेली बीजागिरी, काळ्या भिंती सावल्या झेलत उभ्या मिणमिणत्या कंदिलाच्या उजेडात, काजळी अंधारातही दिसणारी..... सगळंच .............रिप रिप रिप झाडाची सळ सळ थांबली अन पाऊसही ओसरला, चुलीवरले निखारे अजुनही तप्त इतक्यात कुणी येईल म्हणून..... दारात कंदील घेउन ती माय उभी ! .....इतक्यात उजाड़ू लागलंय ! ........कंदीलही निवलाय ! ....सगळंच कसं लख्ख उजळलंय ! पण अजुनही छत गळतंय..... ..........रिप रिप रिप ---------फिज़ा !

वाचने 1332 वाचनखूण प्रतिक्रिया 3
दर वेळी तितकीच अस्वस्थता जाणवली. विषय काही फार जगावेगळा नाही. मांडणी, वृत्तबंधताही खूप बंडखोर नाही, उपमा-उत्प्रेक्षाही नवीन अजिबात नाहीत. तरीही ओलेचिंब भिजलेलो असताना आडोश्याला अंगावर उडणारे पागोळ्यांचे चुकार तुषार जितके प्रकर्षाने जाणवतात आणि एक प्रकारचा वैताग आणतात तशी ही कविता, तिचे एकेक कडवे मनाला कुठेतरी टाचताहेत. पाउस आणि अंधार सोबतीला एकटी.... दाराची गंजलेली बीजागिरी... मोडकळीला आलेले घर, गंजलेली बिजागिरी, अंधाराचे भय, पावसाच्या हालअपेष्टा, आणि त्यातूनही पुढच्या क्षणाची वाट पाहण्याचा आशावाद, आणि सकाळी सगळ्या जगात उजेड पसरला तरी त्या घरात झालेला अंधार,... काय झाले असेल म्हातारीचे? कवीने काय सुचवले आहे विझलेल्या कंदिलाच्या माध्यमातून? सगळीच भयाण अस्वस्थता... छ्या: उगीच वाचली कविता...!

गणेशा 13/11/2014 - 13:21
कविता आवडली .. कधी कधी दिवस उजाडल्यावर कित्येकांची स्वप्ने अशीच उजाड होतात