ही कथा आहे का? नाही ही कथा नाही, पण जे काही घडले होते ते एखाद्या कथेतीलच असते. तर किती बरं झाले असते. असं झाले असते, तसे झाले असते असे म्हणून आता काय उपयोग! जे घडायला नको होते ते घडले होते. देवासारखी माणसं शैतानागत वागली म्हणायची की भूताने झपाटली म्हणून तशी वागली ते त्या बिरोबालाच ठाऊक. पण जे काही घडलं भयंकर होते, असे कधी घडेल आणि त्या पापाची फळे अशी येथेच भोगावी लागतील, याची किंचित जरी कोणाच्या मनात शंका आली असती, तरी हा अनर्थ टळला असता. पण...
दूरवर पसरलेलं जंगल, उत्तरेकडे आई-बापाचे दोन डोंगर, आणि त्या दोन डोंगराच्या कुशीत वसलेले, लहानसं, पण तसे संपन्न असलेले गावं!