मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दुसर्‍या विश्रांती सत्रानंतर आज पाचवा डाव खेळला जाईल. आनंदला जर सामना जिंकायचा असेल तर आजचा डाव अनेक कारणांनी अतिशय महत्त्वाचा आहे. एकतर गुणसंख्या २-२ अशी समान आहे आणि आनंदची आज पांढरी मोहोरी आहेत. शिवाय उद्याचा डाव सहावा आहे तिथे सामना निम्मा संपतो. नियमानुसार पुढचा निम्मा सामना सुरु होताना मोहोर्‍याच्या रंगांची आदलाबदल होते त्यामुळे पुन्हा सातव्या डावातही आनंदची मोहोरी काळीच असणार आहेत! त्यामुळे आजचा डाव जिंकणे त्यानंतर ६ आणि ७ हे दोन्ही डाव बरोबरीत सोडवणे हे आनंदसाठी अतिशय चांगले ठरेल. कारण त्यापुढच्या पाच डावात आनंदकडे ३ वेळा पांढरी मोहोरी असणार आहेत. याउलट मॅग्नुसचा मनसुबा आजचा डाव बरोबरीत सोडवून पुढचे दोन्ही डाव, किमान एकतरी, जिंकणे असा असणार आहे. त्यामुळे ५, ६ आणि ७ हे तीनही डाव अतिशय निकराने लढले जाणार आहेत यात शंका नाही! गेल्या स्पर्धेच्या वेळी आनंद पाचवा डाव हरला आणि त्यानंतर त्याची आत्मविश्वास पातळी इतकी खालावली की तो त्या मानसिकतेतून वरती येऊ शकलाच नाही. यावेळी तसे दिसत तरी नाहीये. त्यामुळे आनंद आज आक्रमक असणार. पुन्हा एकदा डी४ आणि शार्प वेरिएशन बघायला मिळणार का आणखीन काही धक्कादायक? दहाच मिनिटात डाव सुरु होतोय, चला बघूयात!

वाचने 8689 वाचनखूण प्रतिक्रिया 31

चतुरंग 14/11/2014 - 18:30
मोकळा मोकळा झालाय. मॅग्नुस घड्याळात पुढे आहे फक्त १४ मिनिटे घेतली आहेत त्याने. आनंदने ४७ मिनिटे घेतली आहेत. आनंदने पटाच्या मध्यातले डी आणि ई स्तंभ घेतेलेत.परंतु स्थिती तशी समसमान आहे.

चतुरंग 14/11/2014 - 19:02
थोडे पोझीशनल अ‍ॅडवांटेज आहे. तो कदाचित वजीर विरुद्ध दोन हत्ती असे काँबिनेशन खेळायचा प्रयत्ब करेल असे वाटते अन्यथा डाव ड्रॉकडे जाण्याची शक्यता मोठी!

In reply to by आनन्दा

शिवाय हल्यात त्याचा उंट, आनंदच्या घोड्यापेक्षा जास्त प्रभावी ठरेल. आता तर आनंदच पॉन स्ट्रक्चर पूर्ण बिघडलंय!

In reply to by संजय क्षीरसागर

आनन्दा 14/11/2014 - 19:40
ओ संक्षी, कार्लसनकडे तर ऊंटच नाहीय..! तरी मी विचार करतोय की तुम्ही जगाच्या उलटे का बोलत आहात.. पण आता कळले.

Now white is a pawn down, but he controls almost the whole board. It will not be easy to covert, but the ball is in Black's court - trying to find good moves in not an easy position. Carlsen played so fast the opening that almost gave the impression that he has analyzed everything in this variation and we are heading to a rather uneventful draw. It does not look so now!

In reply to by केदार-मिसळपाव

मी मधून पाह्यला सुरुवात केली त्यामुळे चूक झाली! माझ्या वरच्या सगळ्या कमेंटस आनंदच्या बाजूनं आहेत!

सुजित पवार 14/11/2014 - 19:53
आनंद टाइम प्रेशर मधे येउन काहि चुक नाहि केल म्हन्जे मिळवलि. हत्तिने ते प्यादा माराय्चा प्रयत्न करेल काय? एकाच घरात हत्ति नि उन्ट असेल्यामुळे दोन्हि हलवता येत नाहि आहेत