मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऐश्वर्या राय

_मनश्री_ · · मिपा कलादालन
ऐश्वर्या राय..... फोटोशॉप वापरून क्रिएशन बनवण्याचा माझा पहिला प्रयत्न ..... a1 a2 a3

वाचने 8493 वाचनखूण प्रतिक्रिया 32

In reply to by स्पा

@ कसला प्रयत्न म्हणायचा? >>> +++१११ रांगोळीचित्र...पेंटींग..फोटू...काहि माहिती तर टाकायचीत कि हो! कळायला कैच वाव नाही रहात मग!

In reply to by _मनश्री_

पिवळा डांबिस Sat, 11/15/2014 - 10:33
त्या विधात्याच्या क्रियेशनपुढे तुमचं क्रियेशन अगदीच फालतू आहे. आईश्वर्याशी धतिंग मना पसंत नाय, सांगान ठिवतंय! इचिभनं, येक दिशी चटका लागंन ना, तवा कलंन!!!

In reply to by पिवळा डांबिस

_मनश्री_ Sat, 11/15/2014 - 10:45
आभारी आहे आईश्वर्याशी धतिंग मना पसंत नाय, सांगान ठिवतंय! तुम्हाला काय पसंत हाय ,आणि काय नाय ह्याच्याशी मला काही देण घेण नाहिये

In reply to by _मनश्री_

सतिश गावडे Sat, 11/15/2014 - 10:53
तुम्हाला काय पसंत हाय ,आणि काय नाय ह्याच्याशी मला काही देण घेण नाहिये
पिडाकाकांच्या हिरव्या नोटांच्या देशातील "व्यक्तिस्वातंत्र्याची" चळवळ इकडेही मुळ धरु लागली तर. :)

In reply to by _मनश्री_

पिवळा डांबिस Sat, 11/15/2014 - 10:59
तुम्हाला काय पसंत हाय ,आणि काय नाय ह्याच्याशी मला काही देण घेण नाहिये
अहो त्या शेवटच्या दोन ओळी हा एक विनोद होता. पण त्याचा उपयोग न झालेला पाहून आम्ही तो बिनशर्त मागे घेतोय!!! मानलं तुम्हाला!!!

In reply to by पिवळा डांबिस

_मनश्री_ Sat, 11/15/2014 - 11:07
सॉरी पण तुम्ही क्रिएशन ला फ़ड़तूस म्हणालात त्यामुळे मी जरा रागात होते तुम्हाला आवडल नव्हत तर आवडल नाही अस म्हणायच होत तुम्ही ,पण अगदी फ़ड़तूस म्हणाव इतक वाईट नाहिये ,

In reply to by पिवळा डांबिस

मग बघा...हे सगळे करण्यात एक दिवस तेच आघाडीवर असतील... तुमची गादी चालवायला नवीन पाईक येतील...जरा म्हणून धीर नाही तुम्हाला... ;-)

मुक्त विहारि Sat, 11/15/2014 - 06:07
ह्या मदनिकेचे अजून कशाला वेगळे क्रियेशन करायला पाहिजे? उद्या मधूबालेचे पण कुणीतरी करेल..... असो, पसंद अपनी अपनी.....

In reply to by मुक्त विहारि

सतिश गावडे Sat, 11/15/2014 - 10:31
ह्या मदनिकेचे अजून कशाला वेगळे क्रियेशन करायला पाहिजे?
मदनासारख्या सुंदर स्त्रीला मदनिका म्हणतात तर रतिसारख्या सुंदर पुरुषाला रत्या म्हणता येईल का? रच्याकने, या मदनिका शब्दावरुन "झपाटलेला २" मधील "गं मदनिके घडीभर थांबून बोल" हे अप्रतिम, नितांत सुंदर, नयन मनोहर गाणे आठवले.

In reply to by सतिश गावडे

मुक्त विहारि Sat, 11/15/2014 - 19:05
"मदनासारख्या सुंदर स्त्रीला मदनिका म्हणतात तर रतिसारख्या सुंदर पुरुषाला रत्या म्हणता येईल का?" मुळांत प्रश्र्नच फार चूकीचा आहे.खरे तर ह्या प्रश्र्नावर एक छान लेख लिहीता येईल. मुळात "मदन" कोण? त्याचे कार्य काय? त्याचा जन्म कसा झाला? "मदन मोहन" हे जसे उत्तम संगीतकार होते, तसेच "मदन" नावाच्या किती माणसांनी भरीव कार्य केले आहे? ह्याचा पण उहापोह करता येईल. तसेच "रती" कोण? तिचा जन्म कसा झाला? तिचे कार्य? "रती अग्नीहोत्री" सारख्या अजून किती "रथींनी" समाजांत भरीव कार्य केले आहे? हे असे पण सांगता येईल. असो, मिपाकर गुगल आणि विकीपेडीया वापरण्यात हुषार आहेत.त्यामुळे अधिक काही बोलायला नको. असो, मला वाटते, स.गा. ह्यांना प्रश्र्न परत एकदा नव्याने विचारायला पाहिजे.

प्यारे१ Sat, 11/15/2014 - 12:32
आहाहा! सुंदरच. मनानं काय रंग भरले/काढले आहेत. चान चान. ती कॅलिग्राफी सुद्धा बहुत सुंदर दिसतेय. एकदम बूटीफूल. आडौलं. पुन्हा एकदा चान चान.

एस Sat, 11/15/2014 - 16:08
डिजिटल आर्ट हा एक नवीन आणि तितकाच आव्हानात्मक प्रकार कलाक्षेत्रात उदयास आला आहे. शेवटी माध्यम महत्त्वाचे नसून त्यामागील कला आणि कलाकाराचे कौशल्य जास्त महत्त्वाचे आहे. वरील प्रयत्नातील दृष्टिकोन आवडला. तुम्हांला फोटोशॉप चांगले येत असेल आणि विशेषतः पोस्टप्रोसेसिंगच्या बाबतीत माहिती असेल तर आम्हां मिपाकरांना शिकवल्यास आनंद वाटेल. त्याचबरोबर वरील क्रिएशन तुम्ही कसे केले, कुठल्या पायर्‍या वापरल्या ते सांगावे अशी विनंती. (जुन्याजाणत्यांसाठी एक सूचना - नवागतांना नाउमेद करू नये.)

In reply to by एस

सतिश गावडे Sat, 11/15/2014 - 17:28
(जुन्याजाणत्यांसाठी एक सूचना - नवागतांना नाउमेद करू नये.)
तुम्हीही नविनच दिसता म्हणजे. नवागतांना शिकवण्यासाठी मिपाकर "सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट" हे तंत्र वापरतात हे माहिती नाही का तुम्हाला?

In reply to by सतिश गावडे

एस Sat, 11/15/2014 - 18:20
मला यासंदर्भात नीलकांत यांच्या एका धाग्याची आठवण होत आहे. असो. यानिमित्ताने मिपावर वावरायला आपण किती अनफिट आहोत हे जाणवल्याने तेवढे दोनेक लेख पूर्ण झाले की संन्यास घेणार आहोतच.

In reply to by एस

मुक्त विहारि Sat, 11/15/2014 - 19:21
तुम्ही अतिशय चूकीचा विचार करता आहात. "मिपाकरांना कलेचे आणि कलाकारांचे वावडे नाही." पण ती कशी सादर करतात. ह्यावर आक्षेप जरूर घेतल्या जातो.संगणकावर केलेले कार्य कुणाला आवडते. किंवा कुणाला नाही.ते त्यांचे वैयक्तीक मत असते. ह्या अशा मतांना फाट्यावर मारायला शिकायला तयार असाल तर किंवा शिकला असाल तर, मिपासारखे उत्तम व्यासपीठ तुम्हाला मिळणार नाही. सुरुवातीला मला पण तुमच्या सारखाच त्रास झाला.पण इथे बरीच लोकं वैयक्तीक टोमणे मारत नाहीत आणि जी मारतात, त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. कदाचित आमच्या कडून पण काही चूका झाल्या असतील.पण मी कधीच तुमच्यावर वैयक्तीक टीका केलेली मला आठवत नाही.जर कधी केली असेल तर, माझी चूक जरूर सांगा. मला माझी चूक स्वीकारायला कधीच लाज़ वाटलेली नाही. अहो, मसाला घातल्याशिवाय चहाला मझा नाही आणि टारगट आणि टवाळ प्रतिसाद पचवल्या शिवाय मिपाकरा सारखी मजा़ नाही. असो, रागावू नका आणि "मिपा" तर अजिबात सोडू नका.

In reply to by मुक्त विहारि

सतिश गावडे Sat, 11/15/2014 - 19:49
>> पण इथे बरीच लोकं वैयक्तीक टोमणे मारत नाहीत आणि जी मारतात, त्यांच्या कडे दुर्लक्ष करा. या बाबतीत आपण तुम्हाला मानतो. एका डु आयडीने तुमच्यावर विनाकारण चिखलफेक केली तेव्हा तुम्ही जो संयम दाखवलात तो कौतुकास्पद होतं. इतकंच कशाला, आज मिपाकरांच्या गळ्यातील ताईत असलेल्या आत्मुबुवांना सुरुवातीच्या दिवसांत पळता भुई थोड़ी केली होती. सांगायचा मुद्दा हां की मिपावर काही तूफानी करायचं असेल तर थम्सअप प्या.

In reply to by मुक्त विहारि

पाषाणभेद Sat, 11/15/2014 - 19:55
आपण हे चित्र एखाद्या छायाचित्रावरून काढलेले आहे की एखादे चित्र छायाचित्रदुकानात संगणकावर पुन:संस्कारीत केले आहे? मूळ छायाचित्र कोठे आहे म्हणजे आम्हा बापड्यांना तुलना करता येईल?

जेपी Sat, 11/15/2014 - 18:14
जाऊदे सगा 'नया हय वह' बोलनेका और सोडुन देणेका. ते सर्व्हायवल फॉर फिटेस्ट हे आमच्या पर्यंतच वापरल गेल.नंतर वापरलेल मी पाहिल नाही. याचसाठी टिकुन आहे.

प्रसाद१९७१ Mon, 11/17/2014 - 14:01
ही चित्रे तुम्ही काढली आहेत की रेडीमेड फोटो एका मागे एक चिकटवले आहेत? तुम्ही चित्र काढली असतील तर तुम्ही ग्रेट आहात, नाहीतर इतकी साधी गोष्ट तुम्हाला चार लोकांना दाखवावी असे का वाटले ते कळत नाही.