मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

न वढलेली बिडी आणि खाल्लेला मार ! १

Vijay Shankar Mane · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
इज्या ! ........... हि मुठी मानस बिड्या वडून नाकात्न कसा धूर काडत असतील र ....... पक्या, हनम्या ,दिल्या आन मी रानात्न येताना पक्या म्हणाला ! हे बेन दुसर्याला झाडव चढवायचं आन मग आपुन मजा बगायची खालन ह्यात लय तरबेज हुत इचार करून हान्म्या म्हणाला यक डाव बिडी वडून बगायला पायजे ! मी म्हनालू आयला खरच्कि गड्या माजा आज्या पण मस्त धूर काढतो नाकात्न आयला इज्या तुजा आजा दुपारी झोपल्याव यक बिडी आणकी हळूच काढून बंडलात्न मी जरा इचार केला आन म्हनालू जर घाव्लू बिव्लु तर वल्या फोकाटीन आय मारल सांच्याला . आर घाव्ल्यावर मारलं पण घावल तर पायजे ना... पक्या म्हणाला मी म्हणालो आर पर पेटवायची कुठ आन कुणी बगितल तर ! तवा पटकन हान्म्या बोलला आर मारुतीच्या देवळात दिवा जळत असतुया आन त्याच्या मागच बसून पेटवायची दुपारी गुर्विण पण नसती देवळात आन कुणी येत पण न्हाय ! त्या मूळ कुणाला कळणार पण नाय . हे बेन लय बारा**चं हेला कुणाची कोंबडी कुठ अंडी घालती कुणाच्या रानात वाळक हायती कुणाच्या फपया च्या फपया पिकल्या याची बराबर खबर असायची . दुसऱ्या दिवशी शाळत्न येतान चिचा पाडता पाडता परत पक्या म्हणाला इज्या बग की र जमतंय का बाकीच्या कुणाच्याच घरात कोण बिड्या वडत नाही लेका थोड डेरिंग करायला काय हरकत हाय ..आन मी इचार करायला लाग्लू कस जमवायचं ........... हान्म्या आन दिल्या माझ्या तोंडाकड बगत हुती मी म्हणल बगा गड्यानो जमल तर करतो तुमी आंब्याखाली दुपारी थांबा . घरी गेलो तर आय बाजूच्या काकी बर वाकाळ शिवत हुती तीन मला जेवाया वाडल आजा जिउन डोळ मिटून पडला हुता पण जागा हुता. मी जिव्लु आन पुस्तक घ्यून हळूच आजाक्ड चोरून बगत हुतु तवर इट्टला… पांडुरंगा … करत आजान डोळ उगड्ल आन उठून बसला दंड्कीच्या खिशात्न बिडी बंडल काढल यक बिडी भाईर काढली आन तिचा हिरवा दोरा दातात धरून तोडला आन मला म्हणाला इज्या जर चुलीत इंगूळ असला तर दिकी . मी चुलीतली राख वरखाली केली आन यक इंगूळ लाकडावर घिउन आजाला दिला आजान बिडी पेटवली आन यक लांब झुरका घेतला आन डोळ मिटून लाब धूर नाकात्न काढला बग्ताना माझ डोळ अपोआप मोठ झाल हुत .आजाची बिडी वडून झाल्यावर आजान यक खाकरून बेडका काढला आन तीत्नच उब्र्या भाईर टाकला बिडी बंडल उठून फळी वर ठेवला आन इट्टला..... पांडुरंगा ..... म्हणत तिथच हातावर डोक ठीउन पडला माझ बारीक लक्ष हुत . थोड्या येळान आजा घोरायला लागला आन मी सावध झालू हळूच आज्याच्या उशाला जाऊन हात वर केला पण फळी काय हाताला इना झाली. भाईर अंगणात येउन बघितल तर आय आन काकी दुसऱ्या वयनी बर हळूच काय तरी बोलत होत्या आन वयनी लाजून लाल होत होती आन मग माझ्याक्ड बगत म्हणाली जावा तिकड इज्या आयुक्तुय कि .आय तीत्नच वाराडली काय र मी म्हनालू काय नाय जर चिपाड न्याला आलू हुतु ती परत डोळ मोठ करून म्हणाली जाळ बीळ करू नको चुलीत न्हाय तर घर पेटवायचा ! चिपाड घेऊन आत गेलो आज्याच्या डोक्याच्या बाजूला उभा राहिलो पण फळी वरच्या बिडीला चिपाड काय लागणा मग शेंड्याकड जरा मोडल आन गडबडीत वर ढकललं तर आलुमिनियामच्या टोपाला थटल आन खुड खुडू वाजलं तेवढ्यात खालन आवाज आला. इट्टला.... पांडुरंगा ..... आमचा पांडुरंग उठला हुता आन डोळ उघडून मला बगत म्हणाल इज्या.... काय कर्तु र ! मी पटकन म्हणल पेंसल वर फिकली ती फळीवर पडली म्हणून काडत हुतो . माझा पयला प्रयत्न फसला होता आन आता ग्यांग ला कस सांगाव ह्येचा इचार करत मी पाय वडत आंब्याकड निघालो सगळी वाटच बगत हुती पण माझ तोंड पडल्याल बगितल आन दिल्या बोलला काम झाल का र ! मी फक्त नाय म्हणून मुंडी हलवली .तवा हान्म्या म्हणाला कस झाल तेनला सगळ सांगितल पक्या म्हणाला चीपडान कधी बिडी बंडल पडतंय व्हय पायाखाली काय तरी घ्याच ............ पण जाव दे पायला डाव भुताला ! बघ उद्या जमतंय का ......

वाचने 4258 वाचनखूण प्रतिक्रिया 24

जेपी 14/11/2014 - 17:48
मस्तच... बाकी तुमचा पयला प्रयत्न फसला है ऐकुन लै आनंद झाला. या माने साहेब भेटा पयल्या मिपावरील मित्राला.

In reply to by जेपी

टवाळ कार्टा 14/11/2014 - 18:02
"मी पयला" संघटनेच्या समस्त माजी* सदस्यांना १ प्रस्ताव नवीन लेखकाचा धागा आल्यावर...हुरुप वाढवणारा "पहिला प्रतिसाद" आपण"च" द्यायचा *मी पयला संघटनेच्या आत्म्याला शांती लाभो :(

In reply to by जेपी

Vijay Shankar Mane 15/11/2014 - 09:49
धन्यवाद जे.पी. चला मिपावर पहिला मित्र मिळाला बोहनी झाली पण जे.पी. साहेब मंजे एकदम सुटाबुटात वाटत गावकड आमाला सरकार म्हणत्याती आन आमच्या वाड्याला सरकार वाडा आमी नागोजी मान्याचे वशज ! असेच भेटू ....

In reply to by जेपी

Vijay Shankar Mane 15/11/2014 - 13:16
जे पी. मला म्हणायचं होत तुम्ही माने साहेब म्हणाला ना म्हणून मला तस वाटल आन आमचा वाडा गावाकड हाई तुमाला लांब पडल आमि यक नवा वाडा बांधायचा म्हनतुय पाली जवळ झाला कि जरूर बोलाऊ तुम्हाला ! नायतर कुणाला तरी सांगून तुमास्नी वाड्यावर आणू कस......... !

मुक्त विहारि 15/11/2014 - 06:36
छान... कथा आवडली...