Skip to main content

ती आणि मी (भयकथा)

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 17/09/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी: तिचं घर कसं भणंग. एकटं. मुख्य वाड्यापासुन जरासं दुर. तिचे म्हातारे आईबाप, थोरले भाऊ, त्यांच्या बायका पोरं वाड्यात राहायचे. ही बाहेरच्या खोलीत. एकटीच. बिनलग्नाची. रात्री जेवणानंतर घरामागच्या झाडीत मशेरी घासत फिरण्याची तिला विचित्र सवय होती. तिची आणि माझी पहीली भेट इथलीच. एका रात्री ती मला अशीच एकटी दिसली. जवळ जावुन मी तिची विचारपुस केली. घडाघडा बोलली. खरतरं मी तिच्यापुढे एक अनोळखी बाई होते. पण पहिल्या भेटीतच तिनं आयुष्यभराचं रडगाणं माझ्यासमोर सुरु केलं. माझ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत कितीतरी वेळ एकटीच बोलतच राहीली. थोडी चक्रमच वाटली. पण मला तिची दया आली.

श्रीगणेश लेखमाला

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 17/09/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना आणि वाचकांना गणेश चतुर्थीच्या आणि मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आठ वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीला मिपाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ".. लोग आते गए, कारवाँ बनता गया" हे मिपाला शंभर टक्के लागू पडतं. वैविध्यपूर्ण लेखन करणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सदस्य हे कायमच मिपाचं बलस्थान राहिलेलं आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस ते भाषाशास्त्रज्ञ ते गुरुजी ते दंतवैद्य आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्स, मॅनेजर्स, असा (आणि याहीपलीकडचा) विस्तीर्ण पट मिपाकरांनी व्यापला आहे. मिपाचं हे वैशिष्ट्य झ़ळकून उठावं, म्हणून यंदा आम्ही मिपाच्या काही सदस्यांना त्यांच्या व्यवसायाविषयी लिहितं केलं.

< नैराश्याकडे फाऊले>

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 17/09/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
पहिलेच विडंबन आहे : घ्या सांभाळुन (मुळ कविता : www.misalpav.com/node/32809 ) उत्साह आला, संचारला संचारला, लेख टंकला, इवढुकला, पिंटुकला, कमेंट आले, हाणले, तोडले, जिंकले. सर्वां जसे नवपाखरु मिळाले. पण आता … भटकंत्या, पाकृ, सगळेच फसले, छटाकभर पिंक मिळेनासे झाले. आज जरी धाग्यांना पंख लागले. अखेरची जिलबी प्रसवुन झाले, तरी डुआय पण न फिरकले, हीच का नैराश्याकडे फाऊले?

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 17/09/2015 07:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? आज आपल्या लाडक्या "मिपाचा" वाढदिवस. माझ्या कडून मिपाचे अभिष्टचिंतन. रोज मिपावर चक्कर टाकू या आणि मिपा=धर्म सार्थकी लावू या. आपलाच, (कट्टर मिपाकर) मुवि. (आजकाल आम्ही जास्त खुमासदार लिहू शकत नाही.)

बाप्पाचा नैवेद्य : ड्रायफ्रुट्स मोदक

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 17/09/2015 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १.५ वाटी सीडलेस खजूर, तुकडे करुन घ्यावे. १/२ वाटी बदाम १/२ वाटी काजू १/४ वाटी बेदाणे १/४ वाटी डेसिकेटेड कोकोनट २ टेस्पून खसखस १/२ टीस्पून वेलचीपूड . पाकृ: काजू-बदाम बेताचे चॉप करुन घेणे.

आसरा

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 17/09/2015 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
घर तसं छपराचं. एका बाजुला गुरांचा गोठा. दुसऱ्या बाजुला माजघर. पाठीमागे पडवी. मध्येच सारवलेला ओटा. गोठ्याला लागुन भली मोठी चिंच ऊभी. लागोलाग ओढा. कोरडा. फक्त पावसाळ्यात भरून वाहीलेला. ओढ्याकाठी चिंच, सिताफळ, कवठ आणि केक्ताडाची वैविध्य झाडं. या झाडांत बुजुन गेलेलं ते छपराचं घर. एकटं. गावापासुन दुर. घरापासुन निघालेली पायवाट उतरती होत ओढ्यात शिरलेली. वगळी वगळीतुन जात पुन्हा चढाला लागलेली. या पायवाटेवरुन घरातील माणसे येजा करीत. घरातील प्रमुख पुरुष याच वाटेवरून बैलगाडी नेई. लहानग्यांचा पोरखेळही याच वाटेवर चाले. त्या घरात एक म्हातारा रहात होता.

हे काय कमी काय?

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 16/09/2015 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं! वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून घरी परततात माणसं, हे काय कमी काय? सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय? सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय? भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव! मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय? उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

बाय

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 16/09/2015 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी लगबगं भाकऱ्या चुलीवरं धुराड्यात खोकते ही कैदाशिनं. सडा सारवनं धारोष्ण दुध न्हावुन झाली ही अवदसा. धनी शेतावरं हंबरते वासरु भारा ऊचलाया ही सटवायी. पाखरु आभाळी झळुनिया ऊनं फिरे रानोमाळी ही जोगतीनं. आवसं पुनवं संसार सुखाचा माहेरची ओढ रूते काळजातं.

पाऊस - वेगवेगळे रंग

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 16/09/2015 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर पडलो. राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. भुरका-भुरका पाऊस पडत होता. भुरक्या पाऊसाचे एक चांगले आहे, आपल्याला पाऊसात भिजण्याचा आनंद हि मिळतो आणि आपण जास्त ओले चिंब हि होत नाही. नजरे समोर एक अंधुक आकृती दिसू लागली. असेच एकदा तिच्या सोबत एका संध्याकाळी भुरका-भुरका पाऊसाचा आनंद घेत नेहरू पार्कच्या हिरवळीवर फिरत होतो.... पण तो पाऊस.... केंव्हाच हवेत विरून गेला.. किर्रर्र बाईक थांबण्याचा आवाज, मी हादरलोच.. अंकलजी कहाँ खोये हो, कम से कम रास्ता तो देख कर पार किया करो. सॉरी, मी पुटपुटलो. हायसं वाटल.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद