उलटं सुलटं (दीड शशक)
अरुंधतीचं पाककलेत मोठं नांव झालं होतं.
परीक्षक म्हणून जेव्हां तिला बेळगावला बोलावणं आलं, तेव्हां मीहि येतो म्हणालो,
तेव्हडचं वडिलाना भेटता येत होतं.
आईच्या माघारी पण त्यानी मंबईला येण्याचं नाकारलं,
माझं मी कसंतरी भागवीन म्हणाले.
संध्याकाळी बंडू सावंत लायब्ररीत भेटला, तिथं लायब्रीयन आहे तो,माझा वर्ग मित्र.
आणि त्यानं सांगितलं आणि गोट्या कपाळात गेल्या,
तसाच घरी आलो,आणि घेतलं फैलावर वडलाना,
काय कमी आहे तुम्हाला म्हणून हे थेर सुचतायंत़ ?
काय फाडून घेताय त्या पेपर मासीकातून?
मी त्याना बोलूनच देत नव्हतो,
बघू ती चिटोरी?
मिसळपाव