मराठीचे कवतुक
मराठीचे कवतुक
नाही पहिले उरले
उरेल ही बोली भाषा
कोणी मोठयाने बोलिले
"मिपा" सम धन्वंतरी
कशा उगा चिंता वाहे?
शाश्वताच्या वाणीतून
सत्य जणू हुंकारले
इंद्रायणी तीरि पहा
कोण उन्मेष उसळे
ज्ञानेशाच्या काळजात
लक्षदीप उजळले
निवांत मधला छानसा नाश्ता आटोपून आम्ही कासला जायला सज्ज झालो.हॉटेलवाल्यांनी आवर्जून कुमुदिनी तलाव बघाच असं सुचवलं होतं.तो म्हणे फुलांनी भरून गेलाय.त्यामुळे अगदी उत्सूक होऊन कॅमेरे परजून निघालो.अगदी अर्ध्या तासाच्या आतच पठारापाशी पोचलो.तिथे आमच्याकडून कॅमेरा, पार्किंग आणि कर मिळून १३० रु घेतले