होऊ द्या खर्च....आपल्याच घरचं..
नमस्कार मंडळी
बाप्पा यायच्या आधीच एक महिन्यापासून माझ्या हपिसात मंडळासाठी टीशर्ट छापून घेणारे येऊ लागले. आता काय तंत्रज्ञानामुळे हव्या त्या रंगसंगतीचे, अगदी छान छान अशा कापडापासून बनवलेले टीशर्ट अगदी कमी वेळेत मिळू लागले आहेत.
मंडळांचे टीशर्ट तर छापून गेले पण आता वाट पाहायची नवरात्रीची.
असो, तर माझ्या डोक्यात विचार आला, आपण एवढ्या प्रकारचे रंगीत संगीत डिझाईन फक्त कार्यकर्त्यांसाठी बनवतो (ते मिरवणुकीत अजून काय रंग उधळतात त्यांनाच माहीत)
मग आपल्या मिपाकरांनीच काय गुन्हा केलाय. मग म्हणले चला. मिपाकरांसाठी पण टी शर्ट डिझाईन करावा.
पण नंतर विचार आला, साला इथे काय एक मेंबर एकसारखाय व्हय.
मिसळपाव
"मोटरसाईकल रायडींग गिअर्स" हे धाग्याचे नांव वाचून Moto GP मधला वेलेंटिनो रॉसी किंवा लोरेन्झो डोळ्यासमोर आला असेल. जाहिरातींनी मढवलेले परंतु शरीराचा भाग बनलेले; हेल्मेटपासून शूजपर्यंत वापरलेले वेगवेगळे पॅडींग आणि गार्ड्स.
आपण येथे तशाच प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करणार आहोत. मात्र आपल्याला उपयोगी आहे तितक्याच प्रमाणात.
आपण सगळे थोड्याफार प्रमाणात दुचाकी गाड्या चालवत असतो आणि बहुतांश वेळा रायडींग गिअर्स वापरत असतो.