गोष्ट "देशाचा आत्मा बदलण्याची..."
समाजमाध्यमांमुळे कधी कधी रोचक माहिती शोधत नसताना देखील मिळते. युरी बेझमेनोव्ह या केजिबीच्या हेराच्या मुलाखतीच्या बाबतीत असेच झाले. वास्तवीक एका अमेरीकन पत्रकारास १९८५ सालात दिलेल्या या फुटीर (रशियाच्या दृष्टीने देशद्रोही) हेराने सांगितलेली गोष्ट आणि त्यात (कदाचीत वाढवून चढवून) सांगितलेले अमेरीकेत (त्याआधीच्या काळातली) सोव्हिएट ढवळाढवळ इतकेच या गोष्टीचे महत्व नव्हते हे सुरवातीस लक्षात आले...
हा पठ्ठ्या सत्तरच्या काळात भारतात केजीबीचा हेर म्हणून काम करायचा. म्हणजे उमेदवारीच्या काळात तो जेंव्हा रशिअन वकीलातीत काम करायचा तेंव्हा केवळ नोकरदार म्हणून करत असावा. पण नंतर काहीकाळाने तो जेंव्हा परत गेला, तो पर्यंत ज्याला इंग्रजीत indoctrination म्हणतात ते झालेले होते आणि त्याला केजिबीने हेर करूनच पाठवले होते! त्याचे काम काय होते? तर राष्ट्राचा आत्माच बदलायचा अर्थात इंग्रजीत brainwash the nation. तसा बदलला म्हणजे सोव्हिएट रशियाला भारतावर आणि कदाचीत भारतीय उपखंडावर आपले बस्तान बसवता आले असते. ते कसे करायचे? अर्थात केवळ भारतातच नाही तर जगात सर्वत्र - अमेरीकेपासून सगळीकडे...
जेम्स बाँड स्टाईल हेरगिरी करायची का? तर नाही. ती थोडीफारच पण... या साठी केजिबीने एक सरळ साधी योजना आखलेली होती. त्याने खालील मुलाखतीत गोषवारा करताना सांगितल्याप्रमाणे, अत्यंत थंड डोक्याने, वेळेसाठी संयम ठेवत आणि पायर्यापायर्यांनी demoralization, destabilization, crisis and then normalization (meaning takeover) असे करत जायचे. त्यासाठी डाव्या विचारसरणीकडे झुकू शकतील असे विचारवंत, कलाकार, पत्रकार आणि राजकारणी यांना आपल्याबाजूने करून घेयचे. राष्ट्रीय जीवनात त्यांना वरचे स्थान दिले जाईल ह्याची खबरदारी घेयची. त्यांच्याकडून प्रथम सामाजीक नैराश्य आणि गतकाळासंदर्भात केवळ नकारात्मक विचार पसरवून घेयचे म्हणजे समाजाचे demoralization होईल. ते झाले की त्यातून विविध प्रकारचे सामाजीक विरोध तयार होतात. मग त्यातून पुढे राजकीय अस्थैर्य येते ज्यामुळे देशात काळजीचे वातावरण तयार होते - जसे की फुटीरतावाद, अतिरेक आणि दहशतवाद. मग एकदा का राष्ट्र हतबल झाले की सत्ताधिशांना मदत करण्यासाठी सोव्हिएट कडून मदत मागवायची. आणि मग नागरी युद्ध वगैरे तयार करून आपल्या हातातील बाहुल्यांना सत्तेवर आणायचे आणि त्यांच्याकडून देश ताब्यात घेयचा.
अर्थात हे करत असताना, त्याने सांगितलेले पुढचे रोचक आहे! - जे खर्याअर्थाने डावे विचारवंत असतील, म्हणजे जे त्यांच्या हातातले बाहुले होणार नाहीत, त्यांना केवळ तत्व म्हणून डावा विचार आवडतो, अशांना थोड्या अंतरावर ठेवून वापर करावा. कारण त्यांना नंतरचे परकीय राजकारण आवडणे शक्य नसते. अशांची लिस्ट केजिबीकडे होती. ज्यांना एकदा का देशाच्या आत्म्याचा कब्जा केला की मारून टाकायचे... असेच ते दक्षिण अमेरीकेत वागले. अमेरीकेत पण काही अंशी डावा विचारवाद असाच रुजवला. आणि भारतात देखील काही अंशी तेच केलं. फक्त भारताचे दक्षिण अमेरीका होऊ शकले नाही....
या बेझमेनोव्हच्या बाबतीत जरा वाचले तेंव्हा दोन किमान वरकरणी - परस्परविरोधी गोष्टी लक्षात आल्या. - जरी हेर म्हणून आला तरी भारतीय माणसांच्या आणि संस्कृतीच्या प्रेमात पडला. दुसरीकडे असे देखील वाचले की, जेंव्हा त्याच्या लक्षात आले की सोव्हिएट आपल्या भारतीय वकीलातीच्या करवी पूर्व पाकीस्तानात शस्त्रे पाठवून अस्थिर करत आहे तेंव्हा त्याला येथे काय होईल याची कल्पना आली. त्याचा पाकीस्तानच्या फाळणीस पक्षी: बांग्लादेश होण्यास विरोध असावा असे वाटले.. म्हणून त्याने ७०च्या दशकातच अमेरीकेची शरणागती घेतली आणि त्याला कॅनडामधे रहाण्याची व्यवस्था करण्यात आली!
ही मुलाखत ऐकल्यावर त्यात दुर्दैवाने काहीच अतिरंजीत वाटले नाही. किंबहूना आपल्या देशातील डाव्या "विचारवंत-कलाकार-पत्रकारांचा" कसा वापर केला गेला आणि अजून केला जात आहे, त्याची पद्धती काय आहे हे लक्षात येते.
आधीच्या काळात इंग्लंड होते, नंतर रशिया, आणि आता ह्युमन राईट्स, पर्यावरण वगैरे मुळात महत्वाचे असलेले विषय वापरून त्याच पठडीतील भारतीय तथाकथीत लिबरल्सना अमेरीकेतील फोर्ड फाउंडेशन सारख्या संस्था वापरत असाव्यात असे वाटते.
वाचन
8310
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
मस्त माहिती! पण खूपच त्रोटक
In reply to मस्त माहिती! पण खूपच त्रोटक by श्रीगुरुजी
चर्चा होण्यासाठी म्हणून...
In reply to चर्चा होण्यासाठी म्हणून... by विकास
विकासजी, ही पण एक लिंक बघा -
Robert Littell या लेखकाने
In reply to Robert Littell या लेखकाने by बोका-ए-आझम
कारस्थाने...
सर्वच अमेरिकन कंपन्या,
In reply to सर्वच अमेरिकन कंपन्या, by विवेकपटाईत
कंपन्यांची हेरगिरी...
आंतरराष्ट्रीयच कशाला..
रोचक
हे रशियात होऊन गेले आहे
In reply to हे रशियात होऊन गेले आहे by गामा पैलवान
आत्माची रिपू आपुला...
In reply to आत्माची रिपू आपुला... by विकास
प्रतिसाद आवडला
In reply to हे रशियात होऊन गेले आहे by गामा पैलवान
.
In reply to . by dadadarekar
देव कशाला पाहिजे ... ?
रोचक माहिती पण धक्कादायक नाही
जोसेफ मॅकार्थी
In reply to जोसेफ मॅकार्थी by बोका-ए-आझम
आणखी काही लोक
In reply to आणखी काही लोक by राही
नवीन माहिती
In reply to नवीन माहिती by विकास
भारताचं परराष्ट्रीय धोरण
In reply to जोसेफ मॅकार्थी by बोका-ए-आझम
मॅकार्थिझम..
पाकव्याप्त काश्मिरमधे होणार्
In reply to पाकव्याप्त काश्मिरमधे होणार् by तर्राट जोकर
पाकव्याप्त काश्मिरमधे होणार्
In reply to पाकव्याप्त काश्मिरमधे होणार् by मदनबाण
या संदर्भात
In reply to या संदर्भात by विकास
दुव्या बद्धल धन्यवाद. लेख
रोचक लेख आणि प्रतिसाद
धन्यवाद विकास
असे मी सर्व मिपाकरांना