Skip to main content

Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे

लेखक सुधीर वैद्य यांनी रविवार, 03/01/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
४४१) Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे Selfie - सेल्फी हे नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: ट्रेन वेळापत्रकानुसार धावत नसल्यामुळे एका रेल्वे स्टेशनच्या महिला वेटिंग रूम मध्ये ५ स्त्रिया अडकून पडतात. वेळ घालवण्यासाठी म्हणून एकमेकींशी ओळख करून घेतात. सहज बोलता बोलता त्या स्वत:चे आयुष्य share करतात. अनेक वेळा मनातील खोल जखम अनोळखी माणसासमोर बोलायला लाज वाटत नाही.

माझी मस्तानी

लेखक सौन्दर्य यांनी रविवार, 03/01/2016 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
‘बाजीराव-मस्तानी’ सिनेमा पाहताना ही मुसमुसत होती, मस्तानी जगताना. ठरवले ह्याच क्षणी सांगावे हिला मनोगत सहज पूर्ण होईल जीवनाचे मनोरथ. “मी पण आणू म्हणतो मस्तानी आपल्या आयुष्यात” फक्त पुढचे काही क्षण गेले मौनात, मा‍झ्या जीवनात. डोळे बरसू लागले तोफ गोळे आणि जिव्हा, तप्त लाव्हा ‘मुलुख मैदानी’च्या वर्षावात सर्व झाले स्वाहा. बाळगा जरा मनाची, असलं काही बोलायला, पोरीचे हात पिवळे करायचे, तर निघाले तोंड काळे करायला.

विश्वाचे आर्त - सिंहावलोकन

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 03/01/2016 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
ही लेखमाला लिहिण्यामागचा उद्देश काय, तिचा आवाका काय, तीमधून मला काय सांगायचं आहे, ती कधी संपणार असे काही प्रश्न उपस्थित झाले. आत्तापर्यंत दहा भाग प्रसिद्ध करून झालेले आहेत. तेव्हा काही काळ थांबून मागे वळून पाहात या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ही वेळ योग्य वाटते. ही लेखमाला लिहायला सुरूवात करण्याआधी मला नक्की काय लिहायचं आहे यापेक्षा मला नक्की कशाप्रकारे आणि कशासाठी लिहायचं आहे याबद्दल काही स्पष्ट कल्पना होत्या. त्या मी त्यावेळी लिहूनही काढल्या होत्या. त्यातलं काय नक्की साध्य होतं आहे, किती यश मिळतं आहे हे वाचकच सांगू शकतील.

रचना कशी असावी...?

लेखक राघव यांनी रविवार, 03/01/2016 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
नुसतेच शब्द सारे.. गाभा मुळी कळेना.. स्वतःस प्रश्न केला.. रचना कशी असावी? होता जरी जरासा.. अर्थ, अडकलेला.. तरीही मनांत म्हटले.. रचना अशी असावी? मजला तरी कळावी, मम भावना मनीची.. आशय जिथे गमेना.. रचना तशी नसावी.. सहज-सुगम्य भाषा.. विषया धरून यावी.. बोजड कशास व्हावे.. रचना तशी असावी.. फुलती सहज जैसे ऋतुरंग आसमंती.. अर्थास शब्द यावे.. रचना तशीच व्हावी.. आशय थेट यावा अन् अंतरी भिडावा.. जन्मून सार्थ व्हावी.. रचना तशी असावी. राघव
काव्यरस

रिप्लेसमेंट

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 03/01/2016 02:24 या दिवशी प्रकाशित केले.
हजाराच्या सात नोटा त्यानं मोजुन पाकिटात ठेवल्या आणि बाबुच्या टपरिवर येऊन उभा राहिला. "भाऊ, एक 'बार' मळा बर् आपल्याला" "पगार झाली दिस्ती आज?" बाबुने खोचकपणे विचारले. त्याचं लक्ष नव्हतं. तालुक्याच्या बस स्टॅंडवर ति मैत्रिणींच्या घोळक्यात उभी होती. तो तिच्यावरच नजर लाउन उभा होता. अर्धा बार तोंडात टाकला आणि अर्धा व्यवस्थित पाकिटात ठेऊन तो तिथेच उभा राहिला. बाबु आणखी काहीतरी बोलला पण त्याचे ध्यान 'ति'कडेच लागलेले. थोडयावेळाने टपरीच्या पायावर पिचकारी मारून, तोंडातला बार चघळत आणि छाती पुढे काढत तो तिच्या जवळ येऊन उभा ठाकला. तिना मान फिरवली. खरे तर ति घाबरलेली पण शांत उभा होती.

सिंहलव्दीपाची सहल : १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 02/01/2016 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 02/01/2016 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

विमा कंपनीविरुद्ध यशस्वी लढा

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 02/01/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
"माझे व माझ्या पतीचे दोन विमा कंपन्यांचे स्वतंत्र मेडिक्लेम विमे आहेत . दोन्ही विम्यांमध्ये आमची दोघांची नावे घातलेली आहेत . माझ्या पतीची बायपास शत्रक्रिया एशिअन हार्ट इंस्टीट्युट येथे दि. ८ ऑगस्ट २००८ रोजी झाली . या शस्त्रक्रियेचा खर्च रु. ३ लाख २६ हजार ७४८ इतका झाला . आम्हाला दोन्ही विम्याचे मिळून रु. ३ लाख , २० हजार रु. मिळायला हवे होते . त्यापैकी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने ताबडतोब विम्याचे पैसे रु. एक लाख ७० हजार हॉस्पिटलकडे पाठवले . मात्र न्यू इंडिया अशुअरन्स कंपनीकडे सर्व कागदपत्रे पाठवूनसुद्धा हॉस्पिटल सोडेपर्यंत पैसे आले नाहीत . त्यामुळे कंपनीच्या टी . पी .ए.

सफलतेचा मंत्र - विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 02/01/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्या साठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे. विकल्परहित संकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेलतर आपण कुठेच पोहचू शकत नाही. डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो.

१३०) आनंदवन प्रयोगवन / डॉ विकास आमटे / समकालीन प्रकाशन

लेखक सुधीर वैद्य यांनी शनिवार, 02/01/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
१३०) आनंदवन प्रयोगवन / डॉ विकास आमटे / समकालीन प्रकाशन / २६-१२-२०१४ / पृष्ठे १९२ / रुपये २५०/- हे पुस्तक म्हणजे बाबा आमटेंच्या मानव मुक्तीचे स्वप्न साकारणाऱ्या ध्येय वेड्यांची कहाणी आहे. काही शब्द व्यवहारात एव्हडे सामर्थ्यवान होतात कि त्यांचे अर्थच बदलून जातात. उ हा. आनंदवन. आनंदवन म्हटले कि आठवतात बाब आमटे आणि त्यांनी कुष्ठ रोग्यांची केलेली सेवा. परंतु हे पुस्तक वाचल्यावर आनंदवन म्हणजे आपल्याला असलेली हि फारच कमी ओळख आहे ह्याची जाणीव होते. कुष्ठ रोगी बरा होतो पण त्याचे नातेवाईक - समाज त्याला खुल्या मनाने स्वीकारत नाहीत.