सिंहलव्दीपाची सहल : १८ : कोलंबो (समाप्त)
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...
ऑपरेशन भाग 3
भाग 2 वरुन पुढे-
रोहित संजयकडून सत्य जाणण्याचा प्रयत्न करत असतो, परंतू संजय त्याला काहीही सांगायला तयार होत नसतो,त्यामुळे तर रोहितचा संशय अधिकच बळावलेला असतो. काही दिवसांनी शवविच्छेदन अहवाल पाठवला जातो,त्यात संजयच्या भावाला विष दिल्याचे निदान झालेले असते. रोहितला खात्री पटते, की यात संजयचा काहीतरी कावा आहे, काही दिवसांनी संजय व त्याचा एक साथीदार येऊन रोहितला शवविच्छेदन अहवाल बदलण्याची धमकी देऊन जातात. रोहित त्यांचे ऐकायला तयार होत नाही, तेव्हा संजय रोहितला त्याच्या पत्नी व मुलाला ठार करण्याची धमकी देऊन जातो.
सोशल नेटवर्किंग (भाग ३)
हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मयंकच्या hi ला आज अखेर श्रावणीने उत्तर दिले होते सकाळी सकाळीच. मयंक खूप खुश झाला. ताबडतोब डोळ्यावरची झोप उडवत तिच्याशी बोलू लागला. पण तसे करताना आपल्याला ती आवडते याची पुसटशी शंकाही तिला येऊ नये याची खबरदारी तो घेत होता. हि त्याच्या नेहमीच्या ट्रिक्स मधली एक ट्रिक होती. आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याला हे माहित होते, मुलींना जास्त भाव दिला कि मग त्या गृहीत धरतात आपल्याला.
ज्यू असण्याचे जोखड
रोज शरीराची
मशाल पेटवावीच
लागते,
इच्छा असो वा नसो
तसे फारसे
पर्यायही
उपलब्ध नसतात
मग उगाचच वाटत
राहतं
आपण नाझींच्या छळछांवणीतले
ज्यू आहोत म्हणून ......
यातनागृहे
सर्वत्रच आहेत
तक्रार करण्यात
हशील ते काय ?
जे भोगायचे ते निमुटपणे
फक्त आरश्याला सांगायचे
तेही डोळे मिटून
कारण
उघड्या डोळ्यांनी
आरसा बघवत नाही
अन
त्यात दडले नापाक
असे हे शरीर....
असा रेहमान परत होणे नाही!
साधारण १९९२ चा नोव्हेंबर-डिसेंबर असावा
छान थंडी, पुण्यातली...
मोडेल कॉलोनी मध्ये...
मित्राच्या घरी...
मोठ्या टेरेस वर सगळे जमलेले,
बर्थडे पार्टी...
धमाल मस्ती संगीतखुर्ची केक आवाज मित्र गर्दी
आणि मी हळूच एका कोपऱ्यात ह्या सर्व मोह मायेतुन ज़रा वेगळा...
तो संगीत खुर्चीचा 'चित्त थरारक' कार्यक्रम संपल्यावर गाण्यांकड़े दुर्लक्ष करत मुलं आणि त्यांचे पालक आपआपलं उदरम भरणम करण्यात मग्न होते,
पण मी वेगळा...
त्या छोट्या टेपरेकॉर्डर पाशी,
माझी छोटीशी
हो हो तोच तो दिवस!
दिल है छोटासा... छोटीसी आशा
रोजा जानेमन, भारत हमको...
रुक्मिणी रुक्मिणी...
ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ४)
भाग १
भाग २
भाग ३
______________________________________________________________________________________
जेंव्हा जेंव्हा मी जी एंची ऑर्फिअस वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला त्यातून काहीतरी नवीन सापडल्यासारखे वाटते. आता वाचत असताना जाणवले की आपण सगळे ऑर्फिअस आणि युरीडीसीचे अवतार आहोत. आणि थोड्या फार प्रमाणात प्लुटो व पर्सिफोनचे देखील. इथे एक लक्षात ठेवायचे की कुणीही कायमचा एक अवतार म्हणून जन्माला येत नाही. आपण ह्या सगळ्या भूमिका आपल्याच नकळत आलटून पालटून घेत असतो. किंवा अजून सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण झाड असतो आणि वेगवेगळ्या वेळी ऑर्फिअस, युरीडीसी, प्लुटो आणि पर्सिफोनचे गुणावगुण आपल्याला पकडत असतात, आपल्या अंगात येतात, आपल्याला पछाडून टाकतात.
लडाख....एक स्वप्न!
जेव्हापासून दुचाकी वर भटकंती सुरु केली आणि लांबचे पल्ले गाठण्यास सुरुवात केली तेव्हापासून लोक्स अरे लडाखला जाऊन आलास का?, एवढा दुचाकी वर फिरतोस तर लडाख ला जाऊन ये असा सांगायला,सुचवायला लागले. तेव्हापासून सतत डोक्यात लडाख वारी चा विचार येत होता. भरपूर blogs वाचले, भरपूर माहिती मिळवली. त्या संदर्भातली भरपूर पुस्तक वाचली. असा म्हणा की गेले वर्षभर दहावीत असल्या सारखा अभ्यास चालू आहे लडाख वर.आता म्हणल बास जाऊन यायचंच ह्या वर्षी अन उचलला इडा लडाख चा बरोबर १ जानेवारी च्या उगवत्या सूर्याला साक्ष धरून.
त्या दृष्टीनी लगेचच तयारी सुरु केली.
संवाद साधन
मी बोरीवलीत राहातो. आमच्या भागात एक मराठी माणसाचे बियर शॉप आहे. काल रात्री त्याच्याकडे एकजण आला. 'केम छो काका' अशी आस्थेने मालकाची विचारपूस केली.
मालकाने दोन्ही तळवे उंचावून, पांडुरंग, पांडुरंग म्हटले.
मी मराठी असल्याने, त्याच्या प्रतिसादाचा अर्थ मला समजला.
'चित्ती असो द्यावे समाधान' असे त्याला म्हणायचे असावे...
त्या ग्राहकाला ते काही समजले नसावे!
'त्रण स्ट्रोंग आपो'... तो गोधळल्या आवाजात म्हणाला, आणि काऊंटरवरचा पोरगा गोंधळला.
'गुजराती समझती नही क्या?... सीख लो यार, गुजराती एरियामे रहते हो ना?'...
श्री. श्री. संत यनावाला महाराज
श्री. श्री. संत यनावाला महाराज
मित्रहो, धाग्याचे शीर्षक वाचून धक्का बसला नां ? पण त्याचे काय आहे, हल्ली दूरदर्शनवरील ब्रेकिन्ग न्युज प्रमाणे प्रत्येक शीर्षक धक्कादायक नसेल तर कोणी तिकडे लक्षच देत नाही. आता साधी गोष्ट, तुम्हाला माहीत आहेच महाराष्ट्रातील संत आपली ओळख कोणालाही पटू नये म्हणून नाना प्रयत्न करत असतात. श्री.(एकच श्री. बर कां !) तुकाराम महाराज घ्या. चांगला वाण्याचा वंशातला माणुस, म्हणे मीठ विकावयाला कोकणात गेला. त्यांच्या दुकानात विकावयास असलेल्या मीठाच्या गोण्या कोकणातून येतात हे त्यांना माहीत होतेच; पण लोकांना आपली खरी ओळख पटू नये म्हणून हा खटाटोप.
मिसळपाव