Skip to main content

प्रतिशोध

लेखक कऊ यांनी शुक्रवार, 11/08/2017 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिशोध भाग : 3 आम्ही जेव्हा बारावीला होतो तेव्हा अकरावीला new admission घेतलेल्या मुलांची रैगिंग करायची fashion आली होती..अनु पण आमच्याच ग्रुप मध्ये असायची..कॉलेजमध्ये एक नवीन चेहरा दिसला आम्हाला..अकरावीची नवीन विद्यार्थीनी...कस्तुरी..... कथा पुढे सुरू.. कस्तुरी दिसायला तशी साधीच होती. पण बोलतात ना साधेपणातच खूप सौंदर्य असतं.पण तुझे हे मानलेले भाऊ त्यांनी शेवटी तिची पण रैगिंग केलीच.रागवलो होतो तेव्हा या सर्वांवर. पण हळूहळू आम्हाला समजल की कस्तुरी अभ्यासात खूप हुशार तर होतीच शिवाय तिला सुध्दा आमच्यासारखी ट्रेकिंगची आवड होती. कॉलेजमध्ये शांत राहायची ती. मला तिच्या बद्दल अजून जाणून घ्यायच ह

ती मला आवडते

लेखक निओ यांनी शुक्रवार, 11/08/2017 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
ती मला आवडते जेव्हा लाडिकपणे अंगाशी झोंबते तेव्हा ती मला खूप आवडते जेव्हा किरकोळ गोष्टीला खट्याळपणे Oh My God म्हणते तेव्हा ती मला खूप आवडते माझ्या टोमण्यांवर गुद्द्यांचा प्रसाद देते तेव्हा ती मला खूप आवडते मी टकाटक आवरून बाहेर जाताना हूं...

आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञ

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 11/08/2017 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांत मला अनेक ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांनी शहरांत उपलब्ध असणार्‍या वैद्यकीय तज्ञांबद्दल शंका विचारल्या. तेव्हा असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे: १. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात. २. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS ३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत.

मला भेटलेले रुग्ण - ६

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 11/08/2017 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40524 डॉक्टर बासरी वाजवता येईल का मला ? असं विचारलं मला पेशंटनी ..... मला लक्षात आलं कि काय गडबड झालीये ती !! मी : कोण म्हणालं नका वाजवू ? पे. : एके ठिकाणी वाचलं होतं कि दमा असलेल्यानी बासरी वाजवू नये म्हणून .. मी : साफ चुक लिहीलंय .... पे. : म्हणजे मला बासरी वाजवायला काहीच हरकत नाही (चेहेरा खुलायला सुरू झाला ) मी : अगदी काहीच हरकत नाही , उलट बासरीवादनाचा फायदा असा आहे की तुमच्या श्वासाची क्षमता किती वाढली आहे ह्यॅचा अंदाजा येईल आणि श्वासाच्या स्नायूंचा व्यायाम होईल नियमीत ... पे.

जोसेफिना आणि जेनचे किडनॅप

लेखक सत्या सुर्वे यांनी शुक्रवार, 11/08/2017 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट १९८७ सालची आहे. आम्ही एक नवीन बिल्डिंग बांधायला घेतली होती. पोलीस ठाण्याच्या पुढेच होती. कंत्राटदार केरळी नायर होता आणि बहुतेक कामगार ओरिसा मधील होते. पोलीस ठाण्याच्या बाजूलाच जोसेफिना ह्या ख्रिस्ती महिलेचे घर होते आणि तिला जेन नावाची एक सुमारे १५ वर्षांची मुलगी होती. जोसेफिनाचा पती दुबई मध्ये कमला होता आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. जोसेफिना अतिशय सभ्य, प्रामाणिक आणि जेन वर जीवापाड प्रेम करणारी आई म्हणून सर्वाना ठाऊक होती.

वेगबदल आणि ‘वेग – काळ आलेखा’चे चढ-उतार (Measurement of Acceleration with graphs)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी गुरुवार, 10/08/2017 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
वेताळाच्या मागच्या भेटीपासून विक्रम जरा अस्वस्थच होता, विचारात होता. वेताळाने विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे धातुगोळ्याच्या वेगातील बदल मोजण्याच्या पद्धतीविषयी तो स्वत:शीच खल करण्यात मग्न होता इतका की त्या काळ्याकभिन्न अमावस्येच्या रात्री एका चिखलाच्या खड्ड्यात त्याचा पाय अडकता अडकता राहिला. पाठीवर वेताळही येऊन गनिमाप्रमाणे बसलाच होता. विक्रमाच्या अडखळण्यामुळे त्याचाही तोल जाता जाता राहिला. “अरे विक्रमा, लक्ष कुठंय तुझं? बहुतेक मागच्याच कोड्याविषयी विचार करत असावास. सांगच आता उत्तर. या वेगबदलाचं माप तुम्ही कसं काढणार?” “वेताळा मागील एका वेळी आपण वेग आणि काळ यांचा आलेख काढला होता. त्यात आपण वस्तूचा एकसमान वेग गृहित धरला होता. पण व्यवहारात पहायचं झालं तर वेगबदल हा असतोच असतो. म्हणून वस्तूची वाटचाल टिपण्यासाठी मागील प्रमाणे आपण वेग व काळ यांचा आलेख काढूया. (आकृती १) त्वरणाचे मोजमाप १ १. या आकृती प्रमाणे अ ते ब मधील त्वरण मोजू. वस्तूने कापलेले उभं अंतर (Vertical Distance) = 3 - 2 = 1 वस्तूने कापलेले आडवं अंतर (Horizontal Distance) = 1 - 0 = 1 चढ = उभं अंतर / आडवं अंतर = १/१ = (+) १ त्वरण १ इतकं आहे. +(धन) म्हणजे वेगात वाढ होते आहे. २. या आकृती प्रमाणे क ते ड मधील त्वरण मोजू. वस्तूने कापलेले उभं अंतर (Vertical Distance) = 2 - 3 = -1 वस्तूने कापलेले आडवं अंतर (Horizontal Distance) = 7 - 6= 1 चढ = उभं अंतर / आडवं अंतर = -१/१ = - १ त्वरण -१ इतकं आहे. –(ऋण) म्हणजेच वेगात घट होत आहे. हे मंदन आहे. वेताळा हे उभं/आडवं अंतर वगैरे आपण आलेखाबद्दल बोलताना बोलत आहोत. केवळ वर्णन म्हणून. याचा त्या वस्तूने जमिनीवर केलेल्या विस्थापनाशी संबंध लावू नकोस..आलेखातलं आडवं अंतर म्हणजे काळ आणि उभं अंतर म्हणजे वेग मग विस्थापन कशाने मिळतं? का या आलेखात ते मिळत नाही? या आलेखातला भरीव निळा भाग काय माहिती आहे? अरे त्या भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच वस्तूने केलेले विस्थापन! आता दुसऱ्या एका गोळ्याची वाटचाल आणि प्रत्येक टप्प्यावरील त्याच्या त्वरणाची मोजमापे पहा.(आकृती २) त्वरणाचे मोजमाप २ “म्हणजे विक्रमा, तुझं असं म्हणणं आहे का की धन त्वरण ते चांगलं आणि ऋण त्वरण ते वाईट?” “नाही नाही, वेताळा, या धन आणि ऋण यांचा चांगल्या-वाईटाशी काही संबंध लावू शकत नाही. एखादा रथ सपाटी वरून वेगवान दौड करत निघाला, सतत वाढता वेग ठेवत पुढे जात राहिला, वेगावर कोणतेच नियंत्रण ठेवले नाही आणि अचानक तीव्र उताराचा रस्ता, मोठा खड्डा किंवा वळण आले तर? त्याला मंदन करूनच वेग नियंत्रित करावा लागेल. खूप जास्तवेग असेल आणि वेळेत मंदन करता आले नाही तर त्याचा संवेग त्या रथाला आणि घोड्याला अपघाताकडे घेऊन जाईल. क्वचित जीवही जाईल. याउलट खूपच कमी वेगात जाणारा रथ एखाद्या तीव्र चढावर गेला तर वेग कमी पडल्यामुळे घोड्याला कदाचित तो ओढवणार नाही. रथ पुढे जाऊ शकला नाही तर गुरुत्वाकर्षण त्याला मागे खेचेल व पुन्हा अपघाताची शक्यता निर्माण होईल. त्वरण आणि मंदनाच्या सुयोग्य संतुलनातूनच रथ सुरक्षितपणे मार्गक्रमण करू शकतो. थोडक्यात त्वरण वा मंदनाचा संबंध त्याठिकाणी काम करणाऱ्या बाह्यबलाशी आहे. या बलाच्या सहाय्याने आपण वेगबदल साधतो व अपेक्षित वेग गाठतो.” “विक्रमा हे संतुलन वगैरे ठिक आहे. पण घोडा किती वेगाने पळाला म्हणजे व त्याचे किती वस्तुमान असले तर तो रथ सुरक्षितपणे नेऊ शकतो? तुम्हाला याचा अंदाज आहे का? शिवाय वळणावर रथ वाचविण्यासाठी काय करशील हेही सांगितलं नाहीस. तुला माहीत नसावं. पण माझी वेळ मात्र झाली. हा मी चाललो..हाऽहाऽऽहाऽऽऽ” --चढावरचे वेग कमी करणारे ते मंदन, उतारावर घोड्यांना सुसाट वेग देऊन सारथ्याच्या नाकी नऊ आणणारे ते त्वरण --त्वरण वाईट वा चांगले नाही, त्वरण-मंदनाच्या सहाय्याने इच्छित स्थळी योग्य वेळात सुरक्षित पोहोचवतो तो खरा सारथी असे काहीसं एक घुबड दुसऱ्याला सांगत होतं! (क्रमश:)

(चंम्मतग)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 10/08/2017 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा हायवे वरच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक "लोक काय म्हणतील कृत्रीम बंधन सत्वर तोडुनी टाक !" बायको नामक भूत बाटलीस कायम भिववीत होते त्या भीतीने तरल काहिसे ग्लासातून निसटत होते गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको गाय छाप मळलेली वाट खोकुनी माझी लावीते, वीडी कोंदटलेली, जेडी, शिवास, टिचर्स, यांच्यात अवघडून बसलेली ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही, "कितीही प्या, पण ध्यानी ठेवा..चखण्याविण "गंमत" नाही !" भूछत्री

गंमत

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 10/08/2017 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
नवकवितेच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक, "गण-मात्रांचे कृत्रिम बंधन सत्वर तोडुनी टाक !" यतिभंगाचे भूत लेखणीस कायम भिववित होते त्या भीतीने तरल काहिसे हातून निसटत होते गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको अता मळलेली वाट पुन्हा ती छंद-बद्ध कवितांची कोंदटलेली वृत्त-छंद-मात्रांचे अवजड ओझे लेवुनी बसली.. ..होती माझी कविता, विमुक्त होता निर्मळ हसली त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही, "मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"
काव्यरस