Skip to main content

(वडा तळलाच आहे तर...)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 20/04/2017 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा? खायला कशाला हवी प्रेरणा? पण तरीही विचारलीत तर ही घ्या नका रांधू भुसकटे ती मला खवळून खाऊ द्या वडा तळलाच आहे तर मला निथळून खाऊ द्या! नको ते रोजचे रडणे, सॅलड अन ब्रेडचे तुकडे मुलायम लागते हलवा-पुरी कवळून खाऊ द्या! घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक 'केकां'नो पहाटे 'कॉफि'ला तुमच्या सवे हुरळून खाऊ द्या! अश्या बेरंग खाण्याची कुठे उरते खूण 'मागे'? तांबडा रंग तर्रीचा करी 'मिसळू'न खाऊ द्या! मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती म्हणाली वाढले आहे(च)..तर उधळून खाऊ द्या! नको मश्रूम, नको कळणे, नका डाएटवरी राहू क्रीम आहेच तर लस्सी जरा ढवळून खाऊ द्या! जगाच्या मध्यरात्रीला असे या चार पावांनो तकाकी पावभाजीची बटर वितळून खाऊ द्या! —(खाद्यजित)रंगा
लेखनविषय:

वाचने 3523
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

भारी ! =))

खासंच जमले आहे हे खवय्या विडंबन! जरा घाईत पोस्टलेत का?की विडंबन म्हणून फारच लाईटली घेतलेत?अजून खुस-खुशीत,रस-रशीतपणे खुलवता आले असते सहज! मतल्यात, नका रांधू असे उसणे,मला खवळून खाऊ द्या.. नंतरच्या शेरात, मुलायम लागतो हलवा...(नुसताच खाल्ला तर!)पुरी कवळून खाऊ द्या! केक खाता येईल,काॅफी प्यावी लागेल! शेर ढेर! 'तर्री + करी'ने फिकेपणाच येईल! फिक्या,बेरंग खाण्याची कुठे उरते खूण मागे? तांबडी तेज तर्री..भाकरी मिसळून खाऊ द्या! खाऊ द्या या रदिफेस 'उधळून' हा काफिया न्याय देत नाही असे वाटते!'खवळून' पुन्हा वापरला असता तरी चालले असते! लस्सीच्या शेरांत वृत्त भंगते आहे! नको काजू?नको पिस्ते? पुरे डाएट,जाऊ द्या जरा आईस्क्रीम-लस्सी,मला मिसळून खाऊ द्या! असो!पण एक छान विडंबन दिलेत वाचायला! त्यातही माझ्या गझलेचे! हा अनुभव 'मिपा'वरच पहिल्यांदा अनुभवायला मिळाला! पण याआधीच्या एक-दोन रचना 'विडंबन' म्हणावे अश्याही वाटल्या नव्हत्या मला! हे विडंबन मात्र झक्कासंच!

In reply to by सत्यजित...

मूळ विडंबन केवळ दहा मिनिटात केले होते. साफसफाई जरा अधिक करायला हवी होती हे खरे म्हणजे वृत्तभंग टाळता आला असता.... वृत्तबद्ध विडंबन, वानगीदाखल सुमंदारमालेतल्या एका गजलेचे हे विडंबन बघा ... http://www.misalpav.com/node/10819

जबराट ! जबराट आणि निव्वळ जबराट ! ! ! ! ! अशी विडंबनं वाचून मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो :)

आमची भर :) कसा यावा स्वाद गाडीचा घरातील भोजनाला हायजिनची घोर चिंता जरा नकळून खाऊ द्या होऊदे जेवण तुडुंब तडस लागू दे जराशी एक मोदक शेवटाचा जरा विव्हळून खाऊ द्या अन्न देव, भक्त आम्ही, सेवनातच पूजन भक्तिभावे घास घास जरा चघळून खाऊ द्या - वेल्लाभट

कविता गंमतशीर आहे. अशा रितीने जुळवणे कठीण आहे. पु.ले.शु.