घर वादळाचे!
ओबरसॉल्ज़बर्ग!!
जर्मनीमधे म्यूनिचपासून साधारण दोन अडीच तासांवर असलेले एक गाव. गाव म्हणावे तर फारशी वस्तीसुद्धा नाही इथे. बर्कटेसगाडन या चिमुकल्या गावापासून काहीशा उंचीवर, डोंगराने कडेवर घेतलेला हा भूभाग. अत्यंत रमणीय निसर्ग, नजर जाईल तिथे हिरवीगार झाडी आणि जीवाला गारवा देणारी निवांत शांतता. ओबरसॉल्ज़बर्ग किंवा बर्कटेसगाडन, वरवर कुठल्याही सुंदर युरोपीयन लहानशा खेड्यांपैकी दिसणारी ही गावे गेल्या शतकात जागतीक रंगमंचावर घडलेल्या एका तूफानी नाट्याच्या केंद्रस्थानी होती याची आज कल्पनासुद्धा येणार नाही. या भागाने अवघ्या वीसेक वर्षांच्या काळात प्रचंड उलथापालथ बघितलीय, विनाश अनुभवलाय.
मिसळपाव