एक आठवण
आज १४ ऑगस्ट . बऱ्याच वर्षांनी ह्या दिवशी भारतात असण्याचा योग आला. सकाळी बाहेर गेलो असताना एक मुलगा मोटारीपाशी तिरंगा विकावयास आला आणि जुन्या आठवणी जागृत झाल्या.
८ऑगस्ट ४२ ला 'चले जाव' ची घोषणा झाली आणि त्याच रात्री काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना अटक झाली व ते तुरुंगात गेले. चळवळीचे नेतृत्व दुसऱ्या/ तिसऱ्या फळीतील नेत्यांकडे गेले. चळवळीचे स्वरूप बदलले . पण आम्हां ८/९ वर्षाच्या मुलांना फक्त एवढेच समजत होते की काहीतरी निराळे घडत आहे.
युद्ध संपले -- सर्व नेते सुटले आणि परत फरक जाणवला. ज्या नेत्यांना तुरुंगात टाकले होते त्यांना आता दिलीहून आमंत्रणे येऊ लागली.
मिसळपाव