Skip to main content

प्रतिशोध भाग - 2

लेखक कऊ यांनी रविवार, 13/08/2017 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिशोध भाग - दुसरा "ओय , काऊ लक्ष कुठे आहे ग तुझं??कॉफी थंड झाली..हॉट कॉफी कशाला ऑडर केली मग "जमेल तेवढ्या हळू आवाजात सियाल काव्याला ओरडत होता. दर रविवारी यांचा कट्टा जमायचा. आज काव्या आणि सियाल जरा लवकरच आले होते. तोपर्यंत बबलु , श्रीकांत ऊर्फ श्री , संदेश ऊर्फ सँडी यांची स्वारी तिथे पोहचली. बबलु : "काय रे कदम एरवी सांगतो की आमच्यात काही नाही आणि आज बरे दोघ ..बोला तुम्ही ..आम्ही जातो..आम्ही कशाला कबाब मे हड्डी.." "अबे Bmc तु तर तसपण हड्डी सारखाच आहे..मांस आहे कुठे तुझ्यावर.."सँडीच्या हातावर टाळी देत श्री उद्गारला. बबलु : "मेल्यांनो public place वर तरी नीट नाव घ्या माझं..बबलु महादेव चिंच

फक्त एकदा हसून जा...

लेखक निशांत_खाडे यांनी रविवार, 13/08/2017 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
मोडली ही प्रीत जरी, थांब थोडे बसून जा | जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा | कोमेजले हे फूल जरी, गंध आणखी आहे ताजा ; दैवाचा हा खेळ सारा ; नाही मुळी गं दोष तुझा. द्रावले ना हृदया जरी, पापण्यांना पुसून जा ; जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा | लावुनिया जीवास लळा, फुलविलास गं प्रीतमळा; कापिता केसाने गळा, झालो बघ मी वेडाखुळा. समजून मला दुधखुळा, हृदय माझे पिसून जा; जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा | मन माझे गुंतले हे, वेड्या खुळ्या आशेमध्ये; भांबावलेल्या या मनाचे , भाव तुला कसे न कळे. भावनांची या माझ्या, कदर तू गं करून जा; जगेन तुझ्या आठवणीवर, फक्त एकदा हसून जा | तुजविणा हे जग भा

मनुस्मृति भाग (३)

लेखक शरद यांनी शनिवार, 12/08/2017 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनुस्मृति भाग ३ पहिल्या दोन भागात आपण १२ अध्यायातील काही श्लोकांचे भाषांतर पाहिले. त्यात एक भाग जाणीवपूर्वक गाळला होता; तो म्हणजे शूद्रासंबंधी मनूचे विचार. आज आपण त्या संबंधातील काही श्लोक पहाणार आहोत. मनूचे विचार वीसाव्या शतकात पटणारे नाहीत. पण मनुस्मृतीवर विश्वास ठेऊन, त्याप्रमाणे वागणारे अनेक लोक भारतात होते. दलितांना मिळणारी वागणुक अमानुष अशीच होती. म्हणून १९२७ साली डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी प्रथमच मनुस्मृति जाहीरपणे जाळली. या घटनेची तुलना मुसलमान आक्रमकांनी नालंदा विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळली त्याच्याशी केली गेली पण ’ज्याचे जळते, त्यालाच कळते" हेच सत्य.

~~~मैत्री~~~

लेखक Swapnaa यांनी शनिवार, 12/08/2017 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
~~~मैत्री~~~ आपसुक ओळख सगळ्यात निखळ, आपुलकीचं नातं सर्व सामावून घेतं, जीवनाच्या मेळाव्यात भेटतात अनेक, मनाच्या कोपऱ्यात मैत्रीचं विशेष, रक्ताच्या नात्या पलिकडचं सर्वात अधिकतमच, एका हाकेत निस्वार्थ सोबत, जणु ओंजळीत मैत्रीची गाठ, सुख शांती ची शिदोरी दुख जाई दूर कोसवरी, हक्काचं रागावणे क्षणांत माफ करणे, हातात हात कायमची साथ, अलगद प्रवास सुखाचा सहवास, डोळ्यांत आठवणी अन,निःशब्द मैत्री.... कवी- स्वप्ना..
काव्यरस

पैठणी दिवस भाग-२

लेखक गुल्लू दादा यांनी शनिवार, 12/08/2017 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सर यांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज. संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला.

(तो मला खूप आवडतो)

लेखक रुपी यांनी शनिवार, 12/08/2017 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
तो मला आवडतो जेव्हा लाडिकपणे अंगाशी झोंबतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. जेव्हा किरकोळ लागलं की बँड-एड लावायला सांगतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. मी योगासने करताना पोटावर येऊन बसतो, तेव्हा तो मला खूप आवडतो. मी जरासं आवरून बाहेर जाताना "आई...

((तो मला आवडत नाही))

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 11/08/2017 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा- निओ यांची कविता "ती मला आवडते" जेव्हा तो त्याच्या पार्टीनंतर तर्राट होऊन माझ्या अंगाशी कसाही झोंबतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा किरकोळ वादातून तो मला हिंसकपणे Get out you bitch म्हणतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या खरं बोलण्यावर, समजावल्यावर मलाच लाथाबुक्क्याचा प्रसाद मिळतो तेव्हा तो मला आवडत नाही मी एकटीच आवरून बाहेर जाताना तो एकटक संशयानं बघतो तेव्हा तो मला आवडत नाही जेव्हा माझ्या कुठल्याही कामाचा विचका होतो त्याला कशी जिरली हिची असाच आसुरी आनंद होतो तेव्हा तो मला आवडत नाही माझ्या मनस्थितीचं आणि विचाराचं त्याला काहीच सो

अनवट किल्ले १६: पु.लं. च्या पुर्वजांचा कलनिधीगड, काळानंदीगड( Kalanidhigad, Kalanandigad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 11/08/2017 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
किल्ले म्हणले कि बहुतेकदा ईतिहासाचा आणि एतिहासिक गोष्टींचा संदर्भ येतो. पण काही किल्ल्यांचा संदर्भ वर्तमानातल्याच वेगळ्याच गोष्टीशी येतो आणि आपल्याही थक्क करणारी माहिती सामोरी येते. असाच एक किल्ला म्हणजे चंदगडजवळचा कलानिधीगड. थोडेसे काव्यात्मक नाव असलेल्या ह्या किल्ल्याला साहित्यिक संदर्भ आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्‌टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्‌टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल.