Skip to main content

विषाणूजन्य(viral)स्थुलपणा ,अर्थात virus ad36 आणि स्थुलपणा!!?

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी गुरुवार, 10/08/2017 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
जगभरात १९८० च्या दशकानंतर स्थुलपणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.विशेषतः प्रगत युरोप अमेरीकेत स्थुलपणाची साथ पसरली आहे(epidemics).याला कारण म्हणजे यांत्रिकीकरणाने केलेली प्रगती,त्यामुळे बैठ्या जीवनशैलीचा स्विकार,जंक फूड ,बाहेरचे खाणे वाढले आहे.अमेरीकन वर्क कल्चर जगाने स्विकारल्याने विकेंडला बाहेर फिरायला जाणे व बाहेरचे खाणे असा चंगळवादही स्थुलपणासाठी कारणीभूत ठरत आहे.पण या स्थुलपणासाठी आणखी एक कारण पुढे आलेले आहे.जे तितकेसे माहीत नाही पण खूप महत्वाचे आहे. काही वर्षांपुर्वी भारतीय वंशाचे अमेरीकन संशोधक निखिल धुरंधर व त्यांच्या टीमने adenovirus 36 अर्थात ad36 हा विषाणु(virus)स्थुलपणासाठी कारणीभुत असल

पुणे मान्सुन फेस्ट मिसळपाव

लेखक नितिन५८८ यांनी गुरुवार, 10/08/2017 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे मान्सुन फेस्ट मिसळपाव - ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट स्थळ - Occasions Lawn, Next to Regent Plaza, Baner-Pashan Link Road, from 12pm onwards. प्रवेश फी : ५० रुपये अधिक माहितीसाठी इथे पहा: https://lbb.in/pune/pune-monsoon-fest-misalpav-edition/

मी आणि पुस्तकं

लेखक रामदास यांनी गुरुवार, 10/08/2017 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांच्या माझ्या दुराव्याची खबर अजून आमची आपसकी बात है . माझा सगळा क्षोभ पुरवायला बाकी बरंच काही आहे. चार पाच मिनीटाचं हाफ लाईफ असलेले गुंते आता परवडतात. अंग काढून घेतलं असं म्हटलं तरी यांची कुजबुज सुरु होते . इतके सनातनी फंडे यांचे .... घर आवरलं तेव्हा चार शब्द बोलायला हवेत म्हणून ज़रा चाळून बघीतली चार पानं तर, धुवायला टाकलेल्या कमीजाचे खिसे उलटे करून तपासावेत बायकोने तसेच अगदी , मेंदूचे कप्पे उलट सुलट करून गेले, अगदी तंतोतंत ... जाऊ दे फट म्हणतात तशी साली आपलीच व्हायची ब्रह्महत्या म्हणून सरळ आंघोळीलाच गेलो .. आणि झालो मोकळा. तशी त्यांच्या माझ्या दुराव्याची गोष्ट अजून आपसकीच आहे

साडेपाच इंच !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 09/08/2017 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . . आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . . काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . . मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो ! कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ? कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं ! जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . . आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?

ऐसी भी क्या जल्दी है !

लेखक sudhirvdeshmukh यांनी बुधवार, 09/08/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सर्वाना पुढे जायची घाई आहे. परंतु काहि महाभागांना मात्र जरा जास्तच घाई दिसते. ही सतत व्यस्त, त्रस्त आणि काहिशी अत्यव्यस्त असणारी मंडळी भेटणार्यांची अनेक ठिकाणे आहेत. प्रामुख्याने ATM, पेट्रोल पंप, ट्राफिक सिग्नल्स, टिकिट खिडकी इत्यादी ठिकाणी ही मंडळी हटकुन भेटतात. गर्दीच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने वाहने पळवनारे कुशल वाहन चालक याच जात कुळीतले. बहुतेक सर्वाना रेल्वे स्टेशन वर जायचे आहे व पोहचले नाहीतर यांची गाड़ी सुटनार, अर्थातच गाडी सुटली तर यांचे आयुष्यभराचे नुकसान होणार, असेच आपल्याला वाटावे एवढ्या सुसाट वेगात ही मंडळी जात असतात.