मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू येता

चांदणशेला · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तू येता फुलांत गंध रुतला पाना फुलांत रानवारा नाचू लागला कंपने उठली अधरांच्या देहावरी सुखाचा हिंदोळा झुलतो ह्रदयावरी अधीर रातीचा रंग परि हसला तवं पंथावर झाले डोळे चांदण्यांचे चरणी दरवळे आभास स्पर्शांचे हूरहूर बावरी जाई वेटाळूनी जीवाला ओंजळीत मी चांदणे घेऊनी तुझ्या रेशमी केसांत माळूनी झाडाच्या डोईवर खेळतो चांद आपुला

वाचने 989 वाचनखूण प्रतिक्रिया 3

पैसा 20/04/2017 - 21:48
छान कल्पना आहेत एकेक!