टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन
टू वॉक ऑर टू जॉग; दॅट इज द क्वेश्चन. चालावं की धावावं हा सवाल आहे. हा सवाल अनेकांना पडतो. मग हा सवाल ते अनेकांना विचारतात. आणि शेवटी आपल्या सोयीनुसार, इच्छेनुसार, इच्छेच्या तीव्रतेनुसार याचं उत्तर आपल्यापुरतं निश्चित करून या सवालावर पडदा टाकतात.
या दोन्हींकडे तटस्थपणे बघितलं की आपल्याला कळतं की अधिक फायदेशीर काय आहे. तरीही व्यक्तीची इच्छा, शारिरिक कुवत, असलेला वेळ, इत्यादी गोष्टीही बघाव्या लागतात. याची सुरुवात कधी, कशी होते ते बघू. उमेदीच्या वयात म्हणजे २० ते ३० वर्षे या काळात बहुतेक जण व्यायाम, आरोग्य या विषयाकडे लक्ष देतात. प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो, पण देतात साधारणपणे.
मिसळपाव
)
आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.
.