संध्येच्या व्याकूळ छाया.
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about संध्येच्या व्याकूळ छाया.
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
संध्येच्या व्याकूळ छाया
अंधार माखुनी येती
हा डोह अंतरीचा
दुःखाने ढवळून जाती.
मी व्याकूळ होतो जेव्हा
दुःखाने मेघही झरती
अश्रूंनी विझुनी गेल्या
नभीच्या चांदणं ज्योती.
सावली उन्हाची व्हावी
तशीच शीतल माया
गेले प्रहर निघुनी
छळती स्मृतींच्या छाया.
अंधार भारल्या राती
नभी चांदणे झरते
अंधाऱ्या डोही दुःखाच्या
सुख तसे पाझरते.
https://youtu.be/dIeVgVYuzAI?si=SXcompql_binlOVa
युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो.