Skip to main content

मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक

लेखक कंजूस यांनी शनिवार, 21/02/2026 23:30 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1199
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मस्त भटकंती झाली ही. गोपुरावरून दिसणारे दृश्य अप्रतिम. मुर्डेश्वरचे मुख्य मंदिर किती जुने आहे? सगळेच उद्योजकानेच बांधलेय की जीर्णोद्धार केला आहे? भटकळ दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल्समुळे बदनाम झालेले आहे, तिथं फिरताना तसे काही जाणवलं का? बाकी असेच फिरत राहा आणि लिहीत राहा.

In reply to by प्रचेतस

मुर्डेश्वराचं छोटंसं देऊळ असावं कधीतरी पण आता सगळा कायापालट आहे.नेटवरच शोधावं लागेल. ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात ते पर्यटकांच्या फायद्याचे झाले आहे हे निश्चित. तसं पाहिलं तर कुमटा येथे आणि बरेच ठिकाणी अतिशय सुंदर समुद्रकिनारे आहेत कर्नाटकात. बेंगळुरूतल्या युवावर्गास जवळचा समुद्र हाच आहे. ब्रिटिश काळात ते लोक पूर्व किनाऱ्यावरील मछलीपट्टणम येथे घोड्यावरून जात आणि तिथून विलायतेला जहाजातून. थोडी पुस्तकं वाचेन म्हणजे कळेल. कारवारबद्दल माहीत आहे. १८५७ नंतर ब्रिटिशांनी कारवार हे आरमार बंदर म्हणून वाढवले. वसाहत वाढवली. त्या अगोदर कादवाड नावाची स्थानिक वस्ती होती. रविंद्रनाथ टागोरांचा भाऊ तिकडे गवर्नर म्हणून किंवा एक अधिकारी म्हणून आला होता आणि त्याच्याकडे येऊन राहिले होते. तो समुद्र किनारा त्यांना फार आवडला होता. ( कोलकात्याच्या हुगळी नदीच्यामुळे गाळाने भरलेल्या किनाऱ्यांपेक्षा वेगळा). त्यामुळे टागोर बीच नाव पडले कारवार बीचला. भटकळ बद्दल काही सांगता येत नाही. आता दक्षिणेत कर्नाटक, तमिळनाडू फिरलो तर प्रत्येक शहराचे दोन भाग आहेत हे जाणवते. आपल्या फायद्याचे म्हणजे हिंदी बोलणारे लोक असतात अर्ध्या भागात . ते सर्व धंद्यात आहेत. ट्रान्सपोर्ट, हॉटेलिंग, फ्रूट मर्चंट, बेकरी उद्योग. सामान्य माणसास गरज लागणाऱ्या सर्व वस्तूंचे व्यापार.[ इथे अधिक लिहू शकत नाही.] बॅगा जवळ नसत्या तर भटकळ गावात फिरलो असतो. हा जो बस स्टँड आहे तो मुख्य रस्ता NH 66 वर आहे, भटकळ गाव किनाऱ्याकडे पसरले आहे. ठाण्याजवळच्या मुंब्र्याशी तुलना भटकळची होईल का सांगता येत नाही. सगळं गुप्तपणे चाललेलं असतं. आपल्याला समजत नाही. पण काही राजकीय सामाजिक उलथापालथी झाल्या की पेपरात बातमी येते. मंगळुरुच्या पुढे दक्षिणेला केरळमध्ये तीन जिल्हे हे मोपले चळवळीचे धरले जात असत. तिकडे केरळचे पर्यटक जात नाहीत. हल्ली वायनाडच्या प्रसिद्धीमुळे कोळ्हीकोडला ( जुने कालिकत) पर्यटक जातात. भाषा - कारवार ते भटकळपर्यंत कारवारी कोकणी बोलली जाते. ती ऐंशी टक्के मराठी आहे. पण पुढे उडुपी पर्यंतची ख्रिश्चन मुसलमानांची लोकांची हीच भाषा आहे. उडुपी मंगळुरुचे हिंदू मात्र तुळु बोलतात. शेट्टी हॉटेलवाले तुळूच. पण ते खरे म्हणजे मदुराई जवळच्या चेट्टीनाड इथले आहेत. काही आणखी खात्रीची माहिती सापडली तर लिहीनच.

In reply to by कंजूस

आपल्या फायद्याचे म्हणजे हिंदी बोलणारे लोक असतात अर्ध्या भागात .
येस. चेनै मध्येही मला अस्खलित हिंदी बोलणारे दुकानदार भेटले होते व सर्व मुस्लीम होते. प्रादेशिक अस्मिता,धर्म वगैरे बद्दल कितीही डोकेफोड केली तरी परमुलखात कमीतकमी आपली समस्या तरी समजणारा कोणी समोर असला तर फार बरे वाटते.

भटकळ मध्ये ७५ % लोकसंख्या मुस्लिमांची आहे आणि तेथील बरेच तरुण आखाती प्रदेशात नोकरीला असत. यामुळे या लोकांमध्ये थोडी फार सुबत्ता आलेली होती त्याचबरोबर तस्करी आणि गुन्हेगारी पण आली होती आणि नंतरच्या काळात इस्लामी मूलतत्त्ववाद हि वाढीस लागलेला होता. मुंबईत फोर्ट भागात जसे तस्करीने आणलेले सामान मिळत असे ( मुंबईत मल्याळी मुसलमान जास्त होते) तसेच भटकळला सुद्धा या सामानाचे मार्केट होते (भटकळ दुबई मार्केट) पण त्या बाजारात तिथल्याच मुसलमानांचा जास्त सहभाग होता. अगदी नुकत्याच आंतराष्ट्रीय बाजारात आलेल्या वस्तू तेथे सहज मिळत असत. १९९० -९१ च्या आसपास येथे सोने चांदी अमली पदार्थ आणि इलेकट्रोनिक सामानाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असे. माझे अनेक मित्र नौदलात विविध जहाजांवर होते त्यांच्याकडून अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकलेल्या आहेत. १९९९-२००० या काळात मी तटरक्षक दलात तैनातीवर होतो त्यावेळेस तटरक्षक दल या भागावर "नजर" ठेवून होते.

"मुर्डेश्वर" लेख तर दिसत नाहीच पण "गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक" सुद्धा दिसत नाही. "MiPa Transition" मध्ये लिखाण हरवले?