मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संध्येच्या व्याकूळ छाया.

Deepak Pawar · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
संध्येच्या व्याकूळ छाया अंधार माखुनी येती हा डोह अंतरीचा दुःखाने ढवळून जाती. मी व्याकूळ होतो जेव्हा दुःखाने मेघही झरती अश्रूंनी विझुनी गेल्या नभीच्या चांदणं ज्योती. सावली उन्हाची व्हावी तशीच शीतल माया गेले प्रहर निघुनी छळती स्मृतींच्या छाया. अंधार भारल्या राती नभी चांदणे झरते अंधाऱ्या डोही दुःखाच्या सुख तसे पाझरते. https://youtu.be/dIeVgVYuzAI?si=SXcompql_binlOVa

वाचने 584 वाचनखूण प्रतिक्रिया 7

गणेशा Wed, 02/25/2026 - 14:18
छान... करून... ____________ कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी --- गणेशा