लॉकडाऊन : सातवा दिवस
नमस्कार आणि सुसकाळ मिपा मित्र मैत्रिणी सखे सुहृद हो !
बाहेर ऊन आणि कोरोनाविषाणू मी मी, तू तू, तुम्ही तुम्ही म्हणताहेत आणि आत आम्ही आपापल्या वर्तुळात सुखेनैव पण जरासे भेदरलेले , लक्ष्मणरेषा सांभाळत बसलो आहोत.
आज लॉकडाउनचा सातवा दिवस ! आपण म्हणजे जगाचं केंद्र आहोत असं वाटू लागलंय. कारण जगामध्ये घटना इतक्या वेगाने घडताहेत आणि आपण एकाच जागी ठप्प ! अर्थात, वर्क फ्रॉम होम सोबतच बरेच दिवस तुंबलेले होम-वर्कसुद्धा सुरू असल्यामुळे वेळ जात नाही ही बातच नस्से ! काही काही सोप्या पाकृ (उपलब्ध आयटेम्स मध्ये) प्रयोगावून घेतल्या. विशेष म्हणजे टेस्टीही झाल्या.
मिसळपाव

