Skip to main content

अखेर जमलं !

Published on 26/07/2025 - 19:33 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी. शीर्षक वाचून तुम्हाला काय वाटतंय ते आलंय माझ्या लक्षात. पण तसं काही नाही बरं का! आज मी तुम्हाला माझ्या नादिष्टपणाची एक‌‌ गोष्ट सांगणार आहे. तर झालं असं की, अलीकडेच‌ माझा‌ वाढदिवस झाला. आता या‌ वयात कसलं आलंय " सेलीब्रेशन" वगैरे! ना खाण्याचा पराक्रम ना पायात फिरण्याचा जोर. तेव्हा वाढदिवस आणि नित्यक्रम ‌यात फारसा काही फरक पडत नाही. नाही म्हणायला मित्रमंडळी,नातेवाईकांचे फोन येतात. झालंच तर व्हाटस् ॲप ग्रुपवर ,वाढदिवसाच्या ढीगभर हार्दिक शुभेच्छा, आज काय स्पेशल? आणि तत्सम संदेशांचा धबधबा वाहतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4718

हम किसी भी हद तक जा सकते है|

Published on 25/07/2025 - 11:35 प्रकाशित मुखपृष्ठ
https://www.youtube.com/watch?v=Dt8FOiyA72E वरील एका प्रकरणात न्यायाधीशांनी स्वतः सर्वासमक्ष चालू कोर्टात संबंधित अधिकार्‍याला फोन लावला आणि प्रकरण समजाऊन घेतले आणि समस्या सोडवली. ही तत्परता खालच्या कोर्टात दिसली तर जनतेचा न्यायालयांवरचा विश्वास वाढेल. अल्पोळी धाग्याबद्दल क्षमस्व!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1607

धाव पाव देवा आता देई एक पाव...

Published on 24/07/2025 - 16:59 प्रकाशित मुखपृष्ठ
आज मार्केट्मध्ये दम नव्हता. ग्रोकला स्क्रीनशॉट देऊन विचारलं होल्ड करू एक्झिट ग्रोक ने विचार करून लगेच एक्झिट करायला सांगितलं. तेव्ह्ढयात कशानंतरी लक्ष विचलित झालं आणि माझी पोझिशन गडगडली. मग चिडचिड करत बाहेर पडलो. पण मार्केटचा राग कशावर काढायचा म्हणून पाव करावा असं मनात आलं. पावासाठी कणीक तिंबणे थेरप्युटीक असते. जवळ-जवळ ४-५ वर्षे पाव घरात केलाच नव्हता. मग धडाधड सगळी कपाटे शोधून सामान बाहेर काढल.

याद्या 5505

लालची कावळा आणी नाचण

Published on 24/07/2025 - 16:21 प्रकाशित मुखपृष्ठ
लालची कावळा आणी नाचण ही लिंक आपल्याला तू नळीवर घेऊन जाईल. चित्रफित बघा. रोजच्या पक्षीदर्शनात विविध पक्षांचे मानव सदृश्य स्वभाव बघायला मिळतात. ते बघताना प्रकृतीबद्दलचे कुतुहल आणखीन वाढत जाते. "कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरूषार्था" मनोहर कविश्वर यांच्या गीता प्रमाणे, सैन्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नाव मिळवून सेवानिवृत्त झाल्यानंतर बापाचे कर्तव्य पुर्ण करत मुलींची लग्ने केली.जगरहाटी,नातवंड झाली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1459

रॉय ३ - ग्लेशियरचं गाव

Published on 24/07/2025 - 13:41 प्रकाशित मुखपृष्ठ
रॉय !!! रॉय २ - सेरो तोरे फार फार पूर्वीची गोष्ट…पातागोनियाच्या विशाल डोंगराळ मुलुखात, अँडीज पर्वतांच्या सावलीत, अनेक आदिम जमाती नांदायच्या. त्यातल्याच तव्हेलचे जमातीच्या सरदाराला एक मुलगी होती, कलाफाते. अत्यंत रूपवान असलेल्या कलाफातेचं दुसऱ्या जमातीतल्या एका तरुणावर मन जडलं. हे आंतर-जमातीय प्रेम पोरीच्या बापाला काही मान्य नव्हतं. आपली लेक त्या तरुणाचा हात धरून पळून जाऊ नये म्हणून त्यानं रागाच्या भरात जादूनं तिचं एका काटेरी झुडुपात रूपांतर केलं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3893

कवडसे-२

Published on 24/07/2025 - 13:06 प्रकाशित मुखपृष्ठ
कवडसे पद्मावतीला दादा गोडसेंना भेटायला गेलो होतो. दादा म्हणजे तलवारीची धार.श्रीधर स्वामींचे शिष्य. त्यांच्याबरोबर कितीतरी वर्ष राहिलेले. आयुष्यभराची साधना. मिनिटा मिनिटाला परीक्षा घ्यायचे. त्यांच्याशी वागताना बोलताना फार जपून राहावे लागे. बहुतेकदा मी फक्त ऐकायचेच काम करायचो. अशा गप्पातून खूप शिकायला मिळायचे. ======================== तर दादा सांगत होते. अरे रायगडावर राज्याभिषेक सोहळा होता. इंदिरा गांधी आल्या होत्या. मला त्यांच्यासमोर पोवाडा म्हणायचा होता. पण भाषणे खूप लांबली. मला चान्स मिळेल का नाही माहीत नव्हते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1841

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

Published on 23/07/2025 - 14:29 प्रकाशित मुखपृष्ठ
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!
लेखनविषय:

याद्या 3692

रेकमेंडेशन लेटर

Published on 23/07/2025 - 11:16 प्रकाशित मुखपृष्ठ
रेकमेंडेशन लेटर ========== पूर्वप्रसिद्धी - फेबु, ऑगस्ट २०२४ माझ्या आईवडीलांनी मला बरंच काही दिलं, पण त्यात काही गुण द्यायचे ते विसरले. ते जन्मत: मिळाले असते तर आतापर्यंतचे आयुष्य जास्त सोपं गेलं असतं... हे गुण कोणते? - कोडगेपणा, गेंड्याची कातडी आणि हलकटपणा हे तीन गुण तुमच्यामध्ये असतील तर नैतिक प्रश्नांचे त्रांगडं सोडविणे फारसे त्रासदायक होत नाही. अनेक वर्षांपूर्वी माझ्या एका अत्यंत बुद्धीमान मित्रामुळे आलेला एक गमतीदार अनुभव आजही स्मृतीमध्ये ताजा आहे. तर झालं असं की हा माझा मित्र आय० आय० टी० मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक विजेता होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1284

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (ऐसी अक्षरे ३१)

Published on 22/07/2025 - 12:23 प्रकाशित मुखपृष्ठ
गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत :) :) हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4512

सहा कोवळे पाय

Published on 21/07/2025 - 18:58 प्रकाशित मुखपृष्ठ
नादमय सरसर कोवळ्याशा वाटेवर कोवळ्या सहा पायांची चाल होई भरभर एकामागे दुजा चाले पुढचे न पाहताना पुढच्याचे ध्यान नाही पुढे पुढे चालताना कधीतरी भांबावून पुढचा जागी थिजतो हरवल्या मागच्याला चार दिशांत शोधतो मागलाही नकळत गेलेला पुढे जरासा थबकून तोही टाके पुढच्यासाठी उसासा क्षणातच पुन्हा होई नजरेत त्यांची भेट हुश्श मनात करूनि चालू पुढे त्यांची वाट - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, १५/०७/२०२५) (प्रेरणा)
लेखनविषय:

याद्या 2878