मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नमस्ते, सचिन...

सुभाष् अक्कावार ·
कुणी नंबर देता का नंबर लैंडलाइन किंवा मोबाइल... कुणाचा म्हणून काय विचारता ? अहो, आपल्या लाडक्या तेंडल्याचा !... नंबर नाही मिळाला तर काय करीन म्हणता ? कुतुबमीनार किंवा लाल किल्ल्यावर चढून जाईन... एव्हरेस्टचे उंच शिखर गाठीन... अथवा 'ताजमहाल'च्या भव्य प्रांगणात उभा राहीन... मनापासून करायचाय अभिनंदनाचा वर्षाव सचिन रमेश तेंडुलकरवर !... वीस वर्षापासून आपल्या बहारदार खेळाने अवघ्या क्रिकेट रसिकांना भरभरून स्वर्गीय आनंद मिळवून दिल्याबद्दल... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी तीस हजार रन्स काढल्याबद्दल... वनडेत नाबाद दोनशे रन्सची सर्वोच्च खेळी केल्याबद्दल... कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पन

स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती

शुचि ·
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा. श्री दत्त व प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार होते. एक कृत युगातले तर दुसरे त्रेता युगातले. प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत.

शतकांच्या बादशाह ला सलाम !!

टारझन ·
जगातली सगळी विशेषनं , सगळे शब्द आज खुजे पडल्याने इतकेच. रिकी पाँटिंग च्या तोंडावर हुप हुप करत .. जेंव्हा सर्वांत जास्त गरज होती तेंव्हा लावलेले ५०वे शतक. त्याचं नावंही घेण्याची गरज नाही , खुप पलिकडे गेलाय तो . (आनंदित) टारझन

नायकिणीचा नाच

डॉ.श्रीराम दिवटे ·
आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची. परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्‍या नायकिणी आल्यात.

ब्रा-ज्वलन ते मुखपुस्तकावरील उरोजकर्क स्थितीसंदेश : स्त्रीमुक्तीवादातील बंधन-दृष्टिकोन प्रवासाचा मागोवा

राजेश घासकडवी ·
नगरीनिरंजन यांनी मुखपुस्तकातल्या उरोजकर्क स्थितीसंदेशांवर एक खुमासदार लेख लिहिला होता. वरवर पहाता हा लेख हलकाफुलका, वात्रट वाटतो खरा, पण त्यामध्ये गहन अर्थ दडलेला आहे. ती लिंगभूमिकांविषयी, स्त्रीमुक्ती चळवळीविषयी काळ्या विनोदातली टिप्पणीच आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. उरोजांप्रमाणेच ठसठशीत समोर दिसणाऱ्या या विषयाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं हूक काढल्याशिवाय तो विषय हातात सामावून येऊच शकत नाही असं आम्हाला वाटलं. म्हणून एक स्वतंत्र लेखच लिहायचं आम्ही ठरवलं. साठ का कुठच्याशा दशकात अमेरिकेत स्त्री-मुक्तीचं वारं वाहात होतं.

लेवू दे निळाई..

स्वानंद मारुलकर ·
झेपावत्या धरेला गगना कवेत घेई अंगांग तृप्त कर तू मज लेवू दे निळाई आधार मीच होते दुबळ्या जगास सार्य़ा माझ्या मनातूनी का पण शोधते निवारा जेव्हा तुला पहाते हरपून भान जाई देतोस रंग ओले माझ्या सुन्या मनाला क्षितिजास रेखिसी अन सौभाग्यरूप माला घे जिंकूनी मला तू अपुल्या गृहास नेई - स्वानंद

बंडूच्या स्वप्नातच येते -

विदेश ·
बंडूच्या स्वप्नातच येते स्वर्गामधुनी छान परी झोपेमधला हीरो बंडू मौजमजा धम्माल करी ।१। खात ‘ बुढ्ढीका बाल ’ शंभर बंडू होतो लालीलाल चोखत लॉलीपॉप शंभर बंडू करतो पहा कमाल ।२। ट्वेंटी-ट्वेंटित बंडू ऐटित ठोकी शतके चार बळी दहाही घेऊन करतो शत्रूला बेजार ।३। खुशालचेंडू मिळवी बंडू गुण शंभरपैकी शंभर निकालात ना कधीच सोडी तो अपुला पहिला नंबर ।४। ऑलिंपीक वा एशियाड ती असो कोणतीही स्पर्धा प्रतिस्पर्ध्यांची उडवी बंडू क्षणात भलती त्रेधा ।५। बंडू वरचढ ठरतो नेहमी - खेळ असो मारामारी कुस्तीमध्ये डाव बंडुचा धोबीपछाडच भारी ।६। मारी शाळेला तो बुट्टी स्वप्नामधला बंडू देतो अभ्यासा तो सुट्टी खेळत विट्

सायबानू मीच त्यो .... अंतिम

स्पा ·
भाग १ http://www.misalpav.com/node/15817 भाग २ http://www.misalpav.com/node/15840 भ्रष्टाचार करून, किसन आणी त्याच्या कुटुंबाचा जीव घेतलेल्या, शेळ्क्यांवर त्यांचाच डाव उलटलेला असतो.... हळू हळू बदल्याचा अघोरी खेळ त्या बंगल्यात सुरु झालेला असतो..

आक्रोष

चन्द्रशेखर गोखले ·
ते झाड तोडल्या पासून त्यांचा आक्रोष वाढला होता तसा आमचाही नाईलाज होता त्या झाडाखाली पार्क केलेल्या आमच्या कीमती गाड्यांवर वादळ वा-यानं फांद्या तुटून पडण्याचं भय होतं.. नुकसान झालं असतं आमच्या गाड्यांचं कधीहि भरून न येणारं..!!!!! त्यापेक्षा त्या झाडाच्या फाद्यांवर वसलेली त्यांची इवलिशी घरटी, पिलांसकट उध्वस्त झाली तरी चालतील असा व्यवहार्य विचार केला आम्ही..! आहो घरटी काय, ते पुन्हा बांधू शकतात फुकट ! पिल्ल काय ,ते पुन्हा जन्माला घालू शकतात फुकट ! पण झाडाची फांदी कोसळून मोडलेली आमची गाडी घेण्यासाठी, पैसे मोजावे लागतील आम्हाला..!! छे !