मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका डॉक्टरच्या कविता-३: रिटायरमेंट

डॉ अशोक कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एका डॉक्टरच्या कविता-३: रिटायरमेंट ( थोड़ी प्रस्तावना: फ्यामिली डॉक्टरचा जमाना गेला, स्पेशालिस्टचा ज़माना आला. स्पेशालिस्टला काही संवयी असतात, त्या चिकटल्या की चिकटल्या. अशाच काही सवई आणि त्यांचे हे किस्से, खरे नव्हे, पण खोटे तरी कसे म्हणू ? ) १. Orthopedician साठाव्या वर्षी शेवटचं ट्रयाक्शन लावून ओर्थोपीडीशीअन घरी आला दारातच पाय घसरून वोर्डात परत गेला २. फिजिशियन फिजिशियन ची साठी आली हातात काठी आली अंगात कंप आला डोळ्यात मोती आला तरी सुद्धा आपल्या बधीर कानाला त्यान स्टेथो लावला आणि स्वत:चाच हार्ट-रेट मोजू लागला! ३. सर्जन हजार अपेंदीक्स, सातशे हायड्रोसील आणि पाचशे हर्निया करून सर्जननं नाईफ खाली ठेवली नाईफ सुटली अन वाइफ हंसली ! ४. सायकीयाट्रीस्ट रिटायरमेंट च्या दिवशी सायकीयाट्रीस्टनं केली घोषणा "आता माझा एकाच बाणा आज पर्यंत वेड्यान्ची सेवा आता करीं समाज सेवा" मिसेस सायकीयाट्रीस्ट म्हणाल्या : " यानी कसलं खूळ काढलय याना नक्कीच वेड लागलय !" ५. Pediatrician रिटायरामेंट च्या दिवशी pediatrician रंगात आला रंगाताच घरी येवून "Pedaitric ड़ोस" दिला गोरी-मोरी बायको झाली लाजून मुरकून ती म्हणाली "इश्श, हे हो काय सारखं सारखं लहान मुला सारखं!" ६ Pathologist रिटायरमेंट च्या दिवशी Pathologist सासरा झाला मुलगा सून दोघं आले पाय त्याचे धरू लागले मुलगा म्हणाला "बाबा, सून तुमची कशी आहे निवड माझी कशी आहे?" Pathologist म्हणाला "काहीच सांगण जमात नाही Microscope शिवाय काहीच दिसत नाही!" ७ Cardiologist हार्ट स्पेशालिस्ट रिटायर झाला त्याच दिवशी प्रेमात पडला पिकलं पान हिरवं रान कसं काय झालं त्याला विचारलं तो म्हणाला: "मैंने उसको नहीं देखा उसका दिल देखा!" -अशोक माझ्या आधीच्या कवितांसाठी लिंक १. ड्यूटी http://www.misalpav.com/node/14909 २. एक संवाद http://www.misalpav.com/node/15130

वाचने 2140 वाचनखूण प्रतिक्रिया 7

चिंतामणी 19/12/2010 - 20:09
डॉक्टरसाहेब, मस्तच. "फ्यामिली डॉक्टरचा जमाना गेला, स्पेशालिस्टचा ज़माना आला. " हे आपणच म्हणलात हे जास्त चांगले.

डॉ अशोक कुलकर्णी 23/12/2010 - 16:22
प्राजु व सुनील... धन्यवाद !