आपण खोटे बोलता का?

घाशीराम कोतवाल १.२'s picture
घाशीराम कोतवाल १.२ in काथ्याकूट
2 Sep 2009 - 3:13 pm
गाभा: 

आपण खोटे बोलता का? ...... हं हं थांबा मंडळी अस बुचकाळ्यात पडु नका अहो हा एक साधा सोपा प्रश्न आहे हो आपण खोटे बोलता का ? अहो आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी खोट बोलत असते जिथे देवादिकांना खोट्याचा आधार घ्यावा लागला तिकडे आपल्या सारख्या मर्त्यमानवाची काय व्यथा. धर्मराज युधीष्ठीर कुरुक्षेत्रावर खोट बोलला भगवान विष्णु स्त्री रुपात देव दानवाच्या पंक्तीत वाढायला गेले तिथे त्यांनी असुरांना मद्य आनि देवांना अमृत वाढले तर मग आपण साधी माणस हो ?
तर मग चला सुरु करुया सच का सामना घाबरु नका हो ईकडे आम्ही तुमच्या अब्रुचे धिंडवडे काढणारे प्रश्न नाहि विचारनार फक्त मौज मजा करण्यासाठीच खालील प्रश्न आहेत

१ आपण खोट बोलता का?
२ आपण खोट का बोलता ?
३ आपण खोट जाणुन बुजुन बोलता कि मजबुरी मधे बोलता ?
४ आपल्या खोटे बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला आहे का?
५ आपण जास्त खरे बोलता कि खोटे बोलता ?
६ आपल्या ह्या खोटे बोलण्यामुळे नेहमी आपला फायदा होतो कि तोटा?
७ एक खोट लपविण्यासाठी १०० वेळा खोट बोलावे लागते ह्या म्हणीचा प्रत्यय आपणास आला आहे का?

मंडळी एक विषेश विनंती वरील प्रश्नांची उत्तरे आपण खरी खरी द्या ...
:D :D बायदवे मी पुष्कळ वेळा खोट बोलतो हो :D :D

प्रतिक्रिया

अवलिया's picture

2 Sep 2009 - 3:16 pm | अवलिया

आम्ही कधीही खोटे बोलत नाही सबब प्रश्न गैरलागु !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अभिज्ञ's picture

2 Sep 2009 - 3:17 pm | अभिज्ञ

हो मी खोटे बोलतो व लिहितो देखील.
आतादेखील मी तेच करत आहे.
;)

(खोटारडा) अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

सखाराम_गटणे™'s picture

2 Sep 2009 - 3:20 pm | सखाराम_गटणे™

१ आपण खोट बोलता का?
हो
२ आपण खोट का बोलता ?
संतुलनसाठी
३ आपण खोट जाणुन बुजुन बोलता कि मजबुरी मधे बोलता ?
वेळे प्रमाणे
४ आपल्या खोटे बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला आहे का?
माहीत नाही
५ आपण जास्त खरे बोलता कि खोटे बोलता ?
खरे
६ आपल्या ह्या खोटे बोलण्यामुळे नेहमी आपला फायदा होतो कि तोटा?
कधी कधी
७ एक खोट लपविण्यासाठी १०० वेळा खोट बोलावे लागते ह्या म्हणीचा प्रत्यय
आपणास आला आहे का?
नीही

sneharani's picture

2 Sep 2009 - 3:30 pm | sneharani

१ आपण खोट बोलता का?
Kadhitarich
२ आपण खोट का बोलता ?
Ekadyach changal karnyasathi
३ आपण खोट जाणुन बुजुन बोलता कि मजबुरी मधे बोलता ?
tya tya paristhitivar avalambun
४ आपल्या खोटे बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला आहे का?
nakki mahit nahi kadachit jhala aselhi
५ आपण जास्त खरे बोलता कि खोटे बोलता ?
खरे
६ आपल्या ह्या खोटे बोलण्यामुळे नेहमी आपला फायदा होतो कि तोटा?
कधी कधी फायदा an कधी कधी तोटा
७ एक खोट लपविण्यासाठी १०० वेळा खोट बोलावे लागते ह्या म्हणीचा प्रत्यय
आपणास आला आहे का?
Ho, आला आहे.

सूहास's picture

2 Sep 2009 - 3:44 pm | सूहास (not verified)

आपण बोट का मोडता ?
आपण बोट जाणुन बुजुन मोडता कि मजबुरी मधे बोलता ?
आपल्या बोट मोडण्यामुळे कोणाला त्रास झाला आहे का?
आपण जास्त फाटे फोडता कि बोट मोडता ?
आपल्या ह्या बोट मोडण्यामुळे आपला फायदा होतो कि तोटा?
एक बोट मोडण लपविण्यासाठी १०० वेळा बोट मोडावे लागते ह्या म्हणीचा प्रत्यय आपणास आला आहे का?
कृपया वरिल प्रश्नांची सर्व खरी घेणे..

असो जोक्स अपार्ट(सौजन्य : छोटा डॉन..)......

१ आपण खोट बोलता का?
होय आणी नाही...

२ आपण खोट का बोलता ?
वेळ प्रसंग नोघुन जाण्यासाठी..

३ आपण खोट जाणुन बुजुन बोलता कि मजबुरी मधे बोलता ?

अर्थातच मजबुरी मध्ये जाणुन बु़जुन

४ आपल्या खोटे बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला आहे का?

हे मला कसे काय माहीत असणार..

५ आपण जास्त खरे बोलता कि खोटे बोलता ?
त्याच्याने फरक पडत नसावा..

६ आपल्या ह्या खोटे बोलण्यामुळे नेहमी आपला फायदा होतो कि तोटा?
हम्म...वैयक्तीक प्रश्न...पास

७ एक खोट लपविण्यासाठी १०० वेळा खोट बोलावे लागते ह्या म्हणीचा प्रत्यय आपणास आला आहे का?

ना ही....

भल्यासाठी बोलाव लागणार खोट हे चांगल असते असे भगवान श्रीकृष्ण बहुतेक गीतेत का कुठतरी म्हणतात...

सू हा स...

विशाल कुलकर्णी's picture

2 Sep 2009 - 4:16 pm | विशाल कुलकर्णी

१ आपण खोट बोलता का?
सर्रास्स्स्स्स !
२ आपण खोट का बोलता ?
पहिल्यांदा बोललेलं खोटं लपवण्यासाठी किंवा सावरुन घेण्यासाठी .
३ आपण खोट जाणुन बुजुन बोलता कि मजबुरी मधे बोलता ?
ते समोरच्यावर अवलंबुन आहे.
४ आपल्या खोटे बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला आहे का?
बाकिच्यांचं माहीत नाही, स्वतःला मात्र होतो. (कुणाला काय टेपा लावल्या होत्या तेच लक्षात राहात नाही, मग याचे त्याला होते ;-) )
५ आपण जास्त खरे बोलता कि खोटे बोलता ?
जास्त खरे बोलतो, खोटे कधी कधीच . (जसे आत्ता बोलतोय ;-) )
६ आपल्या ह्या खोटे बोलण्यामुळे नेहमी आपला फायदा होतो कि तोटा?
Please reffer answer no. 4
७ एक खोट लपविण्यासाठी १०० वेळा खोट बोलावे लागते ह्या म्हणीचा प्रत्यय आपणास आला आहे का?
Please reffer answer no. 2

(कधीकधीच खरे बोलणारा)

विशालशास्त्री प्रभुणे
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

चतुरंग's picture

2 Sep 2009 - 4:33 pm | चतुरंग

मी फक्त बोलतो; खरं खोटं देव जाणे! ;)

(खरे-खोटे)चतुरंग

अवांतर - एक कोडं आठवलं. एक माणूस चालताना रस्त्याच्या एका फाट्यावर येतो. तिथे दोन रस्ते फुटत असतात रस्ते 'अ' आणी 'ब' गावाकडे जातात. आणी दोन्हीकडे एकेक शिपाई असतो. त्याला 'अ' गावाला जायचे असते. त्याला एक पक्के माहीत असते की एक शिपाई नेहेमी खोटे बोलतो आणी दुसरा नेहेमी खरे. जर त्या माणसाला शिपायाला एकच प्रश्न विचारुन 'अ' कडे जायचे असेल तर तो कोणता प्रश्न विचारेल?

धमाल मुलगा's picture

2 Sep 2009 - 5:37 pm | धमाल मुलगा

पण तिघांपैकी कोण कोणाला फाट्यावर मारेल ते सांगा :P

घाश्या, मेल्या तुलाही कैच्या कै प्रश्न पडतात लेका...
माझं उत्तर: मी एक लंबरचा खोटारडा आहे..आणि होणारा त्रास सहन करण्याची ताकद ठेवतो..बाकी मारतो फाट्यावर!
शिंपल.

आपला,
(खर्‍या-खोट्यातला) धम्या.

दिपोटी's picture

2 Sep 2009 - 6:33 pm | दिपोटी

चतुरंगजी,

हे एक उत्तर असू शकेल ...

कोणत्याही एका शिपायाला विचारावे : "मी जर त्या दुसर्‍या शिपायाला असे विचारले की 'हा रस्ता (पहिला शिपाई - ज्याला आपण प्रश्न विचारीत आहोत - ज्यावर उभा आहे तो) कोठे जातो' तर तो काय उत्तर देईल ?" उत्तर हमखास खोटेच येईल (कारण खरे + खोटे = खोटे + खरे = खोटे) जेणेकरून 'अ' गावाचा रस्ता कोणता हा निष्कर्ष आपण काढू शकतो. काय म्हणता ?

या धाग्याबाबतीत सांगायचं झालं तर एक उक्ती आठवली ... "खोटे सगळेच बोलतात, पण त्यातील फक्त काही जणच ते कबूल करतात. मी मात्र हे कबूल करीत नाही".

- दिपोटी

दादा कोंडके's picture

2 Sep 2009 - 6:37 pm | दादा कोंडके

खरं आणि खोटं हे सापेक्ष असतं. आपण जे बोलतो, ते आपल्या त्यावेळच्या ज्ञानावर ते अवलंबून असतं. ज्ञानप्राप्ती ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. ज्याला अज्ञानाचं देखील ज्ञान असतं तो "मुमुक्षू". आपण सगळी सामान्य माणसं, त्यामुळे मौनच खरं असू शकतं.

श्री श्री ....२०१ वेळा (दादा)

विकि's picture

2 Sep 2009 - 11:53 pm | विकि

अपुन हमेशा सच ही बोलताय क्या. अपनी कोई मजबुरी नही क्यो के झुट बोले कव्वा काटें.........

एक गोरा एक काला कव्वा दोनोमेसे कौनसा काटेगा ये आपही सोचो.
आपका
सच की राह पर चलने वाला (फुल्टू फिल्मी विकिभाय)

अवलिया's picture

2 Sep 2009 - 11:55 pm | अवलिया

पितृपक्षाचे कावळे जमायला लागलेले दिसतायेत. पिंड खावुन सगळे काव काव करत भुक भुक ओरडत असतात. खोटारडे !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पाषाणभेद's picture

3 Sep 2009 - 4:59 am | पाषाणभेद

तुम्हाला असा प्रश्न का पडावा बरे? झाडे कधी खोटे बोलतात का? पक्षी कधी खोटे बोलतात का? दगड कधी खोटे बोलतात का? नद्या कधी खोटे बोलतात का? लहान बालके कधी खोटे बोलतात का? ही सगळी ईश्वराचीच लेकरे ना? तसेच आपणही आहोत ना? मग आपण एकमेकांशी का खोटे खोटे बोलावे. जगात सज्जन माणसे खोटे कधीच बोलत नाहीत.

संत महात्मे तर खोटे बोलतच नाही.
-------------------------------------------
"कोणत्याही चांगल्या कामासाठी खोटे बोलणे म्हणजेच खरे बोलण्यासारखे असते."

-संत पाषाणभेद
सदाउदास आखाडा, निर्मोही धाम

(आम्ही नित्य चांगली कामे करतो. तसेच, आमच्या कॅसेटस, लॉकेटस, पेन्स, पुस्तके, डायबेटीस, मुळव्याध आदी जुनाट रोगांवरील औषधे, दंतमंजन, साबण, त्वचा उजळ होण्याचे क्रिम्स आदी आपणास नाममात्र दरात आमच्या ठिकठीकाणाच्या आश्रमात मिळू शकतील.

आपणास ईश्वराची सेवा करण्याची ईच्छा असेल तर आपणही आपले विक्रेते होवु शकतात. आपण विक्रेते झाल्यास व आपण आणलेले ग्राहक जर आमचे विक्रेते झाले तर आपणास कमीशन मिळेल. त्याचे विक्रीचे तक्ते आपणास आमच्या सेल्स डिपार्टेमेंट मध्ये मिळेल.
हे काही MLM सारखे काम समजू नका. ही एक ईश्वराची सेवा आहे.

बोला- जय हो! जय हो!!)

-संत पाषाणभेद
सदाउदास आखाडा, निर्मोही धाम

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Sep 2009 - 1:58 pm | घाशीराम कोतवाल १.२

धन्यवाद प्रतिक्रिया देणार्याचे आणि न देणार्यांचे
आभारी आहोत !
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2009 - 3:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या धाग्यावर 'नाड'णार्‍या लोकांचे प्रतिसाद अपेक्षित आहेत का? ;-)

अदिती

विनायक प्रभू's picture

6 Sep 2009 - 5:08 pm | विनायक प्रभू

विचारतो

१ आपण खोट बोलता का?
नाही.
२ आपण खोट का बोलता ?
उत्तर १ बघावे.
३ आपण खोट जाणुन बुजुन बोलता कि मजबुरी मधे बोलता ?
उत्तर २ बघावे.
४ आपल्या खोटे बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला आहे का?
उत्तर ३ बघावे.
५ आपण जास्त खरे बोलता कि खोटे बोलता ?
उत्तर ४ बघावे.
६ आपल्या ह्या खोटे बोलण्यामुळे नेहमी आपला फायदा होतो कि तोटा?
उत्तर ५ बघावे.
७ एक खोट लपविण्यासाठी १०० वेळा खोट बोलावे लागते ह्या म्हणीचा प्रत्यय आपणास आला आहे का?
उत्तरे १-६ बघावीत. (६<१००, त्यामुळे हे उत्तर सत्य मानण्यात काहीच तार्किक दोष नाही.)

Nile's picture

5 Sep 2009 - 1:59 am | Nile

विषय सोडुन पुर्ण प्रतिसाद खरा वाटतोय. प्रश्न १ चे उत्तर ओळखा आता. :)

शाहरुख's picture

5 Sep 2009 - 4:15 am | शाहरुख

प्रतिसाद आवडला !!

अवलिया's picture

5 Sep 2009 - 7:56 am | अवलिया

हा हा हा धन्याशेट लै भारी !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सखाराम_गटणे™'s picture

5 Sep 2009 - 9:13 am | सखाराम_गटणे™

जब्रा

कानडाऊ योगेशु's picture

6 Sep 2009 - 7:57 pm | कानडाऊ योगेशु

मी नेहेमीच खोटे बोलतो.! >:)