माहिती हवी आहे. NCD (Non convertible Debentures)

योगी९००'s picture
योगी९०० in काथ्याकूट
25 Aug 2009 - 12:58 pm
गाभा: 

आपणापैकी कोणाला NCD (Non Convertible Debentures) या विषयी माहिती आहे का?

हल्लीच मला कळले की L&T Finance असे NCDs बाजारात आणत आहे. आधिक माहिती साठी या कंपनीच्या वेब साईट वर जास्त माहिती मिळेल.

खालिल प्रश्न ..
१) NCD मध्ये आपला पैसा कितपत सुरक्षित आहे?
२) ही कंपनी कितपत विश्वासार्थ..?
३) coupan rate म्हणजे काय?
४) coupan rate आणि yeild on redemption असे वेगळे का असतात?
५) सर्वात शेवटी म्हणजे जेव्हा ह्या NCD ची मुदत संपते, तेव्हा आपल्याला मिळालेल्या व्याजावर आयकर भरावा लागतो का? तसेच गुंतवलेल्या रक्कमेवर आयकर सुट मिळते का?

खादाडमाऊ

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

25 Aug 2009 - 1:12 pm | शैलेन्द्र

NCD (Non Convertible Debentures)= debenchures which can not be converted to shares.

१) NCD मध्ये आपला पैसा कितपत सुरक्षित आहे?= more than shares, less than govt bonds.

२) ही कंपनी कितपत विश्वासार्थ..?= L & T is a blue chip company, perhaps most trusted non govt co in market

प्रमोद देव's picture

25 Aug 2009 - 1:15 pm | प्रमोद देव

एनसीडी मधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
कूपन रेट म्हणजे व्याज दर.
लाटू नक्कीच विश्वासार्ह कंपनी आहे.
जर हे व्याज दरसहा महिन्यांनी देय असेल तर नियमितपणे तेवढे व्याज मिळते अन्यथा जर सर्व पैसे शेवटी घ्यायचा पर्याय असेल तर मग त्या व्याजावरही व्याज(चक्रवाढ पद्धतीने) मिळते म्हणून...यील्ड जास्त.
मिळालेले व्याज जर तुम्ही आयकरात दाखवत असाल तर नक्कीच कर लागेल अन्यथा कोण विचारतंय?
गुंतवलेल्या रकमेवर आयकर सुट आहे की नाही...ते त्या एनसीडीसोबत असलेल्या माहितीपत्रकात लिहिलेले असेल.

माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे