नारळी पेढा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in पाककृती
24 Aug 2009 - 1:14 pm

साहित्य : एक वाटी ओले खोबरे ( खवलेले) ,एक वाटी गूळ ( पिवळा) , वेलदोडा , जायफळ.

कृती : एक वाटी ओले खोबरे घ्यावे. फ्रायपॅनमध्ये ते गरम करण्यास ठेवावे . त्यापेक्षा किंचीत कमी गुळ खवून घ्यावा. हा फ्राय पॅन मध्ये खवलेल्या खोबर्‍यात मिसळावा. गॅस मध्यम आचे वर ठेवून थोड्या थोड्या वेळाने मिश्रण हलवावे. थोड्यावेळाने मिश्रण घट्ट होण्यास सुरवात होईल. गुळाचा रंग नारळास लागून मिश्रण गुलाबी केसरी होईल. घट्ट झाले की त्याचे त्यात किंचीत जायफळ पावडर घालावी. व पेढ्यासारखे गोळे बनवावे. थाळीत ते वाळत घालावेत. त्यावर वेलदोडा पूड पसरावे.
जायफळा ऐवजी व्हॅनीला इसेन्स वापरला तरी चालतो.

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

24 Aug 2009 - 1:15 pm | पर्नल नेने मराठे

फोटो :-t
चुचु

अवलिया's picture

24 Aug 2009 - 1:17 pm | अवलिया

फटु ? फटु ? फटु ?

फटु नसल्याने प्र.का.टा.आ.

--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?