अल्-जझीराने केलेल्या "पाकिस्तानला सर्वात जास्त धोका कुणाकडून" या पाकिस्तानी जनमतकौलावर टिप्पणी

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in काथ्याकूट
14 Aug 2009 - 3:41 pm
गाभा: 

पाकिस्तानचा खरा शत्रू कोण?

"अल जझीरा" या अरबी भाषिक चित्रवाहिनीने "पाकिस्तानी गॅलप" या संस्थेकडून जनमताची पाहणी करविली. २६०० पेक्षा जास्त लोकांनी या जनमतकौलात भाग घेतला. प्रश्नोत्तरें मतदात्यांमध्ये आणि प्रश्न विचारणार्‍यांमध्ये समोरासमोर झाली, अनेक प्रश्न विचारण्यात आले, पण मुख्य प्रश्न होता कीं पाकिस्तानला सर्वात मोठा धोका कुणाकडून आहे? तालीबानकडून? की भारताकडून? की अमेरिकेकडून?

५९ टक्के पाकिस्तानी लोकांना सर्वात जास्त धोका अमेरिकेकडून वाटला, त्या खालोखाल (पण खूप खाली) फक्त १८ टक्के लोकांना भारताकडून वाटला तर तालीबानकडून धोका आहे असं मानणारे फक्त ११ टक्के निघाले. १२ टक्के लोकांनी "माहीत नाहीं" असे उत्तर दिले.

भारतीय अचंब्यातच पडतील कीं आपला पूर्वीचा "हमखास पहिला नंबर" कसा व कां गेला? पाकिस्तानी लोकांना भारताच्या एकंदर वागणुकीच्या सखोल अभ्यासानंतर "भारतीय लोक चांगले आहेत" असा सक्षात्कार झाला कीं काय? कसाबने इथल्या न्यायालयात दिलेल्या कबुलीजबाबानंतर त्यांच्या असं लक्षात तर नाहीं आलं कीं "आपलंच नाणं खोटं" होतं! कीं लीन, दीन, शांत, सहनशील आणि भित्रा भारत अणुशस्त्रे असूनही फक्त ’अलल-डुर्र’च्या वल्गना करेल पण युद्धात मात्र उतरणार नाहीं अशी त्यांची खात्री आहे? कीं अमेरिकेने दिलेले करोडो डॉलर हडप करून व तृप्तीची ढेकर देत-देत त्यांच्याविरुद्धच नमकहरामी करायची अशी नीती पाकिस्तानी जनता पाळत आहे? कीं अमेरिकेचे पैसे फक्त राजकीय नेत्यांच्या किंवा लष्करातल्या उच्चपदस्थ लोकांच्या ’खोल’ खिशात जातात व जनतेला फक्त करवंटी मिळते म्हणून या दोन गटांची मते इतकी भिन्न आहेत?

दुसरे कारण असेही असू शकते कीं अमेरिका या लढाईत त्यांच्यावरच्या धोक्याविरुद्ध मोर्चाबांधणी म्हणून उतरली आहे आणि पैसे टाकून पाकिस्तानी सैन्य व तालीबानी लढवय्ये यांना परस्पर लढवत आहे व आपले रक्त सांडण्याचे टाळते आहे. याचा तर राग नाहीं? शिपुरड्यांचे रक्त सांडते, उच्च लष्करी अधिकारी त्यांच्या मेजावरून हुकूम देतात व पैसे खातात यामुळे तर ही नाराजी नाहीं? याचा खरा अर्थ कळणे पाकिस्तानच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

पण अमेरिकेवरचा राग खरा असेल तर ती एक दयनीय गोष्ट ठरेल. कारण पाकिस्तानला आपल्या बाजूला ठेवण्यासाठी अमेरिका करोडो डॉलर्स इथे एका बाजूने ओतते आहे, तर दुसर्‍या बाजूला या बेहिशोबी पैशाला पाय किती व कुठे-कुठे फुटतात याची माहिती कुणालाच नाहीं. मुंबईवरील हल्ल्यातील एकुलता एक जिवंत आरोपी कसाब याने सांगितल्याप्रमाणे हा पैसा अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठीही वापरला जातोय्. त्यांच्या हातात बंदुका तर दिल्या जातात, पण त्यानंतर ते त्या कुणावर रोखतील याचा नेम नाहीं. हे तर भाडोत्री सैनिक! जी बंदूक निष्पाप मुंबईकरांवर रोखली तीच बंदूक ते बेनज़ीरवरही रोखतात. जो जास्त पैसा देईल त्याचा हुकूम चालतो. मग अमेरिकेच्या पैशाने अतिरेक्यांविरुद्ध लढाई राहिली बाजूला, उलट आजवर त्यांचे पोषणच होत आले आहे. आता तर ज़रदारीच स्वत: कबूल करत आहेत कीं आय्.एस्.आय्.च्या सहाय्याने पाकिस्तानने एके काळी हा "भस्मासुर" निर्मिला तो आता त्यांनाच भस्मसात् करायला निघाला आहे.

(पहा "डॉन" या कराचीहून प्रसिद्ध होणार्‍या दैनिकातील ही लिंक: http://tinyurl.com/kr2e5p किंवा http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/pakis...)

जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना या त्यांच्या धोरणात मूलभूत आणि व्युहात्मक बदल करायचे असतील तर त्यांनी सर्वात आधी हे फुकटचे पैसेवाटप थांबविले पाहिजे. पाकिस्तानला स्वत:च्या गरजा स्वत: कमावलेल्या पैशाने मिटवायला भाग पाडले पाहिजे व शिकविले पाहिजे. कर्ज द्या, पण ते पाकिस्तानने फेडलेच पाहिजे ही अट असू द्या. पाकिस्तानमध्ये लोकशाही असो, लष्करशाही असो किंवा तालीबानी सत्ता असो, ती पाकिस्तानी लोकांची आवड आहे. त्यात आपण (भारतीयांनी किंवा अमेरिकेने) नाक खुपसू नये. आपल्याला पसंत पडो वा न पडो, तो पाकिस्तानी जनतेचा हक्क आहे व त्यांना आपले घर सांभाळू दे.

जोवर पाकिस्तानची फुकट "खाटल्या"वर बसून खायची संवय जात नाहीं तोवर ते राष्ट्र सुधारणार नाहीं.

कीं पाकिस्तानी जनतेला सर्वात जास्त धोका तिच्या जनतेकडूनच आहे?

बिचारी पाकिस्तानी जनता! तिला फारसे विकल्पच उपलब्ध नाहींत. म्हणून मला तर त्यांची दयाच येते!

सुधीर काळे, जकार्ता

अधिक माहिती

५९ टक्के पाकिस्तानी लोकांना सर्वात जास्त धोका अमेरिकेकडून वाटला, त्या खालोखाल (पण खूप खाली) फक्त १८ टक्के लोकांना भारताकडून सर्वात जास्त धोका आहे असं वाटलं तर तालीबानकडून धोका आहे असं मानणारे फक्त ११टक्के निघाले. १२ टक्के लोकांनी "माहीत नाहीं" असे उत्तर दिले.

इतर प्रश्नोत्तरांत कांहीं रोचक प्रश्न असे:

(1) सगळ्यात जास्त लायक नेता कोण? (जरदारी फक्त ११ टक्के, नवाज़ शरीफ ३८ टक्के घेऊन पहिला.)

(2) पीपीपी पक्षाबद्दल काय मत? (२० टक्के पाठिंबा, ३८ टक्के विरुद्ध, ३० टक्के निर्विकार)

(3) जरदारी योग्य नेता आहेत? (नकार! फक्त ११ टक्के पाठिंबा, ४२ टक्के विरुद्ध, ३४ टक्के निर्विकार)

(4) तालीबानबरोबर चर्चा करावी कीं युद्ध? (साधारणपणे दोन्ही बाजूंनी ४०-४२ टक्के मते पडली)

(5) "द्रोणाचार्यां"च्या मार्‍याला विरोध कीं पाठिंबा? (Pilotless, remote-controlled drone attacks) (फक्त ९ टक्के लोकांचा पाठिंबा, ६७ टक्के लोकांचा विरोध)

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

14 Aug 2009 - 3:48 pm | मदनबाण

हम्म, आता हिंदुस्थानातील लोकांना काय वाटत ते पण वाचा :--
http://ibnlive.in.com/conversations/thread/101919.html
http://ibnlive.in.com/news/india-has-no-intention-to-compete-with-china-...

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

आपल्या दर्यासारंगाच्या मताशी मी सहमत आहे. अमेरिकेने व चीनने "कडेवर" घेतल्यामुळेच पाकिस्तान इतकी वळवळ करते. नाहीं तर "वो किस झाडकी पत्ती"? एक गोष्ट त्यांना धड करता येत नाहीं.

पण चीनने लष्करी क्षेत्रातच नव्हे (त्यांची लष्करी शक्ती पहिल्यापासूनच प्रचंड होती) पण आर्थिक क्षेत्रातही नेत्रदीपक प्रगती केलेली आहे व ते आपल्याला""शह"च काय, आपल्यावर "मात"ही करू शकतात. चीन हे आपल्यावरील खरे-खरे "गंडांतर"च आहे.

जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री असताना त्यांनी जाहीरपणे याचा उच्चार केला होता. त्याविरुद्ध केवढे काहूर माजविले गेले! पण ते बरोबरच बोलले होते. आता आपल्या दर्यासारंगांवर शिस्तभंगाची कारवाई नाहीं झाली म्हणजे मिळवले!

आपली अणू चांचणीही चीनसाठीच होती. म्हणून तर आपण अमेरिकेबरोबर अणूकरार करण्याचा मनसुबा जाहीर केल्याबरोबर घरभेदे "लाल" कम्युनिस्ट त्या कराराविरुद्ध चीनने सांगितल्यावरून बोलू लागले व म्हणूनच या निवडणुकीत पार हरले.

जय हिंद!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

हरकाम्या's picture

15 Aug 2009 - 10:07 pm | हरकाम्या

मला राजकारणातले फारसे कळत नाही. पण आपल्याला " चीन " पासुन धोका नाही आपल्याला खरा धोका आहे तो आपल्या टुकार, भित्र्या राजकारण्यांचा.
आपण निवडुन दिलेली ही हुशार मंडळी निर्णय घेण्याच्या बाबतीत अतिशय कच्ची आहेत. यांना जगाची भीति वाटते. लोक काय म्हणतिल याची काळजी वाटते. आपल्याला लोकांनी कशासाठि निवडुन दिलेले आहे .याची या मंडळींना कधीच कल्पना येत नाही् ही मंडळी आपसात भांडण्यात व दुसर्याचे दोष दाखवण्यात धन्यता मानतात. याचा प्रत्यय २६/११ च्या मुंबईच्या हल्ल्यानंतर आला. म्हणुन तर त्यानंतर निघालेल्या " मेणबत्ती प्रज्वलन "कार्यक्रमात एकाही राजकारण्याला त्यात सामील होण्याचे " धैर्य " झाले नाही.
त्यामूळे आपल्याला धोका हा चीनपासुन मुळीच नाही.

जसे पाकिस्तानला सर्वात जास्त धोका त्यांच्याच लोकांपासून आहे असे मी म्हटले आहे तेच आपण स्वतःबद्दल व आपल्या राजकीय नेत्यांबद्दल म्हणू शकतो.
आपल्याच लोकानंतर सगळ्यात जास्त धोका चीनकडून आहे इतकाच त्याचा अर्थ.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

चीन विषयी अजुनही जगात कोणत्याच देशाला पुरेपुर माहिती नाही आहे.चीन ची जी आर्थिक प्रगती झाली आहे ती त्याच्या ठराविक प्रांतापर्यत मर्यादित आहे. मला वाटते जगात सर्वात जास्त स्थलांतरे नोकरी व धंद्या साठी चीन मध्येच होत असावीत. त्यामुळे तेथे खुपच असंतोष पसरला आहे. मागिल महिन्यात झालेली जातीय दंगल ही जातीय नसुन मुस्लिम बहुल प्रांतात मुळ चीनी लोकांचे वाढते स्थलांतर हे होते.मुस्लिम चीनी लोकाचा हक्काचा रोजगार इतर चीनी पळवत असलेमुळे तो संघर्ष खुप पेटला आहे.अजुनही चीन एकसंध आहे त्याचे कारण म्हणजे त्याचे जगातील सर्वात मोठे सैन्यदल, त्याच्या बळावर अजुनही ते प्रत्येक बंड मोडुन काढत आले आहेत. पण नजिक च्या काळात ते देखिल त्याना कठिण होणार आहे.जगात आपले वेगळे अस्तित्व जोपासायचेव महासत्ता बनायचे का देश एकसंध ठेवायचा हा प्रश्न त्याच्या समोर एक ना एक दिवस नक्की उभा राहणार.आता त्याची सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या मंदीचा तडाखा जितका अमेरिकेला बसला आहे तेवढाच जबरदस्त तडाखा चीन ला देखिल बसला आहे. परंतु त्याच्या पोलादी भिंती मुळे तो बाहेर जाणवत नाही. परंतु चीन मध्ये बेकारी खुपच वाढली आहे. नजिकच्या काळात चीनचे विभाजन झाले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही.म्हणुन ह्या काळात भारताने सावध असायला हरकत नाही. कारण बुडणार्‍याची गळाभेट जीवघेणी असु शकते.

वेताळ

अनिल हटेला's picture

17 Aug 2009 - 9:23 pm | अनिल हटेला

वेताळराव सुरेख संकलन ...


"पाकिस्तानला सर्वात जास्त धोका कुणाकडून" या पाकिस्तानी जनमतकौलावर टिप्पणी

--->डूबत्या जहाजाला सर्वात धोका कोणाकडून,असं विचारायला हवं...

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

शैलेन्द्र's picture

14 Aug 2009 - 3:51 pm | शैलेन्द्र

वा.. छान माहिती... व विश्लेशन

विजुभाऊ's picture

15 Aug 2009 - 6:21 am | विजुभाऊ

५९ टक्के पाकिस्तानी लोकांना सर्वात जास्त धोका अमेरिकेकडून वाटला, त्या खालोखाल (पण खूप खाली) फक्त १८ टक्के लोकांना भारताकडून सर्वात जास्त धोका आहे असं वाटलं तर तालीबानकडून धोका आहे असं मानणारे फक्त ११टक्के निघाले. १२ टक्के लोकांनी "माहीत नाहीं" असे उत्तर दिले.
या टक्केवारीला नक्की आधार काय?
या टक्केवारीला तसा काही अर्थ नसतो कारण ती टक्केवारी कोणत्या गटाचा सर्व्हे केला एकूण किती लोकांचा सर्व्हे केला ते कोणत्या विचारसरणीचे लोक होते याच काहिही संदर्भ देत नाही.
उदा: "रा स्व सै" च्या मेळाव्यात एखादा सर्व्हे घेतला तर तो संपुर्ण समाजाचे प्रातिनिधित्व करे असे नाही.
असा काही सर्व्हे घेतला जातोय हे कित्येकाना माहितही नसल्याचे आढळून येइल

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

श्री. विजुभाऊ,
ही अल्-जझीराने गॅलपच्या मदतीने घेतलेली जनमतचांचणी आहे. गॅलप ही संघटना साधारणपणे कुणाकडूनही "अनुदान" न घेणारी व म्हणूनच कुणाचीही मिंधी नसलेली संस्था समजली जाते व तिचा फायदा (profit) व खर्च साधारणपणे तिचे अहवाल विकून मिळालेल्या पैशावर चालतात.
मी लिहिल्याप्रमाणे ही चांचणी पाकिस्तानच्या चारी प्रांतातील वेगवेगळ्या आर्थिक थरातील व वेगवेगळ्या धर्माच्या स्त्री-पुरुषांच्या मतांच्या चाचपणीवरून घेतली गेली होती.
पण अशा चाचपण्या किती 'बरोब्बर' असतात ते त्याचे "सँप्लिंगचे मॉडेल" किती चांगले असते त्यावर अवलंबून असते.
कांहीं महिन्यापूर्वी अमेरिकेच्या त्यावेळच्या तिथल्या राजदूता श्रीमती पॅटर्सन यांचा जळफळाट झाला होता कीं अमेरिकझापाकिस्तानला इतके सहाय्य करते तरीही पाकिस्तानी जनता कशी अमेरिकेच्या "प्रेमात" नाही व त्याचे खापर तिने मीडियावर फोडले होते. त्यावर मी डॉनमध्ये एक पत्र लिहिले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉनने ते छापले. त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॅनडा-स्थित एका पाकिस्तानी नागरिकाने त्याला दुजोराही दिला.
माझे पत्र वाचायचे असेल तर http://www.dawn.com/2008/05/18/letted.htm ही लिंक उघडा. (माझे पत्र शेवटून दुसरे आहे.)
कॅनडा-स्थित पाकिस्तानी नागरिकाचे पत्र वाचायला ही लिंक उघडा: http://www.dawn.com/2008/05/24/letted.htm
हे पत्र जे. एस. हुसेन यांनी २४ मे २००८ साली पाठविले होते.
माझ्या या पत्रांवरून माझ्या या विषयावरच्या व्यासंगाची थोडीशी कल्पना आपल्याला येईल. पण मी कांहीं व्यावसायिक पत्रकार नाहीं. व्यवसायाने मी आहे एक पोलाद बनविणारा धातुशास्त्रज्ञ (metallurgist). पण वाचायची व लिहायची खूप आवड व (स्वतःपुरती) देशभक्ती यातून असे कांहींतरी "बरे" कधी-कधी चुकून घडते इतकेच.
माझ्यात खूप तृटी आहेत पण हळू-हळू आपणा सर्वांच्या मदतीने मी जास्त-जास्त बरे लिहू लागेन अशी मला खात्री आहे.
कृपया लिहीत रहा.''मि-पा'वरील वाचकांचे वाचन खूपच प्रगल्भ आहे व त्याचा मी फायदा घेणार आहे.
धन्यवाद,
सुधीर काळे, जकार्ता
kbkale42@gmail.com

------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अ‍ॅन पॅटर्सन यांच्या भाषणाचा एक भागः
U.S. ambassador Anne W. Patterson, in a speech reported by the Pakistan press, said last week that the depth of anti-Americanism in Pakistan, especially among the middle-class, had surprised her. Pakistan's long-term interests were aligned with those of the United States, and those opposing U.S. engagement in the country had a limited understanding of how the partnership based on economic assistance had changed the lives of Pakistanis, she told a meeting in Karachi. For added measure, she said that the “ïncreasingly prosperous middle class” would be the first to suffer if hardliners gained ground.

------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सुधीर काळे's picture

15 Aug 2009 - 10:30 am | सुधीर काळे

पाकिस्तानी लोकांत असलेल्या अमेरिकेबद्दलच्या तिरस्काराची खोली पहा!
Video of Pakistani Student Insulting American Ambassador Anne Patterson
http://www.pakspectator.com/video-of-pakistani-student-insulting-america...
By Ali Yar Khan • Jun 19th, 2008 • Category: Entertainment • 49 Comments • Email This Post
In a rare show of political maturity, Samad Khurram, a student of a private school in Islamabad refused to accept his an award of academic excellence from the American Ambassador Anne W. Patterson. The academic excellence award was being given to him for his admission to Harvard, a world distinction in thinking skills, a regional distinction in chemistry and 7 A grades in A level. The student said that he did so because of the United States attacks on the tribal regions of Pakistan in which innocent children and the people are dying, and the US continuous support for the dictator Pervez Musharraf.
The face of Anne W. Patterson turned red and for 5 long seconds she stood there motionless with shame and anger. When the student was called to receive the certificate on the stage from the US ambassador, he just passed her and went to dice (dias) and cited the reason. As he passed the American ambassador, the principal also became flabbergasted, she tried to take hold of the student by the sleeve, but he moved on, while the American diplomat watched in horror and embarrassment.
Then American ambassador in his (her) speech tried to brush the incident away by adopting a pedantic tone and tried to make the matter light. The principle never recovered from the shock, as she knew what’s waiting for her in the store after the function. Not only the chance of hefty donation from the Americans went down the drain, but also it will surely cost her the job.
That is the collateral damage of the war on terror.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

ते पकिस्तान सोडुन सर्व जगाचा तिरस्कार करतात. कारण त्याचा जन्मच तिरस्कारातुन झाला आहे. अन पाकिस्तानला सर्वात जास्त धोका पाकिस्तानातुनच आहे.

वेताळ

तुमचे म्हणणे मला १०० टक्के पटते. ते नावालाच शूर आहेत. खरोखरच इतके खमके असते तर इतकी वर्षें स्वतःला लष्करी टाचेखाली असे चिरडून नसते घेतले त्यांनी!
दीड वर्षें इंदिराबाईंनी आणीबाणी जाहीर केली तर किती त्याविरुद्ध चळवळी झाल्या! पाकिस्तानात कां जयप्रकाश नारायण जन्मत नाहींत?
परवा ए. आर. रहमान यांना ऑस्कर मिळाले त्यावेळी एका पाकिस्तानी वृत्तपत्रात एका वाचकाने लिहिले होते कीं नशीब आपले कीं कांहीं मुसलमानांनी तरी हिदुस्तानातच रहायचे ठरविले. तिथल्या स्पर्धेच्या जगात ते खटपट करून ते असे यशस्वी झाले. जर ते पाकिस्तानला आले असते तर कुठल्या तरी जमीनदाराच्या "कोठी"वरच्या जलशात गाण्याइतकीच त्यांची लायकी राहिली असती!
किती बोलके आहेत हे शब्द!
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विकास's picture

16 Aug 2009 - 3:19 am | विकास

परवा ए. आर. रहमान यांना ऑस्कर मिळाले त्यावेळी एका पाकिस्तानी वृत्तपत्रात एका वाचकाने लिहिले होते कीं नशीब आपले कीं कांहीं मुसलमानांनी तरी हिदुस्तानातच रहायचे ठरविले. तिथल्या स्पर्धेच्या जगात ते खटपट करून ते असे यशस्वी झाले. जर ते पाकिस्तानला आले असते तर कुठल्या तरी जमीनदाराच्या "कोठी"वरच्या जलशात गाण्याइतकीच त्यांची लायकी राहिली असती!
किती बोलके आहेत हे शब्द!

हा भाग जरी एकंदरीत पटण्यासारखा असला तरी, एकच सुधारणा/दुरूस्ती सुचवाविशी वाटते: ए आर रेहमान हा जन्माने हिंदू होता आणि त्याच्या आईबरोबर त्याने मुस्लीम धर्म स्विकारला. त्यामुळे नुसते काही मुसलमानांनी धर्माधारीत फाळणीस मान देत धर्माधारीत देशात जायचे नाकारले हे जसे त्यांचे नशिब तसेच स्वेच्छेन धर्मांतर करण्यास सर्वधर्म भारतात मान्यता आहे हा भारताचा (काही अंशी) मोठे पणा आहे. मात्र कायदे अधिक स्पष्ट व कडक पाहीजेत असे पुर्वांचल भागात जे चालू आहे ते पहाता वाटते. अर्थात तो विषय वेगळा आहे... बाकी चालूंदेत.

सुधीर काळे's picture

16 Aug 2009 - 7:57 am | सुधीर काळे

विकास-जी,
ज्या माणसाने हे पत्र लिहिले होते त्याला रहमानचा हा इतिहास कदाचित माहीत नसावा. मलाही त्याने नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला एवढेच माहीत होते, आईबरोबर स्वीकारला हे माहीत नव्हते.
पण या पाकिस्तानी पत्रावरून पाकिस्तानी लोकांच्या मनात आपल्याबद्दची भावना कशी आहे याचे मनोहारी दर्शन घडले. ते संपूर्ण पत्र माझ्या हार्ड डिस्कवर कुठेतरी आहे. सापडेल बहुतेक. सापडले तर आपल्याला जरूर पाठवेन.
दुसरे म्हणजे पाकिस्तानी लोक आणि पाकिस्तानी सरकार या दोन वेगळ्या entities आहेत.
पाकिस्तानी लोकांना आपले कौतुक वाटते व त्यानी स्वतः आपल्या राष्ट्राची जी वाट लावली आहे त्याबद्दलचे दु:खही ओझरते बोलता-बोलता तोंडातून निघून जाते. ते वर-वर आपल्याशी गोड बोलतात पण काश्मीरबद्दल त्यांच्या भावना आपल्या विरुद्धच आहेत व त्या असणारच.
असेही लोक आहेत कीं जे मला त्यांच्या घरी कराचीला यायचे निमंत्रण देतात, पण पोटात काय आहे ते मात्र कळत नाहीं.
पण एकंदरीत शत्रुत्वाची भावनाच बळकट आहे. जकार्तातही कांहीं पाकिस्तानी बर्‍यापैकी ओळखीचे आहेत, पण "दुरून डोंगर साजरे"!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

एकलव्य's picture

16 Aug 2009 - 6:36 am | एकलव्य
  • माझ्या माहितीनुसार (खरेतर आठवणीनुसार असे म्हणणे अधिक योग्य) -
  • भारतीय अचंब्यातच पडतील कीं आपला पूर्वीचा "हमखास पहिला नंबर" कसा व कां गेला?

    पाकिस्तानला सर्वात धोका कोणापासून यांत अमेरिकेचा क्रमांक गेले दशकभर तरी खूप वरचा आहे. भारताविषयी पाकिस्तानी लोकांमध्ये टोकाचा द्वेष नाही अशीच माहिती जी अनेक मंडळी पाकिस्तानच्या लोकांशी व्यवहार करतात त्यांच्याकडून समजते. तसेच गेल्या दशकातील क्रिकेट-डिप्लोमसी, बसयात्रा, तसेच पाकिस्तानी अराजक यांचाही परिणाम असावा पण कसाबच्या कबुलीजबाबाचा हा इफेक्ट असावा असे वाटत नाही.

    • माझ्या मते

    चीनचा धोका सर्वात मोठा हा एक बागुलबुवा आहे. अणुचाचणी ही मुख्यतः चायनीज धोक्यासाठी हे फर्नांडिसांचे तेव्हाचे विधान हे बेजबाबदार आहे. (का आणि कसे हा सविस्तर विषय नंतर कधीतरी)

    - एकलव्य

सुधीर काळे's picture

16 Aug 2009 - 8:12 am | सुधीर काळे

एकलव्य-जी,
मला माहीत आहे कीं गेल्यावर्षीही अमेरिकेचा नंबर पहिला होता, पण ५९ वि. १८ असा प्रचंड फरक नव्हता. त्या आधीचा मतप्रवाह माझ्या वाचनात तरी नाहीं.
चीनबद्दलच्या आपल्या मताची नोंद घेतली आहे. इतिहासातील निर्णय बरोबर होते कीं चूक हे ५० वर्षांनंतर कळते. तेंव्हा आपण जरा वाट पहायला हवी.
पण ज्यांनी ६२ साली युद्ध केले ते शत्रू नाहींत कसे? अजूनही आपली बळकावलेली जमीन त्यांनी सोडलेली नाहीं. शिवाय ईशान्य भारतातील अनेक राज्यांवर ते हक्क सांगत आहेत. त्यामुळे मैत्री अशक्य आहे, मग शत्रुत्व ओघानेच आले. आपल्याला आपली ताकत माहीत असल्यामुळे व स्वाभिमानाची कमतरता असल्यामुळे आपण सीमेबद्दलचा तंटा बाजूला ठेऊन त्यांच्याशी दोस्ती करायला निघालो आहोत. हा भित्रेपणा की दृष्टेपणा कीं मुत्सद्दीपणा हे काळच ठरवील. पण लालभाईंच्या मदतीने चीन आपल्या देशाला कुरतडतोच आहे, मग लढायचे कशाला असा व्यावहारिक विचार नक्कीच त्यांचा मुत्सद्दीपणा दाखवतो.
फर्नांडिससाहेबांबद्दल आपण एक लेख लिहावा ही विनंती.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

ऋषिकेश's picture

17 Aug 2009 - 10:16 am | ऋषिकेश

त्यामुळे मैत्री अशक्य आहे, मग शत्रुत्व ओघानेच आले.

खरंतर ह्या चह्र्चेत पडणार नव्हतो.. मात्र ह्या वाक्याला विरोध दर्शवण्यासाठी हा प्रतिसाद.
मैत्री अशक्य असल्याने लगेच "शत्रुत्त्व" पत्करलेच पाहिजे हे चुकीचे आहे. माझी कित्येकांशी मैत्री नाहि म्हणून मी त्यांचा शत्रु आहे असे नाहि. त्याच प्रमाणे भारताचा चीन हा "शत्रु" किंवा "मित्र" नसून तो एक शेजारी आहे. त्यातील काहि घटकांना भारत शत्रु वाटतो तर काहिंना भारत हा व्यवसायातील संधी वाटतो तर काहिंना भारताशी काहिच घेणेदेणे नाहि. भारतालाही त्यावेळाच्या

परिस्थितीनूसार फक्त आपला फायदा कसा होईल हे बघितले पाहिजे. एकदा का चीनला (पक्षी कुठल्याही देशाला) शत्रु / मित्र घोषित केले की वेळ मित्र/शत्रुधर्म जोपासण्यात जातो. त्यातून फायदा काहिहि होत नाहि.

बाकी मला मुळ विषयात तितका इंटरेस्ट नाहि तेव्हा चालु दे

(चीन चा शेजारी) ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून १४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया राष्ट्रगीत "जन गण मन...."

सुधीर काळे's picture

17 Aug 2009 - 9:59 am | सुधीर काळे

हा लांबलचक लेख सकाळच्या वेब एडिशनवर वाचला. चीनच्या विघटनाबद्दलची चर्चा आपण करत असताना सरहद्दीपलीकडे काय चालले आहे याची रोचक व भयप्रद महिती येथे मिळते. लेख श्री सुरेशचंद्र पाध्ये यांनी लिहिलेला आहे.
-------------------------------------------
चीनला द्यायला हवे चोख प्रत्युत्तर
सुरेशचंद्र पाध्ये
Monday, August 17th, 2009 AT 12:08 AM
Tags: india-chaina, political, international
Close...

महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारत यांचा समावेश अग्रक्रमाने होतो. हे दोन्ही देश लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे आहेत. त्यांची विकसनशीलताही नजरेत भरणारी आहे. त्यामुळे ते एकत्र आल्यास बाकीच्या साऱ्या महासत्ता काळवंडून जातील, असे भाकीत काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ करीत आहेत; मात्र "हिंदी चिनी भाई भाई' म्हणत भारतावर वार करण्याची नीती चीनने अवलंबिली आहे. चीनने हे धोरण आजही सोडलेले नाही, हे त्याच्या ताज्या हालचालींवरून दिसून येते.
चीनने भारताचे २० ते ३० स्वतंत्र तुकडे करावेत आणि त्यासाठी पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान आदी देशांची मदत घ्यावी, असे मत चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या विचारवंतांनी मांडले आहे. या आशयाचा झआन लुई यांचा लेख "चायना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. या संकेतस्थळावरून चीनच्या सत्ताधाऱ्यांना जागतिक विषयांबाबत व्यूहात्मक सल्ला देण्यात येतो. "भारताचे तुकडे होणे चीनला फायदेशीर आहे आणि तसे झाल्यास दक्षिण आशियातील सामाजिक सुधारणा लवकर साध्य होऊ शकतील; तसेच जातिव्यवस्था पूर्णपणे नष्ट करता येऊ शकेल आणि संपूर्ण प्रदेश समृद्ध होईल,' असे लेखकाचे म्हणणे आहे. चीनची एकूण मानसिकता काय आहे, यावर यातून प्रकाश पडतो; मात्र चीन सरकार सध्या औपचारिकरीत्या भारताशी संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेत रस घेत असल्याचे दाखवत आहे. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे याचा विचार भारतीय तज्ज्ञांनी आताच करणे क्रमप्राप्त आहे.
अरुणाचल प्रदेश हा भारतातच अविभाज्य भाग असल्याचे ठाम वक्तव्य पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी गतवर्षी इटानगरमध्ये जाऊन केले होते. चीनने अरुणाचलावर केलेला दावा आणि सिक्कीमबाबतही निर्माण केलेला वाद या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे मत मांडले होते; मात्र चीनने आपला हेका सोडलेला नाही. ""चीन हे संयमी राष्ट्र आहे. स्वतःच्या सक्षमीकरणाकडे अधिक लक्ष देत असून, शत्रूला गाफील ठेवण्याची त्याची पद्धत आहे,'' असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही तेव्हा व्यक्त केले होते. ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस यांनीही, ""चीन हाच भारताचा क्रमांक एकचा शत्रू आहे,'' असे विधान केलेले होते.
चीनचा भारतद्वेष
हे दोन्ही नेते संरक्षणमंत्री या नात्याने चीनच्या कारवाया जाणणारे नेते आहेत. त्यांचे हे म्हणणे किती खरे आहे, याचा प्रत्यय भारताच्या पंतप्रधानांच्या प्रत्येक चीन भेटीच्या वेळी आला आहे. चीन दौऱ्यावर असताना डॉ. मनमोहनसिंग यांनी चीनची अनेक बाबतींत तारीफ केली होती; मात्र या दौऱ्याच्या वेळीच चीनने तिबेटमधील लोहमार्ग काठमांडूपर्यंत नेण्याची घोषणा जाणीवपूर्वक केली. त्यामुळेच तेथून परतताना चीन भारताला मदत करण्यास फारसा उत्सुक नसल्याचे मतप्रदर्शन डॉ. मनमोहनसिंग यांनी केले होते. अटलबिहारी वाजपेयी चीनच्या दौऱ्यावर होते, त्याही वेळी व्हिएतनामबरोबरचा लष्करी संघर्ष जाणीवपूर्वक सुरू करून चीनने वाजपेयींना दौरा अर्धवट सोडून भारतात परतायला भाग पाडले होते. ज्या पंडित नेहरूंनी भारत आणि चीन यांच्या दरम्यान पंचशील तत्त्वांच्या संघटनेला हातभार लावला, त्यांना झुलवत ठेवून १९६२ मध्ये चीनने भारतावर हल्ला करून काही भूभाग आपल्या ताब्यात घेतला आणि अद्यापही त्याचा ताबा सोडलेला नाही. अपवाद फक्त कोलंबो करारानुसार त्या युद्ध समाप्तीनंतर अरुणाचल प्रदेशातून आणि अन्य काही भागांतून त्यांनी घेतलेल्या मर्यादित माघारीचा.
मॅकमोहन रेषा आपणाला मान्य नसल्याचे सांगत नव्याने सीमा निश्‍चिती करण्याची भूमिका चीनने मांडली होती. तत्कालीन परिस्थितीत ब्रिटिशांनी ठरवलेली मॅकमोहन रेषा आपण भावंडांनी का मान्य करायची, असा चीनचा सवाल होता. अर्थात, ही भावकीची भाषा फायदा करून घेण्याचीच होती आणि आहे. संधी साधून त्यांनी तिबेट गिळंकृत केला आणि तो आपलाच प्रदेश असल्याचा दावा ते आजही करीत आहेत. तिबेटमधून निर्वासित होऊन दलाई लामा भारतात आले. त्यांना भारताने आश्रय दिला म्हणूनही चीनने वेळोवेळी रोष व्यक्त केला आहे. तत्कालीन परिस्थितीत तिबेटवरच्या चीनच्या दाव्याला मान्यता देण्याची जी कृती भारताने केली ती आता मागे घेण्याची वेळ आली आहे की काय, असे ताज्या लेखाने आपल्याला जणू विचारले आहे.
या सीमाप्रश्‍नाचा इतिहास थोडा मागे जाऊन पाहिला पाहिजे. सर हेन्‍री मॅकमोहन हे १९१४ मध्ये भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून काम पाहत होते. त्या वेळी भारत, चीन आणि तिबेट यांच्यात सिमला येथे सीमा प्रश्‍नाबाबत चर्चा झाली होती; मात्र निर्णय झाला नव्हता. त्यानंतर बरीच भवती न भवती होऊन १९३५ मध्ये ब्रिटिशांनी मॅकमोहन रेषा ही अधिकृत सीमा असल्याचे नकाशे प्रकाशित केले. १९५० पासून सीमेवर लष्करी गस्त घालण्यास भारताने सुरवात केल्यानंतर अल्पावधीतच चीनने आक्रमण करून तिबेटवर ताबा मिळवला. भारताने १९५४ मध्ये चीनचे तिबेटवरील नियंत्रण औपचारिकरीत्या मान्य केले; मात्र त्याच दरम्यान चीनने प्रकाशित केलेल्या नकाशात अरुणाचल प्रदेश व लडाख हा चीनचा भाग असल्याचे दाखविण्यात आले आणि भारताच्या लष्कराच्या मॅकमोहन रेषेवरील उपस्थितीलाही आक्षेप घेतला. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्या दरम्यान लष्करी पातळीवर काहीसा विसंवाद सुरू होऊन १९५७ मध्ये प्रथम अक्‍साई चीन भागात चीनने घुसखोरी केली. दरम्यान चीन आणि भारत यांच्यामधील व्यापारवृद्धी आणि राजकीय नाते विस्तारित करण्याच्या हेतूने पंडित नेहरू यांनी चीनकडे मैत्रीचा हात पुढे केला. तो हातात घेऊन चीननेही "हिंदी-चिनी भाई भाई'चा नारा दिला. पंडित नेहरूंना भेटण्यासाठी चीनचे तत्कालीन राष्ट्रप्रमुख भारतात आले, त्या वेळी पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे पंडित नेहरू श्रीलंकेच्या तत्कालीन प्रमुख सिरिमावो बंदरनायके यांच्या भेटीसाठी श्रीलंकेत गेले होते. याचा राग येऊन १९६२ च्या युद्धाची जणू निश्‍चिती मनोमन करूनच चिनी नेते परत बीजिंगला रवाना झाले आणि परिणामी १९६२ चे युद्ध प्रत्यक्षात आले असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वस्तुतः घटनाक्रम पाहता १९६२ पूर्वी ८ वर्षे त्याची तयारी चालू होती, असे दिसते.
चीनचा इतिहास
मंगोल, तिबेटी, तुर्की आक्रमणे बंद करण्यासाठी प्राचीन काळात चीनची सुप्रसिद्ध भिंत बांधण्यात आली. त्यानंतर स्वतःची सत्ता टिकवून बळकट करण्यासाठी चिनी सत्ताधारी लगतच्या प्रदेशांवर आक्रमण करू लागले. अर्थात, अशा रीतीने संबंधित प्रदेशावर मिळवलेली सत्ता ते काही काळ टिकवू शकत असत; पण अल्पावधीतच ती सत्ता सोडणे त्यांना भाग पडे. १७२० ते १९४९ अखेरपर्यंत तिबेट स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच अस्तित्वात होते. रशिया आणि ब्रिटन यांनी स्वहितासाठी तिबेटवर चीनची अधिसत्ता असल्याची भूमिका घेतली होती. चिनी कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष माओत्से तुंग यांनी १९३६ मध्येच तिबेट व सिंकियांग या बौद्ध धर्मीय आणि इस्लामिक राष्ट्रांची तथाकथित मुक्तता करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. ७ ऑक्‍टोबर १९५० रोजी चीनने तिबेटवर आक्रमण सुरू केले. त्या वेळी नेहरूंनी जागतिक परिस्थिती धोक्‍याची बनल्याचे म्हटले होते. तेव्हा भारत हा साम्राज्यशाहीचा हस्तक असल्याचा आणि चीनच्या मार्गात अडथळे आणत असल्याचा आरोप चीनने केला होता. २४ नोव्हेंबर १९५० रोजी संयुक्त राष्ट्रांमध्ये एल साल्वादोरने तिबेटच्या खनिज संपत्तीच्या अपहाराकरिता चीनने आक्रमण केल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले.
तेव्हा भारत आणि ब्रिटनने तिबेटचा प्रश्‍न चीन व तिबेटने शांततेने मिटवावा असे सुचविले; परंतु नोव्हेंबर १९५१ मध्ये चिनी सैन्य ल्हासात घुसले आणि तिबेट चीनने गिळंकृत केला. चीन व सिंकियांग यांना जोडणारा तिबेट हा महत्त्वाचा दुवा. तिबेटमधून सिंकियांगमध्ये घुसण्यासाठी भारताच्या ताब्यातील लडाखमधील अक्‍साई चीन व ताबा मिळवणे हे चीनचे राजकीय आणि लष्करी उद्दिष्ट होते; परंतु चीनचा हा कावा भारताने लक्षात घेतला नाही. उलट १९५४ मध्ये तिबेट-भारत व्यापार व इतर संबंध याबाबतीत भारत आणि चीनचा जो करार झाला त्या कराराने तिबेट चीनचाच एक भाग आहे यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भारतातून तिबेटमध्ये शिरण्याच्या घाटखिंडीवर चीन हक्क सांगू लागला तेव्हा भारताने आक्षेप घेतला; मात्र सीमा निश्‍चित करण्याचा मुद्दा उपस्थित केला नाही. हा करार आठ वर्षांचा होता. तो संपताच चीनने ईशान्य भारतावर (तत्कालीन नेफा) आणि लडाखवर आक्रमण केले. दरम्यान त्यांनी तथाकथित सीमारेषेच्या पलीकडे युद्धाची जोरदार तयारी अतिशय सावधपणे आणि गोपनीय पद्धतीने केली होती. भारताला त्याची नीट जाणही आली नव्हती हे दुर्दैव.
१९५८ मध्येच खुर्नाक गढी चिनी लष्कराने व्यापलेली होती. तिबेट सिंकियांग रस्त्याला जोडण्याची बांधणी केलेली होती. हे समजल्यानंतर भारताने चीनचा निषेध केला होता. तेव्हा चीनने अक्‍साई चीन हा आपलाच प्रदेश असल्याचा कांगावा केला होता. थोडक्‍यात, १९६२ चा हल्ला अचानक झाला असे म्हणण्यास काहीही अर्थ नाही. दरम्यानच्या काळात आपण संबंधित घटनांकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. ज्या भागात गवताची काडीही उगवत नाही तो भाग ताब्यात घेऊन चीन काय करणार, अशा भ्रमाच्या जगात आपण वावरलो. सीमा भागामध्ये जी लष्करी सज्जता ठेवणे आवश्‍यक होते, ती आपण ठेवली नाही आणि आपल्या सैन्याला अखेरीस पराभवाचा सामना करावा लागला.
जुलै १९५० मध्ये भारताने नेपाळशी शांतता व मैत्रीचा तह केला आणि त्यानंतर त्या देशातील बंडाळ्या मोडण्यासाठी वेळोवेळी सैनिकी व इतरही मदत केली. त्याचा फायदा भारताला किती झाला हा आजही विचारण्याजोगा प्रश्‍न आहे. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष आयुब खान यांनी भारत-पाक संयुक्त संरक्षण प्रस्ताव १९५९ व ६० मध्ये ठेवला होता. जनरल करिअप्पांनी त्याचा पाठपुरावा केला होता; तथापि तो स्वीकारला न गेल्यामुळे आयुब खान चीनकडे झुकले आणि १९६३ मध्ये काश्‍मीर-सिंकियांगच्या सरहद्दीवरील प्रदेश पाकिस्तानने चीनला दिला. आज हा प्रदेश भारताला सतत त्या क्षेत्रात युद्ध सज्ज राहण्यासाठी भाग पाडतो आहे. १९६२ च्या युद्धाच्या वेळी पंडित नेहरूंनी अमेरिकेला केलेल्या विनंतीनंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी अमेरिकेच्या सातव्या आरमारापैकी काही नौदले बंगालच्या उपसागरात तैनात करण्याची कार्यवाही सुरू केली आणि ती होत असतानाच चीनने एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली.
भारत आणि चीन यांच्या दरम्यानच्या संबंधांमध्ये यापूर्वी जेव्हा काही प्रश्‍न निर्माण झाले होते तेव्हाचा इतिहास पाहिला, तर प्रारंभीच्या काळात रशियानेही चीनचीच बाजू घेतली होती, असे निदर्शनास येते. भारत-रशिया मैत्री करारानंतर ही परिस्थिती पालटली. आज सोव्हिएत युनियन अस्तित्वात नाही. रशिया आणि भारत यांचे संबंध पूर्वीसारखेच चांगले असले, तरी रशियाची ताकद आज पूर्वीइतकी राहिलेली नाही. रशिया आता पुन्हा चीनबरोबर जुळवून घेण्याच्या मनःस्थितीत आहे. याच वेळी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानचे संबंध नव्या टप्प्यावर पोचले आहेत. भारत स्वतंत्र प्रज्ञेने उभा राहू पाहत असताना अमेरिकेला चीनबरोबरचे संबंधही बळकट ठेवायचे आहेत. अशा वेळी चीनने ही कुरापत काढली आहे. एका बाजूला अशा कुरापती काढत राहायचे आणि दुसरीकडे सामंजस्याची बोलणी करत राहायची अशी ही चिनी नीती आहे. भारत आपल्या अंतर्गत प्रश्‍नांवर मात करून आंतरराष्ट्रीय पातळीवर ठामपणे उभा राहू शकतो, हे लक्षात आल्यामुळेच भारताला आतून कसा सुरुंग लावता येईल, याचे प्रयत्न केले जाणार, हे उघड आहे. चीनचा हा अशाच प्रयत्नांपैकी एक प्रयत्न आहे. हे लक्षात घेऊन चीनबरोबरचे धोरण ठरवावे लागेल. चीनबरोबर सामंजस्य, मैत्री, व्यापार आणि अगदी लष्करी कवायतींच्या पातळीवरीलही सहकार्य चालू ठेवतानाच, चीनचा तिबेटवरील अधिकार मान्य करण्यात चूक झाली होती, हे दलाई लामांना पाठिंबा देत कदाचित स्पष्ट करावे लागेल. चीनची भिंत हे जागतिक आश्‍चर्य नसून, चीनच्या खऱ्याखुऱ्या सीमेचे वास्तव आहे. बाकी सर्व प्रदेश हा त्यांच्या आक्रमक वृत्तीची साक्ष आहे, असे त्यांना बजावावेही लागेल. त्यांच्या भाषेतलेच उत्तर त्यांना समजू शकेल, हे लक्षात ठेवायला हवे.
--सुरेशचंद्र पाध्ये
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

हा लेख इथं दिल्याबद्धल सुधीरराव आपल्याला धन्यवाद...

चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo