गाभा:
हा धागा "घोषित रुग्ण/एकुण संशयित रुग्ण: रेशोची वाढ/उतार व शाळकरी मुले" ह्या धाग्यातून निर्माण केला आहे.
"....अशी शंका असेल तर शाळा अधिक काळ बंद करावी की नाही, ह्याचा विचार ईन्फॉर्म्ड डिसीजन असेल. शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला तर किती पालक मुलांना शाळेत पाठवायला तयार होतील ही शंकाच आहे. मुलांना घरी ठेवून घेतले तर त्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून काय उपाययोजना करता येईल हे पहाणे योग्य ठरावे. ही एक सामाजिक आपत्ती असल्यामुळे गंभीर परिणाम होऊ नयेत म्हणून ह्यावर्षीच्या अभ्यासक्रमात योग्य ती काटछाट केली तरी चालू शकेल का?"
पुण्या-मुंबईतील लोकांना काय वाटते?
प्रतिक्रिया
12 Aug 2009 - 9:12 am | मिसळभोक्ता
अभ्यास बुडू नये, म्हणून मुलांना अभ्यास करायला लावावा. कसे ?
-- मिसळभोक्ता
12 Aug 2009 - 9:47 am | छोटा डॉन
>>अभ्यास बुडू नये, म्हणून मुलांना अभ्यास करायला लावावा.
+१, सहमत आहे.
मुलांना घरी बसुन अभ्यास करायला लावावा असेच म्हणतो, आता घरीसुद्धा अभ्यास बुडु नये ह्यासाठी आम्ही डोक्यावर छत्री घेऊन अभ्यास करावा असे सुचवतो .. ;)
जोक्स अपार्ट,
८ दिवस शाळा बंद असण्याचा आणि अभ्यास बुडण्याचा संबंध मला देवाच्यान समजला नाही, असा काय फरक पडतो बॉ ८ दिवसात, शाळेत आजकाल एवढे "महान ज्ञानदानाचे कार्य" चालते ह्याची मला खरोखर कल्पना नव्हती.
तसेच आजची पिढी अगदी नेमाने रोज अभ्यास करते ह्याचीही कल्पना नव्हती.
शिवाय "रोजचा अभ्यास" हे एवढा बाऊ करायचे प्रकरण आहे की ज्याची तुलना डायरेक्ट जीवाच्या धोक्याशी होऊनही त्यात तडजोड केली जाऊ शकत नाही हे वाचुन आश्चर्य वाटले ...
आमच्या काळी लैत लै वर्षातले एकुण ३-४ महिने अभ्यास करायची पद्धत होती, हे रोज नियमाने अभ्यास करावा"च" लागतो अन्यथा भविष्य अंधःकारमय होते हे नवे खुळ आजच कळाले आहे.
इंजिनीयरिंगला तर रोज अभ्यास करणारी व्यक्ती "इंजिनीयर होण्यास नालायक" समजली जाते, तिथे फक्त "पी येल" लाच मरोस्तोवर अभ्यास करतात ...
शिवाय जीवाची भिती असताना "अभ्यास बुडेल" वागैरे क्षुल्लक कारणे कशी काय समर्थनीय ठरु शकतात हेच कळत नाही.
आजकाल शाळांमध्ये नासा /इस्रोचे प्रोजेक्ट चालतात की काय एवढे टाईट टाईमलाईन पाळायला ???
असो, आमचे अंमळ मनोरंजन झाले.
अभ्यासपिपासु संस्थाचालक व पालकांना शुभेच्छा ...!!!
------
( शैक्षणिक कालात दरवर्षात फक्त मोजुन३-४ महिनेच अभ्यास केलेला ) छोटा डॉन
12 Aug 2009 - 9:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ओ डान्राव, हे लोकंही डेडलायनी पाळत नाहीत. कोणता टेलिस्कोप दिलेल्या वेळेत सुरू झाला आहे हो?
काय रे पोरांनो, आठ दिवस सुट्टी मिळाली आहे, मजा करा मस्तपैकी! दिवाळीची सुट्टी तशीही कमीच होणार आहे. उगा का आत्ता सुट्टी नको म्हणून कालवा करताय?
अदिती
12 Aug 2009 - 12:07 pm | अभिज्ञ
इंजिनीयरिंगला तर रोज अभ्यास करणारी व्यक्ती "इंजिनीयर होण्यास नालायक" समजली जाते, तिथे फक्त "पी येल" लाच मरोस्तोवर अभ्यास करतात ...
डॉन्या तु इंजिनीअरिंगलादेखील अभ्यास केला होतास?????
त्रिवार धिक्कार.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
13 Aug 2009 - 3:25 pm | ब्रिटिश टिंग्या
डान्या इंजिनीयरींगलासुद्धा बोर्डात आला होता!
12 Aug 2009 - 11:01 pm | नीधप
शाळांच्या अभ्यासाचा इतका बाउ? अती होतंय..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
12 Aug 2009 - 11:51 pm | टारझन
हो ना राऑ ... काय च्या काय आहे हे ...
@ डॉण : नेमकं बोल्लास बघ ! ८ दिवस काय ? मी तर म्हणतो महिना दोन महिने जरी शाळा बंद राहिली तरी काही होणार नाही ...
---- आम्ही शाळेत कधी अभ्यास केल्याचं स्मरणात नाही , इंजिनियरिंगला ५ सब्जेक्ट्स ला २० दिवस , ह्या पेक्षा जास्त अभ्यास नाही :)
असो .. असतात एकेक बाऊ करणारे !! खरचटलं तरी फ्लाष्ठर घालून हिण्डणारे
12 Aug 2009 - 9:33 am | शैलेन्द्र
अभ्यासाला फ्लोट बांधायचा आणि द्यायचा समुद्रात सोडुन.... अजिबात बुडायचा नाही.
काय राव, लहान नव्हता का हो कधी? पोर कसली खुष झालीत.... दहा पंधरा दीवसांनी काय फरक पडतो?
त्यावरही बुडला तर बुडुद्या. मस्त एन्जोय करा.
अभ्यास हा स्वतः करायचा असतो, शाळेत असते ते शिकवणे, तेहि ते धड करत नाही.
12 Aug 2009 - 9:38 am | विसोबा खेचर
जरा आठ-दहा दिस पोरांना जरा मजा करू द्या.. मग बघू! :)
तात्या.
12 Aug 2009 - 10:19 am | अवलिया
उंडारु द्या जरा पोरांना... ! :)
--अवलिया
12 Aug 2009 - 11:30 am | विनायक प्रभू
सर्वांशी सहमत
12 Aug 2009 - 12:05 pm | अभिज्ञ
कमाल आहे,
अहो पोरांना सुट्टी दिलीय ती घरातच थांबण्यासाठी,बाहेर उंडारण्यासाठी नव्हे.
बाकी चालु द्यात.
:)
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
12 Aug 2009 - 12:20 pm | अवलिया
हॅ हॅ हॅ आजकाल पोरांना घरातल्या घरात सुद्धा खेळु न देण्याची फॅशन आहे
--अवलिया
12 Aug 2009 - 10:55 am | अमृतांजन
मी मा़झे प्रतिसाद राखून ठेवत आहे. आणखी एक आठवड्याने धाग्याला पुन्हा भेट देईन.
12 Aug 2009 - 2:10 pm | प्रसन्न केसकर
बुडु नये म्हणुन आत्ता ज्या सुट्ट्या दिल्या आहेत त्याची भरपाई नंतर काही सुट्ट्या रद्द/कमी करुन करणार आहेत. जेथे पाच दिवसांचा आठवडा आहे तेथे सहा दिवसांचा केला जाईल. त्याशिवाय दिवाळी, नाताळ इत्यादी सुट्ट्यांचे दिवस कमी करणार आहेत, असे शाळा सांगत आहेत.
पण या सुट्टीमधे अभ्यासाची घरच्या घरी थोडीफार उजळणी करता येईल. त्यामुळे अभ्यासात खंड पडणार नाही असेही शाळा सुचवत आहेत.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
12 Aug 2009 - 3:33 pm | अमृतांजन
मला वाटते की, सरळ महिनाभर सुटी देऊन टाकायची व त्यांच्या-
१. शक्य तेथे अंतिम परीक्षा १ महीना पुढे ढकलायच्या
२. अभ्यासक्रमात काटछाट करायची
३. सुटीत काय शिकायचे ह्याची एक पत्रिका काढून देऊन टाकायची व आल्याआल्या परीक्षा घेतली जाईल असे सांगायचे. परीक्षा फार कडक न करता घ्यावी
४. शिक्षकांना १५ ऒगस्टला बोलावले आहे ते ही रद्द करावे.
इतरही काही चांगले मिपाकरांना सुचू शकते ह्याची जाणीव आहे.
12 Aug 2009 - 3:34 pm | अमृतांजन
ड्युप धागा काढला
12 Aug 2009 - 3:57 pm | सूहास (not verified)
<<<अभ्यास बुडू नये म्हणून काय उपाययोजना करता येईल>>>
होडीत बसव की र त्याला !!
सू हा स...
12 Aug 2009 - 4:10 pm | प्रसन्न केसकर
खरेतर फरक काहीच पडत नाही. पण शाळा अन पालक सगळेच या विषयी खूप काळजी वगैरे करताहेत. माझ्या मुलाच्या ज्यु. केजी चे क्लास एक आठवडा बंद होते तर शाळा सुरु झाल्यावर सहा दिवसांचा आठवडा केला. आता कदाचित शाळेची वेळ वाढवतील... हो ए, बी, सी म्हणायला अन स्लँटींग लाईन, स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन गिरवायला एक वर्ष कमी पडते ना? तापच आहे लहान मुल होणे म्हणजे या दिवसात साला. एका बाजुला शाळेत मास्तरणीचा धाक अन घरी आईबापांचा. मुलांना जेवायला वेळ नसतो, खेळणे सोडाच.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
12 Aug 2009 - 6:16 pm | लिखाळ
प्रत्येक गोष्टीचा बाऊ करणे आणि भीति दाखवऊन समोरच्याला आपल्या घोळात घेणे अशी सध्याची तर्हा आहे. हल्ली एक-दोनच मुले असलेल्या आई-बापांना त्या मुलांची जरा अतीच काळजी असते आणि त्यांच्या काळजीचा बाकीचे फायदा घेत असतात असे मला वाटते.
तीन आठवडे शाळा बंद राहिल्या आणि अभ्यास बुडला तर जग बुडत नाही. कुठल्या गोष्टीचा किती मोठा विषय करायचा याचेच तारतम्य राहिले नाहीये असे वाटते.
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक-आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
12 Aug 2009 - 11:56 pm | स्वाती२
मी ५वी-६वी त असताना शिक्षकांच्या संपामूळे शाळा बरेच दिवस बंद होती. मी कालेजात असताना पण संपामुळे कालेज बंद होते. काही नुकसान झाले नाही. फार छळतात हल्ली पोरांना अभ्यासावरून.
13 Aug 2009 - 1:41 pm | काजुकतली
बुडू द्या हो अभ्यास चार दिवस.. दुसरी घटक चाचणी परिक्षाही रद्द केलीय..
मुलांनी 'शाळा बुडुदे, परिक्षा रद्द होऊदे' वगैरे प्रार्थना फक्त गाण्यातुनच अनुभवायच्या काय?? त्यांनाही हे सगळॅ प्रत्यक्षात घडल्याचा आनंद मिळू दे..... :)
(आता कोणी, 'तुम्हाला काय जातेय असे म्हणायला, तुम्हाला नसतील शाळेत जाणारी पोरं..वगैरे म्हणेल, तर त्याचे उत्तर, माझी मुलगीही शाळेत जाते आणि परिक्षा रद्द झाल्याचा तिला प्रचंड आनंदाश्चर्याचा वगैरे धक्का बसला आहे....)
13 Aug 2009 - 5:32 pm | हर्षद आनंदी
पोरांनु,
धम्माल करा, भरपुर खेळा-मैदानी खेळ!
अभ्यासाची ऐशी-तैशी, काही फरक पडत नाही. या आई-बापांनी स्वतः काय दिवे लावलेत हे त्यांनाही माहीतेय, फक्त आणि फक्त धमाल करा
आणि
आईस्क्रीम खाणे, थंड पाणि पिणे टाळा. पावसात (पडलाच तर) भिजु नका, पाण्यात खेळु नका, पडलात तर लगेच औषधोपचार करा
च्यायला, आमच्या येळेला ही डुकरं कंच्या मसनात व्ह्ती काय समदना झालय बघा! आमालाबी १-२ म्ह्यीने सुटी भेटली अस्ती न्हवं? हं आता ह्यो बॉसुटल्या काय मारायची सोडत नाय, साला त्याला बी झाला पाईजेल, फ्युव का कायत्ये म्हन्त्यात ना नायितेर ग्येला बाजार सर्दी तरी झ्याली पाईजे
I) @) उठा, दिवा स्वप्न न बघता फॉलोअप करा, नाहीतर येतेच आहे कडकलक्ष्मी झाडु घेउन 8} 8}
13 Aug 2009 - 5:49 pm | हर्षद आनंदी
१. पुस्तके पोत्यात भरुन माळ्यावर ठेवा,
२. दप्तरात पुस्तके भरुन, लाईफ जॅकेट मध्ये गुंडाळुन विसर्जित करा
आयला, पण पुस्तके वाचतील, अभ्यासाचे काय? तो कसा बुडतो ते अजुन नाही समजले बुवा!! अभ्यास काय वस्तु आहे का, ८ दीवसात बुडायला?
डॉन राव, ३-४ महीने अभ्यास केलात, म्हणजे तुम्हाला ऑस्कर \ नोबेल दिले पाहीजे, मी तर बाबा फक्त परीक्षेच्या ८ दिवस आधी पुस्तक उघडायाचो, आणि इंजिनिअरींगला १ महीना आधी !!
काय मुकेश, १० वीला गणिताच्या पेपरच्या आदल्या दिवशी वाड्यावर क्रीकेट खेळलो होतो, आठवतय ना? :P :P
अभ्यास बुडाला? (कोणाचे बुड अभ्यासायला सांगाता आता, पोरांच्या बुडाला काही स्वस्थता लाबु दे ना!!)
15 Sep 2009 - 7:44 pm | अमृतांजन
पुण्यात पुन्हा स्वाईन फ्ल्युचा थयथयाट सुरु झाला आहे.
15 Sep 2009 - 7:57 pm | बाकरवडी
अमृतांजन लावूनही काही उपयोग होत नाही.
काय करावे बुवा ? :W
:B :B :B बाकरवडी :B :B :B