आयुष्याच्या एका टप्प्यावर कुणाची तरी साथ हवीशी वाटते...(तात्यासारखा "बाई-बाटली'त न गुंतणारा एखादाच!)
निर्णय कसा घ्यायचा, हे मात्र ठरलेलं नसतं.
"अमक्याची तमकी लग्नाची आहे...' कुणीतरी सुचवतं. "तमका तुला अगदी शोभून दिसेल हो!' भोचक शेजारीण काकू मध्येच नाक खुपसतात.
प्रत्यक्ष निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो. पण तो घ्यायचा कसा, याचा घोळ सुटत नाही...
कुणी वधू-वर केंद्रात जाण्यासाठी सुचवतं.
"ऑनलाइनच जमव हो!' कुणी सांगतं.
प्रत्यक्षात वधू-वर सूचक केंद्राच्या वाऱ्या आणि ऑनलाइन मनजुळवणीचा खेळ काही झेपणारा नसतो.
मग जमवायचं कसं?
अनेकांपुढे प्रश्न असतो.
.....
पालकांचं वेगळंच म्हणणं असतं.
"आम्ही बघू तो मुलगा हिला पसंत पडत नाही. कुणाचं नाक पुढे, तर कुणी अगदीच "हॅ..' दिसतो म्हणे!! आणायचा कुठून हिला साजेसा मुलगा?'
"ह्याला नक्की कशी मुलगी हवेय, त्याचाच पत्ता लागत नाही. सुंदर, देखणी मुलगी आणली, तर ती अकलेचा खंदक आहे म्हणतो!'
पालकांच्या चर्चांत डोकावलं, तर हेच सूर आळवलेले ऐकायला मिळतात.
...
पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या निवडीचा मेळ साधता येईल?
याचाच वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत...
विवाहेच्छू मुले-मुली आणि पालकांच्या एका अनोख्या मेळाव्यातून...
....
मुला-मुलींचा परस्पर परिचय व्हावा, व्यक्तिमत्त्वं ओळखता यावीत, गप्पा-संवाद व्हावा आणि त्यातून जोडीदार निवडीची संधी मिळावी, या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे...
कधी? ः 23 मे, 2009, शनिवार. सायं. 5 ते 9.
कुणासाठी ः तूर्त तरी ब्राह्मण समाजासाठी. (पहिल्या टप्प्यात एवढंच!)
स्थळ ः स्वस्तिश्री सभागृह, सरस्वती विद्या मंदिरासमोर, बाजीराव रस्ता, पुणे.
फी? ः अर्थातच आहे! अल्पोपाहारासहित. (अधिक उत्सुकता असलेल्यांना खासगीत सांगितली जाईल.)
यायचा विचार आहे? ः मला व्यनि करा वा खरडा. जमवूया.
---