मुखवटा

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
5 May 2009 - 6:24 pm

आमच्या मिपाकर मित्राला तुम्ही आता चांगलेच ओळखायला लागला आहात.
आज सकाळी बघतो तर आमचा हा सुहृद अतीशय संतापलेल्या अवस्थेत हातात पेपर नाईफ घेउन संगणकाच्या पडद्याकडे बघत होता.

आम्ही :- मैत्रेया काय झाले ? असा संतापलेला का आहेस ?

मित्र :- @#$#@$ २३$@#%#$@#$^

आम्ही :- अरे हो हो काय झाले काय तुला एकदम ? असा एकदम का लाखोली वाहात आहेस ?

मित्र :- हे बघ हे बघ ... साला त्या 'गावाबाहेरच्या संस्थळावर' कुणा दुसर्‍याने माझ्या नावाशी साधर्म्य असलेले नाव घेउन कोणा तिसर्‍यालाच शिव्या दिल्या आहेत $@#$@#$@#$

आम्ही :- =)) =)) काय सांगतो काय ? म्हणजे तुझा पण मुखवटा बाजारात आला म्हणायचे.

मित्र :- कोण आहेत रे हे ? मला फक्त नाव कळु देत रे !!

आम्ही :- म्हणजे काय करशील ? अरे आपल्या आजुबाजुला मित्र म्हणुन वावरणारे द्विपाद ते हेच ;) आपल्या ओळखीचेच चेहरे.

मित्र :- पण नाव बोल की !

आम्ही :- बाबा रे, दारोदार टाळ्या वाजवत हिंडणार्‍यांना नाव वगैरे असली चैन परवडत नाही. तुम्ही हाक माराल त्या नावाला ते ओ देतात. तु मुन्नीबाई म्हणुन हाक मार नाहितर मुन्नाभाई म्हणुन.

मित्र :- पण माझे नाव का ?

आम्ही :- त्याचे काय आहे मित्रा, की कळत नकळत आपण कुणाला तरी दुखावलेले असते, कोणाची चार चौघात मस्त फिरकी घेतलेली असते... पण काहि लोकांना हि गंमत, टिंगल आवडत नाही, ते हे सगळे फार मनाला लावुन घेतात. त्यातुन तु सर्वच बाबतीत त्यांच्यापेक्षा सरस आहेस हे आतुन कुठुन तरी मान्य होत नसते, अंगात तर तोंडावर राग दाखवायचे धाडस नाही आणी त्यात न्युनगंडाने पछाडलेले... मग हे लोक तुझ्या नावाचे मुखवटे घालतात आणी अजुन कोणा असेच त्यांना दुखावणार्‍या माणसाच्या पाठीत वार करतात.

मित्र :- अरे पण त्यानी माझी बदनामी होते त्याचे काय ?

आम्ही :- घ्या ! अहो अंतरजालावर कसली आलीये बदनामी ? ते म्हणतात ना 'हमाम मे सब....'

मित्र :- पण कोणी गैरसमज करुन घेतला तर ?

आम्ही :- फाट्यावर मारावे ;) येव्हड्या हलक्या कानाच्या लोकांना अशीच वागणुक द्यावी.

मित्र :- अरे पण ४ लोक शंका घेतात , हसतात.

आम्ही :- खुळ्या उलट तुझा मुखवटा वापरल्याने ज्या लोकांना तु माहित नसतोस त्यांना पण तुझा परिचय होतो. तुझ्या लेखाला मग ते माहितीतल्या माणसाने लिहिलेले म्हणुन वाचायला लागतात. तुझ्या ब्लॉग चे चाहते वाढतात. तुझा फायदाच आहे ना ? आणी तुझ्या नावाचा वापर करुन ज्या तिसर्‍या माणसाला शिव्या दिलेल्या असतात त्याचे हितशत्रु तुझा आदर करायला लागतात ते वेगळेच.

मित्र :- वाह ! म्हणजे एकुण बदनाम हुए तो क्या.. नाम तो हुआ.

आम्ही :- शाब्बास रे बहाद्दरा ! ये हुई ना मर्दोवाली बात ;)

मित्र :- पण एकदा वार करुन झाल्यावर पुन्हा कोणी माझा मुखवटा वापरलाच नाही तर ?

आम्ही :- मग अशावेळी आपणच आपला मुखवटा वापरायचा.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

5 May 2009 - 6:27 pm | अवलिया

=))

(अस्सल मुखवटाधारी) अवलिया

निखिल देशपांडे's picture

5 May 2009 - 6:44 pm | निखिल देशपांडे

परा मस्तच रे भौ
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

आंबोळी's picture

5 May 2009 - 7:11 pm | आंबोळी

या वेळी सगळे रेफरंस लागले.
त्यामुळे लै मज्जा आली वाचताना....
पराभौ येउदे आजून....
आंबोळी

प्राजु's picture

5 May 2009 - 8:10 pm | प्राजु

परा भाऊ..
चांगली शिकवणी चालू आहे..
आणि खरड वह्यांचा प्लेटॉनिक अभ्यासही जबरदस्त आहे. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यन्ना _रास्कला's picture

5 May 2009 - 9:03 pm | यन्ना _रास्कला

साला त्या 'गावाबाहेरच्या संस्थळावर' कुणा दुसर्‍याने माझ्या नावाशी साधर्म्य असलेले नाव घेउन कोणा तिसर्‍यालाच शिव्या दिल्या आहेत

मला बी आनुबव आला. तित जबाब दिला त लगोलग उडला. आता बोला. बोल्तात ना कशात काय न फाट्क्यात पाय.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 May 2009 - 10:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चालूद्यात तुमचे पालथे धंदे पराशेट! आम्ही सगळे आहोतच "सहमत", "+१", "ज ह ब ह रा", "काय हाणलाय", "जियो", आणि इतर कंपूबाज-टाक्युलर प्रतिसाद द्यायला! ;-)

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

6 May 2009 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार

प्रतिक्रीया देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार ___/\___

आभारी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दशानन's picture

6 May 2009 - 12:29 pm | दशानन

=))

ज ब रा !

थोडेसं नवीन !

जागु's picture

6 May 2009 - 1:02 pm | जागु

त्याचे काय आहे मित्रा, की कळत नकळत आपण कुणाला तरी दुखावलेले असते, कोणाची चार चौघात मस्त फिरकी घेतलेली असते... पण काहि लोकांना हि गंमत, टिंगल आवडत नाही, ते हे सगळे फार मनाला लावुन घेतात. त्यातुन तु सर्वच बाबतीत त्यांच्यापेक्षा सरस आहेस हे आतुन कुठुन तरी मान्य होत नसते, अंगात तर तोंडावर राग दाखवायचे धाडस नाही आणी त्यात न्युनगंडाने पछाडलेले... मग हे लोक तुझ्या नावाचे मुखवटे घालतात आणी अजुन कोणा असेच त्यांना दुखावणार्‍या माणसाच्या पाठीत वार करतात.

बर्‍याच लोकांच्या बाबतीत असे घडते.