चर्चिलची "शापवाणी"

तळेकर's picture
तळेकर in जनातलं, मनातलं
29 Jan 2008 - 3:12 pm

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपले चर्चील युद्ध जिंकला पण निवडणुक हरला, अटलीच्या मजुर मंत्रीमंडळाने भारताला स्वातंत्र्य देऊ केले. त्यावेळी चर्चिलने विरोधी बाकावरून पुढील समज नोंदवली होती .

"स्वातंत्र्य हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, परंतू या क्षणी सुत्रे कॊंग्रेसच्या हवाली करणे याचा अर्थ भारतातील लक्षावधी भुकेल्या प्रजेच्या हितसंबंधाना बदमाषांच्या, दरोडेखोरांच्या आणि चांडाळ लुटारूंच्या स्वाधिन करणे आहे, यांच्या कारकिर्दीत साधी पाण्याची बाटली किंवा पावाचा तुकडाही करमुक्त असणार नाही. फक्त हवा तेव्हडी विनामुल्य उपलब्ध असेल या भुकेकंगाल आत्म्याचे तळतळाट अटलीच्या माथी बसतील. राजकीय साठमारीत देश कायम मग्न राहिल. राजकारण आणि तत्वड्न्यान या विषयातील प्राथमिक धडे गिरविण्यास भारताला निदान एक हजार वर्षे लागतील. आज आपण ज्या मंडळींच्या हाती सत्ता सोपवीत आहोत ती चारित्र्य-शुन्य कःपदार्थ बांडगुळे आहेत, आणखी काही वर्षानंतर त्यांचे नांवही कोणी घेणार नाही,"

चर्चील भारताचा मित्र कधीच नव्हता. ६१ वर्षापुर्वीच्या या शापवाणीत तुच्छता द्वेष पुरेपुर भरलेला होता. या सहा दशकातं युरोपमधल्या सर्व राष्ट्रांचा आणि जपानचा पुनर्जन्म घडला यामागे जी जिद्द प्रत्ययाला आली तिचा मागमुसही आपल्याकडे दिसला नाही. आपल्याला नाझी किंवा जपान सारख्या खुनशी आक्रमणाला प्रत्यक्ष तोंड द्यावे लागले नाही अविश्रांत श्रम तनमनधन अर्पण करणारे निरपेक्ष नेतृत्व आपल्याला लाभले नाही, हे दुर्दैव. वास्तविक या साठ वषात या अद्वितीय देशाचे सोने व्हावयास हवे होते कुठल्याही देशाला हेवा वाटावा असे नद्यांचे जाळे आणि ३५०० कि.मी. लांबीच्या पुर्व पश्चीम किनारपट्टीचे वरदान आपल्याला लाभले आहे. प्रचंड साठा असुनसुद्धा वास्तविक पाण्याचे दुर्भिक्ष्य असण्याचे कारण नाही. विज ,उद्योग धंदे शेती या साठी लागणारी निसर्ग-निर्मित विपुलता एवढ्या प्रमाणात असतांना आपण त्याचा लाभ उठवू शकलो नाही. याचे कारण ब्रिटिशांचा वारसा शिरसावंद्य मानून आपल्या सर्व रंगाच्या राजकारण्यांनी देश लुटण्यास सुरूवात केली.ती नेमकी १५ ऒगस्ट १९४७ ला. दिडसे वर्षे ब्रिटिशांनी जेव्हडा देश पोखरला त्यापेक्षा कैक पटीने आधीक आपल्या राज्यकर्त्यांनी सुलतानी बजावली. आपण आपल्या प्रजेला साधे जंतुविरहित पिण्याचे पाणी आज देत नाही ही शरमेची बाब आहे. आपल्या सर्व नद्या उपनद्या रोगराईने बरबटल्या आहेत. जगात इतरत्र कुठेही आपल्यासारखी धरती, वनस्पती, फळफळावळ यांची विविधता नाही. आपला रुपया डॊलरच्या तुलनेत वधारत आहे या प्रचारी वल्गना ऐकून चीड येते. त्याची स्थानिक क्रय-शक्ती किती क्षीण आहे हे सामान्य माणूस जाणून आहे.

अमुक अब्जाधीश आणि तमुक कोट्याधीश आपल्या देशात आहेत. ही बढाईखोर आकडेवारी अशीच निर्लज्ज्पणाची आहे. सामान्य माणसांची फिकीर अजिबात न करणारी सरकारे कायम आप्ल्या बोकांडी बसली आणि लाचलुचपतीच्या कॆन्सरमुळे सर्व जातीच्या सत्ताधा-यांचे उखळ कैक पिढ्याना पुरणार धनसंचय लाभल्याने पाढरे झाले आहे. माफिया सम्राट बिग बुल चेतन पारेख तेलगी अविनाश भोसले, अशोक मल्होत्रा यांची सरबराई करण्यात धन्यता मानणारी नोकरशाही, मिळत असलेल्या घबाडाकडे कायम लक्ष ठेवुन आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. चर्चिलची शापवाणी खरी करुन दाखवण्याची चढाओढ आपल्या राजकारणातील मंडळीची चालली आहे. अशी दाट शंका येते .

तुम्हाला काय वाटते.?

समाजप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

अमित's picture

29 Jan 2008 - 3:57 pm | अमित

आपण म्हणता ते कटू असले तरी सत्य आहे....

सुनील's picture

29 Jan 2008 - 9:40 pm | सुनील

आपला दृष्टीकोन नकारात्मक वाटला. चर्चिल हे वर्णद्वेषी होते. भारतीयांना स्वतः राज्य करण्याची अक्कल नाही, त्यांच्यावर आम्ही (पाश्चात्यांनी) राज्य केले पाहिजे असे त्यांचे मत होते (हिटलरचे मत याहून वेगळे नव्हते). परंतु खरोखरच तसे घडले का? गेल्या सहा दशकात भारताने काहीच प्रगती केली नाही का? कदाचित जेवढी अपेक्षित होती तेवढी म्हणा किंवा जेवढी प्रगती करणे शक्य होते तेवढी झाली नाही म्हणा, हे शक्य आहे. पण गेल्या सहा दशकात काहीच झाले नाही हे म्हणणे अगदीच नकारात्मक वाटते.

आपण आपल्या achievements चे तीन भागात वर्गीकरण करू शकतो.

१) अन्नधान्य व शेती - भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या हाती भिकेचा वाडगा होता. आपल्याला धान्य आयात करावे लागत होते. गुरेदेखील तोंड लावणार नाहीत असला गहू (बहुधा त्याचे नाव मिलो असे होते) अमेरिकेने आपल्या झोळीत फेकला होता.

आज परिस्थिती काय आहे? आपण अन्नधान्याच्या बाबतीत बहुतांशी स्वयंपूर्ण आहोत. भिकेचा वाडगातर आम्ही केव्हाच फेकून दिला आहे. मोठमोठ्या प्रकल्पासाठी आपण आज जागतिक बॅकेकडून वगैरे कर्ज घेतो (लक्षात ठेवा, कर्ज हे पत दर्शविते. अमेरिका हा जगातील सर्वात अधिक कर्जबाजारी देश आहे).

२) उद्योगधंदे - सहा दशकांपूर्वी भारतीय industry कोणत्या परिस्थितीत होती हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आज आपण संपूर्ण भारतीय बनावटीची मोटरगाडी बनवू शकतो इतकेच नव्हे तर इतर देशांचे उपग्रह वाहून नेण्याची सेवादेखील देऊ शकतो!

३) Last but not the least. भारताच्या बरोबरीने स्वतंत्र झालेले तिसर्‍या जगातील अन्य देश पहा. कुठे लष्करशाही तर कुठे हुकुमशाही! अनेक धर्म, भाषा, पंथ, जाती-उपजाती यांनी पोखरलेला हा देश सलग सहा दशके लोकशाहीची वाटचाल करतो आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. लोकशाही हा कदाचित राज्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग नसेलही, पण त्यापेक्षा उत्तम मार्ग दुसरा नाही (हे वाक्य चर्चिलसाहेबांचेच ना?).

ग्लास अर्धा रिकामा की अर्धा भरलेला हे तुम्हीच ठरवा.

टीप : टाटांनी कोरेस घेतली तो क्षण पाहायला चर्चिलसाहेब हवे होते, असे राहून राहून वाटते!!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनिष's picture

30 Jan 2008 - 12:11 pm | मनिष

सहमत आहे!!!

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jan 2008 - 9:59 pm | प्रकाश घाटपांडे

<<ग्लास अर्धा रिकामा की अर्धा भरलेला हे तुम्हीच ठरवा.>>
हे वाक्य आता इतक गुळगुळीत झालं आहे. मला वाटत पाडगावकरांनी तो अर्धा पिउन इतरांना प्यायला मिळावा म्हणुन अर्धा रिकामा ठेवला आहे. काही लोक तोंडाला तो लाऊन पटकन रिकामा करुन टाकावा नाहीतर इतर पिउन टाकतील या धास्तीत असतात. काही लोक तो उर्वरित कसा भरता येईल असा विचार करतात.
सत्य हे आहे कि तो एकाच वेळी अर्धा भरलेला व अर्धा रिकामा आहे.
प्रकाश घाटपांडे

व्यंकट's picture

30 Jan 2008 - 12:37 pm | व्यंकट

>>तुम्हाला काय वाटते.?

तळेकर साहेब,
आम्हाला असे वाटते की, आम्हास कोणाचीच मते पटत नाहीत, आणि आमची मते आम्ही कोणास पटवून देऊ शकत नाही. तुर्तास आम्हास पृथ्वीतलावरील आमच्या एकट्याच्या वाट्याची हवा, पाणी, समुद्र, भूमी , सुखं दु:ख, पशू, पक्षी, धन-संपदा, पुत्र-पौत्र वैगेरे हवे आहेत ज्यावर आमची अनभिक्षित सत्ता चालेल. परंतू, ते घडेलसे वाटते नाही; तोवर, लाच देऊन, लबाडी करून, टॅक्स भरून,शिव्याशाप खाऊन, तळतळाट घेउन, सचोटीने, मेहनतीने, आशिर्वादांनी, नशिबाने, जसे जमेल तसे, जे जे मिळेल ते घेऊ आणि द्यावे लागेल, देता येईल ते देऊ, असे आमचे वयक्तीक मत आहे.

मुक्तसुनीत's picture

30 Jan 2008 - 7:08 pm | मुक्तसुनीत

हा विषय वाचताना दोन्हीकडचे दृष्टिकोन समोर येत आहेत. या दोन्ही बाजू अर्थातच पूर्वसूरींनी मांडलेल्या आहेत. घाटपांडे यानी म्हण्टल्याप्रमाणे , या चर्चा थोड्याशा गुळगुळीत झाल्यासारख्या आहेत. मात्र व्यंकट यांची प्रतिक्रिया मला फार बोलकी वाटली. फार तीव्र, चटका लावणारी. विश्लेषणांच्या, वाद-विवादांच्यामधे (जे अर्थातच आवश्यक आहेत ! ) सामान्य नागरिकांच्या भावना नेमक्या सांगणारी. "हर किसीको चाहिये इक मुठ्ठी आसमां" या शब्दांची आठवण झाली.

मोहन's picture

30 Jan 2008 - 2:31 pm | मोहन

तळेकरजी

प्रत्येक प्रश्नाचे खापर राजकारण्याच्या माथी मारायला फारच सोईचे आहे. काय होऊ शकले असते पेक्षा काय साध्य केले व काय करता येऊ शकेल ह्या कडे लक्ष आपण सर्वांनीच द्दयायला हवे. चर्चिलची "शापवाणी" ही भारत सोडायला लागल्यामूळेची ऊद्विग्न प्रतीक्रिया असावी. मी श्री. सुनीलच्या मतांशी जास्त सहमत आहे. न्यूयॉर्कला कामानिमित्त फिरतांना " The pierre" या पंचतारांकित हॉटेलवर भारताचा तिरंगा व टाटांच्या ताजचा झेंडा पाहुन माझा ऊर अभीमानाने भरुन आला होता. हे सुध्दा चर्चिलसाहेबांना दाखवायला मिळाले असते तर फार बरे झाले असते. असो अजून आपल्या सगळ्यांना बराच पल्ला गाठायचा आहे ... राजकारण्यांसोबत वा राजकारणी असतांना देखील!!!
आपला

मोहन

संजय अभ्यंकर's picture

1 Feb 2008 - 1:40 am | संजय अभ्यंकर

लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिश संसदेस २, फेब्रुवारी १८३५ रोजी पाठवलेला हा खलिता बराच बोलका आहे.

"
I have travelled across length & breadth of India and I have not seen one person who is a begger, who is a thief.Such a wealth I have seen in this country, such high moral values, such high calibre, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and , therefore I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is Good and Greater than their own, they will loose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truely dominated nation.
"

ब्रिटिशांनी पेरलेली बिजे आजही फळे देत आहेत.
अशी दूर दृष्टि!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

इनोबा म्हणे's picture

1 Feb 2008 - 1:50 am | इनोबा म्हणे

संजयराव मध्यंतरी कुणा ऑर्कुट सदस्याच्या अल्बममधे हे पत्र वाचले होते.
खरेच... इंग्रजांच्या दूरदृष्टीला मात्र तोड नव्हती/नाही.