ही पा.क्रु. माझ्या आजी कडून मी शिकले मी, अनेक वेळा केली पण तिच्या हाताची चव नाही आली कधी मी केलेल्या रायत्याला. बेळ्गाव , कर्नाटक या भागात करतात असे रायते.
तशी थोडी त्रासदायक आहे. पण म्हणतात ना, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, तसंच जर चवीचे खायचे असेल तर थोडे कष्ट ही घ्यायला हवेत.
२ कच्च्या (कडक हव्या, मऊ नकोत.) कै-या,
१ वाटी भाजलेल्या दाण्याचे बारीक कूट,
५ ते ७ हिरव्या मिरच्या,
बुटुक भर चिंच,
चवी पुरता गूळ,
मीठ,
फोडणी करीता तेल,
मोहरी,
जिरे,
हिंग,
कढीपत्याची पाने ८ ते १०
प्रथम कै-या कुकर मधे २ ते ३ शिट्ट्या करून उकडून घ्या. कै-या गार झाल्या की साली, गर वेगळा करा. साली १/२ वाटी पाण्यात टाका व त्याचा सर्व गर काढून घ्या. साली फेकून द्या, गर वेगळा करताना थोडा गर कोयीला राहू द्यात. आता, हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्या. दाण्याचे कूट थोडे पाणी घालून एकजीव करून घ्या. चिंचेचा कोळ, चवी पुरता गूळ कैरीच्या गरा मधे मिसळा, एका पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे मोहरी, कढी पत्याची पाने, वाटलेली मिरची टाका, वरून कैरीचा गर कोयी सकट व दाण्याच्या कूट घाला. मीठ घाला. हे मिश्रण खूप घट्ट वाटले तर थोडे पाणी घाला. उकळी आली की ३ ते ४ मि. नी गॅस बंद करा. गरम गरम पोळी बरोबर किंवा भाता बरोबर खा. ( रायते पुन्हा पुन्हा गरम करू नका. थंड ही छान लागते.)
कैरीच्या सीझन शिवायही हे रायते खायचे असल्यास कै-या खालील प्रमाणे साठवून ठेवाव्यात.
एक काचेची फिरकीच्या झाकणाची बरणी घ्या, लोणच्याची असते ना चिनी मातीची तशी, कै-या धुवून उकडून थंड झाल्या की एक काचेच्या बरणी मधे या कै-या ठेवाव्यात. वरून मीठाचे पाणी कै-या बुडतील इतके व बरणी भरेल इतके ओतावे. कै-या बरणीत भरताना त्या दाबून भरू नयेत. हलक्या हाताने ठेवाव्यात. झाकण घट्ट बंद करून ठेवून द्या. ६ ते ८ महीने सहज टिकतात.
प्रतिक्रिया
8 Mar 2009 - 12:04 am | लवंगी
करुन पहायला हवे.
... आजीच्या हातच्या लोणच्याची आठवण करुन दिलीस..
8 Mar 2009 - 12:43 am | विसोबा खेचर
हम्म! आमचं अत्यंत आवडतं लोणचं..
आम्ही बिनफोटूच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही आणि तसाही आम्हाला आता पाकृंना प्रतिसाद देण्यातच काही इंटरेस्ट उरलेला नाही..
आमचा अंदाज ए बया आता आमच्यापाशी नाही!
तात्या.
9 Mar 2009 - 3:17 pm | शुभ
मस्त अ।हे
करुन प।हिन
11 Mar 2009 - 2:36 am | चकली
आजीची रेसिपी असल्याने छानच होणार :)
चकली
http://chakali.blogspot.com