होळी स्पेशल - थंडाई

मिंटी's picture
मिंटी in पाककृती
6 Mar 2009 - 11:32 am

होळी आली की आपोआप डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पुरणपोळी, रंग, मौजमजा आणि थंडाई...... :)
तसं बघायला गेलं तर थंडाई राजस्थानातला अतिशय लोकप्रिय पेयपदार्थ. महाशिवरात्रीला याचा महादेवाला नैवेद्य दाखवला जातो. उत्तर भारतात थंडाईचं खास महत्व असतं ते होळीच्या दिवशी. या दिवशी थंडाईमधे भांग मिसळली जाते.
या सगळ्यामुळे होळीचा आनंद द्विगुणीत होतो....पुरणपोळीची पाककृती यापुर्वी मिपावर दिलेली आहे (http://www.misalpav.com/node/1371)त्यामुळे होळीची दुसरी खासियत आज देण्याचा प्रयत्न करणार आहे.

साहित्य :

१ लिटर दूध
१/२ कप साखर ( दळुन घेतलेली )
१०-१२ काळीमिरी
थोडंस केशर
१/४ कप बदाम
२ मोठे चमचे खसखस
२ मोठे चमचे बडिशोप
१/२ मोठा चमचा वेलची पावडर
१८-२० पांढरी मिरी

कृती :

वरील सर्व साहित्याची मिक्सरमधुन अगदी बारीक पुड करुन घ्या. दुध उकळुन पुर्णपणे गार करुन घ्या. गार झालेल्या दुधात वरील पुड घालुन फ्रिजमधे ३-४ तासासाठी गार करायला ठेवा. नंतर या थंडाईसोबत होळीची मजा लुटा. :)

फोटो अंतरजालावरुन साभार !

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 Mar 2009 - 11:35 am | अवलिया

हाय !!!!

मार डाला !!!!

--अवलिया

टारझन's picture

6 Mar 2009 - 11:37 am | टारझन

वा !!
थंडाई हा तर पैलवानाचा खुराक !! दाम्या पैलवाण नाही वाटत अजुन पण ;)

- पै.टारझ

श्रीमंत दामोदर पंत's picture

6 Mar 2009 - 11:57 am | श्रीमंत दामोदर पंत

>>दाम्या पैलवाण नाही वाटत अजुन पण
ते वाटण्यासाठी काय करावं लागेल बाबा ते सांग..... ;)

दशानन's picture

6 Mar 2009 - 11:59 am | दशानन

गचकलो !!!!!!!!!!

* पिण्याची कुठलीच गोष्ट मी सोडत नाही त्यामुळे +१ ;)

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

परिकथेतील राजकुमार's picture

6 Mar 2009 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार

थंडावलो !!

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

मृगनयनी's picture

6 Mar 2009 - 1:01 pm | मृगनयनी

मिन्टे... १० आणि ११ तारखांना आमचा मुक्काम तुझ्याकडे असेल!
तेव्हा आम्हाला थंडाई, रोज पुडिन्ग, आणि पनीरटिक्का तू भरपेट खिलवणारेस!

(पुरणपोळीची पा.कृ. टाकायला हरकत नाही! ;) )

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मिंटी's picture

6 Mar 2009 - 1:04 pm | मिंटी

अगदी नक्की. :)
अग पुरणपोळीची पाककृती आधीच स्वाती ताईनी टाकलेली असल्यानी मी टाकली नाही. त्याची लिंक फक्त इथे दिली आहे.

रेवती's picture

6 Mar 2009 - 4:16 pm | रेवती

आवडली पाकृ!
पण भांग कुठे आहे?
ती वरील पाकृमध्ये कशी मिसळायची?;)
त्याने काय फरक पडतो (पाकृमध्ये;))?
(आजकाल तू थोड्या ढिंच्याक् पाकृ का द्यायला लागलीयेस?)

रेवती

प्राजु's picture

7 Mar 2009 - 10:19 am | प्राजु

(आजकाल तू थोड्या ढिंच्याक् पाकृ का द्यायला लागलीयेस?)

तात्या, सारखे अल्लाला प्यारे होतात.. म्हणून अशा नशिल्या पाकृ देते म्हणजे.. मेलो.. वारलो म्हणणार नाहीत. :)
मस्त आहे थंडाई..
बाय द वे मिंटे राहतेस कुठे पुण्यात?? :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मिंटी's picture

7 Mar 2009 - 10:23 am | मिंटी

तात्या, सारखे अल्लाला प्यारे होतात.. म्हणून अशा नशिल्या पाकृ देते म्हणजे.. मेलो.. वारलो म्हणणार नाहीत.
=)) =))

बाय द वे मिंटे राहतेस कुठे पुण्यात??

तु कधी येणार ते कळव तुला घ्यायला येईन मी नक्कीच.

प्राजु's picture

7 Mar 2009 - 10:24 am | प्राजु

घ्यायला येच.. पण तुझ्या घरात ते रोज पुडींग, पनीर टिक्का.. आणि ही थंडाई.. तेवढी तयार असेल हे बघ म्हणजे झालं.. :D
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

7 Mar 2009 - 10:32 am | टारझन

थोडं वाढत्या मापाचं बणवा !! अनवाँटेड गेश्ट्स येण्याचा संभव आहे !!

(बव्हिष्यकार) टारूषाश्त्री

सहज's picture

6 Mar 2009 - 7:11 pm | सहज

रोज पुडिंग, आता थंडाई लै भारी!

आता पुढे काय :?

:-)

शितल's picture

6 Mar 2009 - 7:15 pm | शितल

अग काळी आणि पा. मिरीने चव कशी लागते.
मला ही थंडाई माहित नव्हती . जरा चव ही कशी लागते सांग.

मिंटी's picture

7 Mar 2009 - 10:13 am | मिंटी

अगं काळी मिरी आणि पांढरी मिरी यामुळे थंडाईला थोडा तिखटपणा येतो. म्हणजे गोड आणि थोडंस तिखट अशी मस्त चव येते. :)

शितल's picture

7 Mar 2009 - 10:21 am | शितल

ओ.के.
आता पुण्यात आल्यावर तुझ्या येईनच थंडाई पिण्यास, तेव्हा मात्र गरम होऊ नको.. ;) (ह.घे.)

मिंटी's picture

7 Mar 2009 - 10:25 am | मिंटी

नक्की ये..... अगदी कधिही ये मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कंटाळा येईपर्यंत थंडाई प्यायला देईन . ;)

प्रभाकर पेठकर's picture

6 Mar 2009 - 7:48 pm | प्रभाकर पेठकर

थंडाईचा प्रयोग कधी करून पाहिला नाही. (रेडीमेड्च वापरली आहे.) पण करून पाहावा म्हणतो.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

नरेश_'s picture

7 Mar 2009 - 11:13 am | नरेश_

थंडगार थंडाईचा मारा !!!

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

विसोबा खेचर's picture

7 Mar 2009 - 11:24 am | विसोबा खेचर

छान पाककृती...!

अजून काय बरं प्रतिसाद द्यावा? साला, आपला तर अंदाज ए बयाच नाहीसा झाला!

तात्या.

श्रुती's picture

7 Mar 2009 - 12:38 pm | श्रुती

मी ह्यात मगज टाकते आणी मिरे टाकत नाही..
ह्यवेळेस मिरे टाकुन बघिन.. :)

भाते's picture

11 May 2016 - 1:54 pm | भाते

धागा वरती काढत आहे. :)

विकांताला करून बघायचा विचार करतो आहे.