मुखवास

शुभान्गी's picture
शुभान्गी in पाककृती
10 Feb 2009 - 10:38 pm

ओवा
साहित्य : ओवा,मीठ्,लिन्बू, भाजलेली तिळ, खोबरा कीस
कृती: ओवा पाण्याने २-३ वेळा धुवून घ्यावा.चाळ्णीवर काढून घ्यावा. ओवा निथळल्यावर कापडावर काढून त्याला मिठ लावून उन्हात चान्गला वाळ्वून घ्यावा. चान्गला वाळला कि कढईत भाजून घ्यावा, भाजतान्ना त्यात लिन्बाचा रस , भाजलेली तीळ, खोबरा कीस घालावा.
अवान्तर: नुस्ता ओवा खाल्ला कि तिखट लागतो.वरीलप्रमाणे केला तर त्याचा तिखटपणा खूप कमी होतो. माझी आई हा ओवा खूप छान करते.
*****************************************************************
आवळासुपारी
साहित्य :आवळे, मिठ,दही, जिरापुड,
कृती: आवळे धुवून किसावे.थोड्याशा दह्यात चवीप्रमाणे मीठ व जीरापुड घालून ते आवळ्याच्या किसाला लावावे व किस उन्हात वाळ्त ठेवावा.(यात हिन्गही घालतात पण मग उपासादिवशी खाता नाही येत) कड्क उन्हात वाळ्वल्यास किस काळा नाही पडत.

प्रतिक्रिया

धन्यवाद
वेताळ

बाप्पा's picture

17 Feb 2009 - 5:10 pm | बाप्पा

वाचुन लहानपण आठवले एकदम. माझी आई पण मुखवास फार छान करते.